कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्सने (Force Motors) महाराष्ट्र सरकारला 50 ट्रॅक्स रुग्णवाहिका (Trax Ambulance) दिल्या आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द
Force Motors - Trax ambulance

नांदेड : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, अनेक वाहन उत्पादक कंपन्या मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्सनेही (Force Motors) महाराष्ट्र सरकारला 50 ट्रॅक्स रुग्णवाहिका (Trax Ambulance) दिल्या आहेत. कोरोना संसर्गाविरूद्धच्या लढ्यात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नांदेड जिल्ह्यात या रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. (Maharashtra govt deploys 50 Trax ambulances in Nanded given by Force Motors)

राज्य सरकारने एक निवेदनात म्हटले आहे की, या रुग्णवाहिका 1 मेपासून सेवांमध्ये दाखल करण्यात आल्या असून राज्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्व भागात संसर्गजन्य रुग्णांची ने-आण करणासाठी त्यांचा वापर केला जाईल. या रुग्णवाहिका सर्व नवीन नियमांशी अनुरुप आहेत आणि आरोग्य विभाग, सरकारी रुग्णालये यासह आपत्कालीन सेवांसाठी योग्य आहेत.

फोर्स मोटर्सचे सेल्स अँड मार्केटींगचे अध्यक्ष आशुतोष खोसला म्हणाले की, “जिल्ह्यातील सर्व भागातील रूग्णांना मदत करण्यासाठी नांदेड प्रशासनाने फोर्स प्लॅटफॉर्मवर आपला विश्वास दाखवल्याचा आम्हाला अभिमान आहे. हेल्थ केअर सिस्टिम बळकट करण्यासाठी आणि कोरोना संसर्गाविरूद्ध लढण्याच्या या उदात्त उपक्रमाचा भाग होऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे.”

फोर्स मोटरने सांगितले की, ट्रॅक्स अँब्युलन्स एक मजबूत आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका आहे, जी सर्व क्षेत्रात प्रभावी आहे. पुढच्या पिढीच्या गरजा लक्षात घेऊन या रुग्णवाहिका तयार केल्या आहेत.

महिंद्राकडून ऑक्सिजनचे वितरण

महिंद्रा कंपनीनेदेखील या कोरोना साथीच्या आजारात लोकांना मदत करण्यासाठी बोलेरो पिकअप ट्रकचा वापर केला आहे. त्याच्या मदतीने ही कंपनी ऑक्सिजनचे वितरण करत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने या उपक्रमाला Oxygen on Wheels असे नाव दिले आहे. या उपक्रमाद्वारे गरजूंपर्यंत आणि रुग्णालयात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम केले जात आहे.

संबंधित बातम्या

कोरोना रुग्णांसाठी Hyundai India कडून 20 कोटी रुपयांचं मदत पॅकेज, महाराष्ट्रासह पाच राज्यांना लाभ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धाबे दणाणले, तिसरी लाट कशी असेल?; जगाची तयारी काय? वाचा सविस्तर

(Maharashtra govt deploys 50 Trax ambulances in Nanded given by Force Motors)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI