Maharashtra Breaking Marathi News Live | मुंबईत काँग्रेस आक्रमक, मणिपूरच्या घटनेवरुन कॅन्डल मार्च
Maharashtra Breaking and Marathi News Live | मुंबईसह राज्यभरातील प्रत्येक घडामोडीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहा टीव्ही 9 मराठीचा लाईव्ह ब्लॉग.

मुंबई | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधान केलं. या विधानाचे राज्यभर पडसाद पाहायला मिळत आहेत. काँग्रेसकडून राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच निषेधही करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडेकोट सुरक्षाही करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असताना मुंबईत काँग्रेसचं आंदोलन
मुंबई :
मुंबईत काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने मणिपूर घटनेच्या विरोधात मुंबईत कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, संजय निरुपम, जीशान सिद्दीकी उपस्थित होते. या आंदोलनावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
-
हिंगोलीतील धक्कादायक प्रकार, किराणा दुकानातून खतांची विक्री?
हिंगोली :
किराणा दुकानातून युरिया खताची विक्री होत आसल्याचा आरोप करण्यात आला आहे. चढ्या दराने किराणा दुकानातून युरिया खताची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. युरिया खताची मूळ किंमत 265 असताना किराणा दुकानदार 400 रुपयाला युरिया खताची एक बॅग विकतोय, अशी माहिती समोर आली आहे. सेनगाव तालुक्यातील हाताळा गावातील हा प्रकार आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या किराणा दुकानदाराकडे कृषीचे लायन्स आहे का? याबाबत चौकशी करण्याच मागणी शेतकरी करत आहेत.
-
-
ITR File Last Date | आयटीआर भरण्यासाठी आज शेवटची संधी, आत्ताच जाणून घ्या
मुंबई | आयटीआर भरण्याची आजची (31 जुलै) ही शेवटची तारीख आहे. आयटीआर अर्था इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. तसेच आज आयटीआर न भरल्यास 1 ऑगस्टपासून आयटीआर भरणाऱ्यांना दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे हा आर्थिक फटका सहन करण्यापेक्षा आत्ताच आयटीआर फाईल करा.
-
Pune Traffic Updates | पुण्यात 1 ऑगस्ट रोजी प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार
पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्ग बंद असतील. गैरसोय टाळण्यासाठी व्हीडिओत पाहा कोणते मार्ग बंद असणार.
बातमीची लिंक | Pm Narendra Modi Pune Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा, प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार
-
Pradhan Mantri Fasal Bima Yojana | पिकविमा भरण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई | केंद्र सरकराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं. त्यामुळे केंद्र सरकराने या योजेनासाठी अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंग्र सरकारने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असं आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांना दिलासा
#प्रधानमंत्री_पीक_विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने अर्ज करण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री @dhananjay_munde यांनी केले आहे.#PMFBY pic.twitter.com/sAJdZvNrIq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2023
-
Published On - Jul 31,2023 4:49 PM
