AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : ठाकरेंचा किल्ला ढासळला, शरद पवार- अजितदादांचीही दादागिरी नाही, कसा झाला पराभव ?

महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुंबईसह अनेक ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. ठाकरे बंधू आणि पवार गटांना मात्र मतदारांनी नाकारले. मर्यादित प्रचार, चुकीची रणनीती, अंतर्गत वाद आणि नव्या चेहऱ्यांचा अभाव ही त्यांच्या पराभवाची प्रमुख कारणे ठरली. या निकालांनी राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Explainer : ठाकरेंचा किल्ला ढासळला, शरद पवार- अजितदादांचीही दादागिरी नाही, कसा झाला पराभव ?
महापालिका निवणूक 2026
| Updated on: Jan 17, 2026 | 12:21 PM
Share

मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक- राज्यात गेल्या महिन्याभरापासून फक्त आणि फक्त याच निवडणुकांची चर्चा सुरू होती. उमेदवार जाहीर झाल्यावर सभा, प्राच, मुलाखती यांचा सपाटा लावत सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी झोकून दिलं. अखेर 15 जानेवारीला मतदान होऊन काल निकाल जाहीर झाले. अतिशय प्रतिष्ठेच्या अशी मुंबई महापालिकेसह (BMc Election) बहुतांश महापालिकांमध्ये (Mahapalika Election 2026) भाजपचेच वर्चस्व दिसून आलं. राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र येत मुंबईत युती करत निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या या मनोमिलनाचा फारसा फायदा झाला नाही. 89 जागा मिळवत भाजपाच मुंबईतला सर्वात मोठा पक्ष ठरला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागांवर समाधान मानवं लागलं. तर मनसेला अवघ्या 6 जागा मिळाल्या.

राज्यात इतर ठिकाणीही थोड्याफार फरकाने हच चित्र दिसलं. सगळीकडे भाजपचाच बोलबाला होता. मात्र ठाकरे बंधू, तसेच शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनाही मतदांरानी नाकारल्याचं दिसलं. मुंबईतर तर ठाकरेंच्या गडाला मोठा हादरा बसला, राज्यातीही इतरत्र फारशी चमकदार कामगिरी दोन्ही ठाकरे बंधू, तसेच पवार काका-पुतण्यांना करता आली नाही आणि भाजपाच मोठा पक्ष असल्याचे दिसून आलं. या पराभवाची कारण काय ? ठाकरेंचा किल्ला ढासळण्यामागे, पवारांना हादरा बसण्यामागे नेमकं काय कारण होतं ? जाणून घेऊया सविस्तर…

Live

Municipal Election 2026

12:16 PM

शर्मिला ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचे आैक्षण...

12:02 PM

मुंबईत 8 आंबेडकरी पक्षांनी 164 जागा लढवूनही हाती भोपळा

11:28 AM

Mumbai Election Result 2026 : मुंबईतील विजयी उमेदवार घेणार एकनाथ शिंदे यांची भेट

10:51 AM

Raj Thackeray On Mumbai Election Result 2026 : मनसे-उद्धव ठाकरे शिवसेना युती तुटणार का? निकालानंतर राज ठाकरेंचे पहिले संकेत काय?

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

ठाकरेंच्या पराभवाची कारणं काय ?

1) जुलै महिन्यात मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू 20 वर्षांनी प्रथमच एकत्र आले. नंतर ते वेळोवेळी एकमेकांच्या घरी, सणा-सुदीला वगैरे भेट देत राहिले. महापालिका निवडणुकांत युती करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आणि अनेक मराठी नागरिकांना दिलासा मिळाला.  मात्र ठाकरे बंधू फारसा करिश्मा दाखवू शकले नाही. खरं म्हणजे राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका होत्या. मात्र ठाकरे बंधूंचा मेन फोकस मुंबईवर आणि नंतर थोडं लक्ष नाशिकवरच होतं. मुंबई, नाशिक आणि ठाण्यातच राज व उद्धव या दोघांची प्रत्येकी एक संयुक्त सभा झाली. इतर महापालिकांमध्ये त्यांनी सभाच घेतली नाही. त्यामुळे तिथल्या मतदारांपर्यंत ते पोहोचलेच नाहीत. इतर महापालिकांकडे त्यांचं लक्ष नव्हतं. ज्याचा फटका त्यांना निवडणुकीत चांगलाच बसला.

2) ठाकरेंनी सभांऐवजी मुंबईत शाखा भेटींवर जास्त जोर दिला. अधिकाधिक सभा होणे अपेक्षित असताना त्यांनी सभा न घेता शाखांना भेटी दिल्या, मात्र त्यांचा हाच निर्णय मारक ठरला. फक्त मुंबईवरच त्यांचा फोकस राहिल्याचे दिसून आलं.

3) 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत शिंदेंनी बंडखोरी केली आणि ते बाहेर पडले. शिवसेनेची दोन शकलं झाली. पक्ष फुटल्यापासून ते आत्ता महापालिकेची निवडणूक लागेपर्यंत शिवसेनीतील जवळपास 40 ते 50 नगरसेवक हे पक्ष सोडून गेले. त्याचाही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

4) या निवडणुकीत ठाकरेंनी अनेक नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली. ते फारसे माहीत नसल्याने मतदारांपर्यंतल पोहोचले नाहीत आणि पक्षाला त्यांचा निवडणुकीत फायदा झालाच नाही.

5) शिवसेनेची दोन शकलं झाली. या निवडणुकीत 50 ते 60 ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होती. त्यांचे अनेक उमेदवार समोरासमोर लढत होते, मात्र यामुळे मतांची विभागणी झाली. जर हाच सामना फक्त शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा झाला असता, तर एवढी मतं विभागली गेली नसती आणि हे चित्र नक्कीच बदललं असतं.

या सगळ्या फॅक्टर्समुळे मुंबईसह राज्यातीही ठाकरेंना मोठ्या प्रमाणात हार पत्करावी लागली आणि पर्यायाने त्यांचे बुरूज ढासळत गेले.

शरद पवार- अजितदादांचाही करिश्मा का चालला नाही ?

महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापलिका निवडणुकांमध्ये एकला चालो रे ची भूमिका स्वीकारली. तर काही ठिकाणी काका शरद पवार यांचा हात धरला, मात्र 29 महापालिकांमध्ये कुठेच राष्ट्रवादीची उत्तम कामगिरी झाली नाही, उलट त्यांना सपाटून मार खावा लागला. त्याची कारणमीमांसा –

1) महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आहेत. मात्र महापालिका निवडणुकात हे तिघे कुठेच एकत्र दिसले नाहीत. अजितदादांनी भाजपसोबत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, पण तो त्यांच्यासाठी अतिशय मारक ठरला. खरंतर पुणे हा भारतीय जनता पक्षाचा गड आहे, त्यामुळे तिथे अजित दादांनी भाजपची साथ सोडायला नको होती. या निर्णयाचा फटका त्यांना चांगलाच बसला.

2) काही ठिकाणी अजित पवार एकटे लढले. मात्र पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या काही ठिकाणी त्यांनी काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन, युती करत निवडणूक लढवली. पण अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणं हे मतदारांना रुचलं नाही.

पक्षफुटीनंतर या दोघांची दोघांची पक्षावरून, चिन्ह, नावावरून एकीकडे भांडणं सुरू आहेत, त्याप्रकरणी कोर्टात केसही सुरू आहे. मात्र एकीकडे एकमेकांविरुद्ध लढत असताना, दुसरीकडे महापालिका निवडणुकांसाठी हेच दोघे एकत्र येऊन लढल्याने, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.  काका पुतणे आपल्याला वेड्यात काढत असल्याचा समज मतदारांचा झाला आणि मतदानावर त्याचा परिणाम झाला.

3) ज्येष्ठ नेते, राजकारणी शरद पवार हे महापालिका निवडणुकांमध्ये प्रचारात कुठेच दिसले नाहीत. त्यांची एकही सभा झाली नाही, दौरे नव्हते. एवढंच नव्हे तर त्यांनी कार्यकर्त्यांशीही कुठलाही संवाद साधला नाही, एकही पत्रकार परिषदही घेतली नाही. या निवडणुकीत ते पूर्णपणे गायब होते. त्यामुळे मतदारापर्यंत ते, त्यांचा पक्ष पोहोचलाच नाही. परिणामी मतदानात त्यांच्या पक्षाला फारशी मतच पडली नाहीत.

4) दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत निवडणूक लढवली खरी, पण त्यांच्या अवघ्या एक किंवा दोन सभाच एकत्रित झाल्या. दोन्ही राष्ट्रवादीकडून मनोमिलन झाल्याचं चित्र कुठेही दिसत नव्हतं. त्यामुळे मतदारांच्या मनात अनेक प्रश्न होचे, त्यांची उत्तर मिळाली नाहीत.

5) महापालिकां निवडणुकांसाठी अजितदादाच एकटे प्रचार करत होते. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते प्रचारात फार दिसले नाहीत. तसेच प्रचारादरम्यान अजितदादांनी अनेक वचनं दिली, घोषणा केल्या पण त्यांचा फोलपणा मुख्यमंत्र्यांनीच लक्षात आणऊन दिल्याने ते उघड पडले. एवढंच नव्हे तर नको ती भाष्य करूनही अजित पवार हे वादात अडकले. त्यामुळे प्रतिमा मलिन झाली आणि त्यांना मतदारांनी कौल दिला नाही.

महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा.
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?.
25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; महायुतीचा ऐतिहासिक विजय
25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; महायुतीचा ऐतिहासिक विजय.
25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटली
25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटली.
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.