Maharashtra Day Celebration 2026 LIVE : गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
Maharashtra Day Celebration 2026 LIVE in Marathi : आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. राज्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र भाषिक राज्य अस्तित्वात आलं. हा केवळ भाषेचा लढा नव्हता. तर स्वाभिमान आणि अभिमानाचा लढा होता. मराठी राज्य अस्तित्वात आलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत देशाला घडवणारं राष्ट्र अस्तित्वात आलं. दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र अशी डौलदार आणि शानदार बिरुदावली महाराष्ट्राला मिळाली. आजही देशाच्या विकासात, प्रगतीत महाराष्ट्र सर्वात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम वेळोवेळी केलं आहे. आज सकाळीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील प्रशासकीय इमारती काल रात्रीपासून रोषणाईने उजळून निघाल्या.
तर काल विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध होण्याचा मार्ग काँग्रेसमुळे मोकळा झाला. काँग्रेसने महाविकास आघाडीत दुसरा उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे निवडणूक टळली. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सातव या उभ्या आहेत. राज ठाकरे हे मराठी हृदयसम्राट असे बॅनर पुण्यात झळकले आहेत. मराठी बोलणार नाही अशी हिंमत येते कुठून असा सवाल ठाकरे यांनी काल सभेत विचारला.
LIVE NEWS & UPDATES
-
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले व त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आल्याने कापणीला आलेली पिके तसेच आंबा व भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
-
बीड – सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकाराच्या तत्परतेमुळे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले
बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे माणुसकीचे दर्शन घडवणारी एक सुखद घटना घडली आहे. एका व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्याला तातडीने खाली उतरवले. यावेळी पत्रकार सय्यद आलिम यांनी वेळ न घालवता त्या व्यक्तीला CPR दिला, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहिल्याने त्या व्यक्तीचा श्वास परतला. विशेष म्हणजे, स्वतःचा पाय फ्रॅक्चर असतानाही समाजसेवक नितीन जगताप यांनी तत्काळ आपल्या वाहनातून पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याने एकत्र येत एका व्यक्तीचा जीव वाचवल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या घटनेचे आणि पत्रकाराच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
-
-
बागेश्वर महाराजांचे विधान म्हणजे इतिहास बदलून टाकायचा प्रयत्न – जयंत पाटील
बागेश्वर महाराज आणि अमृत स्वरूपानंद महाराज हे एकमेकांना मदत करून नको ते वारू लोकांच्या मध्ये घुसवायचा प्रयत्न करत असून त्यातून कालांतराने इतिहास बदलून टाकायचा सर्व प्रकार असल्याची, भीती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
-
अलिबाग : कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी
सलग सुट्ट्या आणि विकेंडचा योग जुळून आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. विशेषतः नागाव बीच, काशीद बीच, वरसोली बीच आणि रेवदंडा बीच या किनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. राज्याच्या विविध भागांसह मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल झाले आहेत.
-
बागेश्वर महाराज, स्वरूपानंद महाराजांचे विधान म्हणजे इतिहास बदलून टाकायचा प्रयत्न – जयंत पाटील
बागेश्वर महाराज आणि अमृत स्वरूपानंद महाराज हे एकमेकांना मदत करून नको ते वारू लोकांच्यामध्ये घुसवायचा प्रयत्न करत आहेत. त्यातून कालांतराने इतिहास बदलून टाकायचा हा सर्व प्रकार असल्याची भीती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
-
-
राज ठाकरे यांना अपशब्द, कांदिवलीत तरुणाला चोप
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला कांदिवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवल्यानंतर या मुलाचा हात जोडून माफी मागतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याचे धाडस एनसीईआरटीने केले, त्यामागे कोण – जयंत पाटील
मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकण्याचे धाडस एनसीईआरटीने केले आहे, पण त्यामागे कोण आहे,याचा शोध घेतला पाहिजे,अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
-
पुणे-मुंबई एक्सप्रेसचा ‘मिसिंग लिंक’ लोकार्पणाने वाहतूक कोंडीतून सुटका
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक जलदगतीने या मिसिंग लिंकच्या रस्त्यावरून सुरू झाली आहे. मुंबईवरून येताना बोरघाट,खंडाळा या घाटातून येत असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. आता मात्र, या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका झाली आहे.
-
नागपूरमध्ये एकाचवेळी विवाहीत मुलगी आणि आईने आयुष्य संपलं
नागपूरमध्ये एकाचवेळी विवाहीत मुलगी आणि आईने आयुष्य संपलं
घटनेनं शहरात मोठी खळबळ
नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
संगीता ढबाले (आई) तर आकांक्षा ब्रम्हे मुलगी अशी मृतांची नावं
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
-
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दरवाढीवरून मनसे आक्रमक
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दरवाढीवरून मनसे आक्रमक
दरवाढीच्या विरोधात नयन कदम यांचा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा
मनसेच्या इशाऱ्यानंतर वन विभागाची माघार
नवीन दरवाढीला स्थगिती
-
धुळे जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
धुळे जिल्हा तापला, उष्णतेमुळे नागरिक हैराण
धुळे जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
गेल्या महिनाभरापासून चाळीस अंशाच्या पुढे तापमान
वाढत्या तापमानामुळे दुपारच्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट
-
अखेर पाच तासानंतर पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी सुरळीत
अखेर पाच तासानंतर पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी सुरळीत
मिसिंग लिंकचे उद्घाटन आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी
तब्बल पाच तासांनंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात पोलिसांना यश
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल
-
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी… खालापूर टोलनाका ते बोरघाट पर्यंत वाहतूक कोंडी…सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गावाला जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी… कोंडी सोडवण्यासाठी रायगड पोलिसांची दमछाक…..
-
मुंबई-पुणे महामार्गावर ट्राफिक, सुप्रिया सुळे 2 तास अडकल्या
मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीत सुप्रिया सुळे अडकल्या…. आज मुंबईहून पुण्याकडे जाताना प्रचंड वाहतूक कोंडी… सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी…
-
उद्धाटनाआधीच पाहणी ही मोदींची सवय शिंदेंना लागलीय-सपकाळ
उद्धाटनाआधीच पाहणी करणं ही मोदींची सवय शिंदेंना लागलीय… शिंदेंनी मिसिंग लिंकच्या केलेल्या पाहणीवरुन हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा… तर, मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्यायचं की नाही हे सरकार ठरवेल… सपकाळांची प्रतिक्रिया…
-
मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद
मिसिंग लिंकमधील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद… जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीजमध्ये नोंद… गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द…
-
वाहतूक कोंडीत अडलेल्या नागरिकांना झाली अजित पवारांची आठवण
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली बोरघाट आणि खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. यात अनेक प्रवासी अडकले आहेत. मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत,मात्र या वाहतूक कोंडी मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव भासत असल्याचं नागरिकांनी सांगितलं.
-
सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे उद्घाटन आहे आणि आज महाराष्ट्र दिन आणि उद्या परवा सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे अनेक पर्यटक बाहेर पडलेत. त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे API स्वप्नील पाटील यांनी सांगितले आहे.
-
गोदावरी नदी पात्रात दोन जण बुडाले
परभणीच्या मर्डसगाव शिवारात गोदावरी नदी पात्रात दोन जण बुडाले आहेत. गोदावरी पात्र ओलांडून घरी जात असताना घडली घटना. दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या शिवारात आढळल्याने, घातपात का आणखीन काही या संदर्भात संशय व्यक्त केला जात आहे.
-
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी महेश चेमलानी उर्फ मार्को याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वनराई पोलिसांनी या प्रकरणी १२ व्या आरोपीला अटक केली आहे.
-
भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट
गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवस तापमान 43 ते 44 अंशांवर होते, तर सध्या ते 42 अंशांवर आले आहे.
-
425 अधिकारी व अंमलदार यांना सी-60 सेवा पदक जाहीर
महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिवशी एकूण 145 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह तसेच 425 अधिकारी व अंमलदार यांना सी-60 सेवा पदक जाहीर. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह तसेच सी-60 सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान. सी-60 जवानांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2026 या वर्षी प्रथमच सी-60 सेवा पदक जाहीर. पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हे महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.
-
विद्यार्थ्यांची घट रोखण्यासाठी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय
यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या चार किलोमीटर अंतरावरील किन्ही ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची घट रोखण्यासाठी मोठा उपाय. इयत्ता ६ वी ते ८ वी विद्यार्थ्यांच्या वडिलांना घरपट्टी कायमस्वरूपी माफ. १ मे २०२६ रोजी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव. गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न.
-
शक्ती पीठ महामार्गात जमिनी जाणारे शेतकरी आक्रमक
हिंगोलीत शक्ती पीठ महामार्गात जमिनी जाणारे शेतकरी आक्रमक. पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत प्रशासनातील बैठक सुरू असताना शक्ती पीठ महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांसोबत हिंगोली लोकसभेचे खासदार ही आक्रमक. काही ही झालं तरी आम्ही एक इंच ही जमीन देणार नाही म्हणत शेतकरी आक्रमक.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी संदर्भात अडचण येत असल्याची तक्रार असून गेल्या अनेक दिवसांपासून कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना कामे वेळेत करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-
मुंबई हुन पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी
खालापूर टोलनाका ते बोरघाट पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्या आणि मिसिंग लिंकचं लोकार्पण सोहळा पार पडत आहे त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सलग सुट्यांमुळे मुंबईकर पर्यटक घराबाहेर पडलेत त्यामुळे मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी वाढली आहे.
-
जळगावात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर..
अत्याचार करण्यास विरोध केल्याने तरुणाकडून लाथा बुक्क्यांनी पोटावर पाठीवर तरुणीला बेदम मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.. या घटने दरम्यान तरुणीला मारहाण करत तरुण तिचा मोबाईल व शैक्षणिक कागदपत्र घेऊन पसार झाल्याची माहिती समोर. भागवत गोविंदा चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे…
-
जळगावच्या तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली, तापमान 42 अंशांवर
जळगावच्या तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली आहे, तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत घसरला. जळगावमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचला होता. आता तो खाली घसरलाय, पण तापमानात घट झाली असली तरी वातावरणातला उकाडा मात्र कायम आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान चाळीशी पार गेल्यामुळे उकाडाच्या त्रासामुळे जळगावकर हैराण झालेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
-
जळगावच्या तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली आहे, तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत घसरला
जळगावच्या तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली आहे, तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत घसरला आहे. जळगावमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचला होता, तापमानात घट झाली असली तरी वातावरणातला उकाडा मात्र कायम आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान चाळीशी पार गेल्यामुळे उकाडाच्या त्रासामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाकडून तसेच मंत्र्यांकडून आवाहन करण्यात आलं आहे.
-
महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित पॅंथरच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
बीड : कामगार कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कामगार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलले. बंद बॉटलमध्ये असलेले ज्वलनशील पदार्थ अंगावरती टाकून तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी दलित पॅंथरच्या युवक जिल्हाध्यक्षाला तात्काळ ताब्यात घेतले.
-
अहिल्यानगर – शेवगावमधील बॉम्बे मशिनरी स्टोअर्सच्या गोडाऊनला भीषण आग
शेवगावमधील बॉम्बे मशिनरी स्टोअर्सच्या गोडाऊनला सकाळी सहाच्या सुमारास आग लागल्याने परिसरात खळबळ माजली. काही क्षणांतच धुराचे मोठे लोट उसळले नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे प्रमाण वाढल्याने अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
-
बीड जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा, डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा.
बीड जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा, डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. तीन ते चाXर दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. टँकर लवकर सुटत नसल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याची माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली. दरम्यान प्रशासनाकडे याबाबतची माहिती उपलब्ध नाही. नागरिक पॅनिक होत असून डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन गर्दी करत आहेत
-
सांगलीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे हस्ते ध्वजारोहण
सांगलीमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला . पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलिसातील उल्लेखनीय कामगिरी व जाणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
-
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली असून मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वीकेंड मुळे एक्सप्रेसवर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा असून अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांचा पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
-
चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेच्या युनिटमध्ये बिघाड
चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेच्या युनिट क्रमांक 6 मध्ये बिघाड आल्याने वीज उत्पादनात काही प्रमाणात घट.. ट्यूब लिकेज मुळे युनिट बंद पडल्याची महाऔष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांची माहिती. ट्यूब लिकेजला च्या दुरुस्तीसाठी लागणार जवळपास 24 तास, उद्या सकाळपर्यंत युनिट पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता.
-
जालन्यात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज जालन्याच्या पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री तथा जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय, यावेळी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
-
परतूरचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं निधन
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय.सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून 2009 साली नेतृत्व केलं.काँग्रेस पक्षानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.पहाटेच्या वेळेला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात नेलं असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
-
व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये तब्बल ९९३ रुपयांची वाढ
घरगुती गॅस दर स्थिर असताना १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
-
यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे- देवेंद्र फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र दिन हा आत्मपरिक्षणाचा दिन आहे.
-
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना माध्यमांशी संवाद साधताना अश्रू अनावर
पालकमंत्री म्हणून आज बीडमध्ये पहिल्यांदाच केले ध्वजारोहण. अजित पवार यांनी बीडकरांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार. अजित दादांची आठवण.. सुनेत्रा ताई पवार यांना भावना व्यक्त करताना अश्रू झाले अनावर.
-
नाशिकच्या 23 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
नाशिकच्या 23 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले. पोलीस निरीक्षक ,सहाय्यक पोलीस निरीक्षक हवालदार शिपाई यांना सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले. नाशिक शहर पोलीस दलातील दहा आणि सीआयडी विभागातील एका अधिकार्याचा समावेश आहे. पुरस्कारामुळे नाशिक पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नाशिक शहराचा ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले.
-
सर्वजण एकत्र येऊन विकासात्मक काम करू-सुनेत्रा पवार
सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगादर दिन आणि बौध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. सर्व शहिदांना श्रद्धांजली आणि कृतज्ञता व्यक्त करते. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करते. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा दादांनी संकल्प केला होता. आदरणीय अजित दादांनी अनेक निर्णय घेतले. जिल्हाला ते एक वेगळी दिशा देतील असं वाटलं होतं. बीड जिल्ह्याचं स्वप्न पुर्ण करण्याची आणि विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. आपल्या सर्वांना आवाहन करते आपण सर्वजण एकत्र येऊन विकासात्मक काम करू, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
-
मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो. हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचा स्मरण आज कर्म प्राप्त आहे त्यांना सगळ्यांना मी अभिवादन करतो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक योजना यशस्वी करत आहोत. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक योजना आपण महाराष्ट्रात राबवत असतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दावसमध्ये जाऊन अनेक करार केले.या करण्याचा परिणाम म्हणून संभाजीनगर जिल्ह्याला सर्वांनी पसंती दिली. नाशिक, ठाणे, पुणे प्रमाणे संभाजीनगरला आता वेगळे स्थान निर्माण झाल आहे. आपण जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
-
उद्धव ठाकरे यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संजय राऊत, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अनिल देसाई यांसह पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
-
मिसिंग लिंक हा जगातील सगळ्यात मोठा रुंद पुल
मिसिंग लिंक हा जगातील सगळ्यात मोठा रुंद पुल आहे आणि जगातील महान इंजिनियर यांच्या माध्यमातून उभा झालेला हा पुल आहे आणि हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर मुंबई पुणे येथील सर्व ट्राफिक आहेत ते संपणार आहे. मुंबई पुणे अंतर दहा किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई पुणे काँटम कोरीडोर आहे तो कॉरिडॉर करण्याकरिता मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणे हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
भाषेच्या आधारावर ते हिंसा विवाद योग्य नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणीही मर्यादित लोकांनी राहावं अशी संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राची नाही राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र धर्म शिकवला त्यामध्ये देखील हे अपेक्षित नाही आणि मला अभिमान आहे की मी देशाच्या कुठल्याही भागात गेलो की त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये मराठी माणूस हा भर टाकताना दिसत आहे.आणि भाषेचा विषय पाहिला तर स्वभाषेचा अभिमान हा राहिलाच पाहिजे मराठी भाषेचा अभिमान हा राहिलाच पाहिजे महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे आणि मला निश्चित वाटतं की जे जे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील जे शिकले नाहीत त्यांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू .परंतु भाषेच्या आधारावर ते हिंसा विवाद योग्य नाही. भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
सर्व महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र स्वराज्य आणि स्वराज्य हा संदेश या मातीने दिला तो हा महाराष्ट्र आहे. थोर समाज सुधारक ज्या ठिकाणी सुधारण्याचा आंदोलन केलं तो हा महाराष्ट्र आहे. भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीचा अखंड मिळावा ज्या ठिकाणी तयार झाला हा तो महाराष्ट्र आहे. 106 हुताम्यांच्या बलिदानानंतर तयार झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र आहे. देशातील पावर हाऊस ग्रोथ इंजिन असलेल हा महाराष्ट्र आहेयआणि हा महाराष्ट्र देशाला दिशा देत आहेय महाराष्ट्र गीतामध्ये आपण बोलतो दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि हे अनेक शेकडो वर्ष हे महाराष्ट्राने दाखवून दिलेला आहे म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांकरिता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.
-
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ध्वजवंदन
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. पालकमंत्री नसतांना सलग पाचव्यांदा महाजनांकडून ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. कार्यक्रमस्थळी विशेष पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
-
बीडमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री यांच्या हस्ते आज बीडमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण झाले.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हे ध्वजारोहण झाले. बीडच्या पालकमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा बीडचा पहिलाच दौरा आहे. यामुळे या दौर्याला महत्त्व आहे. त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले आणि जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्या पुढील दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.
-
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण
१ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात आज ध्वजारोहण करत आहेत. आज प्रत्येक जण एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतात.
-
हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
आज महाराष्ट्र दिन निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडत आहेत. मुंबईतील हुतात्मा चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्म्यांना अभिवादन केले. राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना मानवंदना देत मुख्यमंत्र्यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published On - May 01,2026 8:01 AM
