Maharashtra Board HSC Result : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, आज जाहीर होणार निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आणि दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल mahresult.nic.in आणि इतर अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.

Maharashtra HSC Result 2025 Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच ५ मे २०२५ रोजी जाहीर (Maharashtra HSC 12th result) करणार आहे. मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे.
निकालासाठीची अधिसूचना जारी
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Maharashtra HSC 12th result) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून, तो आज निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.
Check Maharashtra Board 12th Result 2025 LIVE Link Here (महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल २०२५ पाहा लाईव्ह)
निकालाची आकडेवारी आणि वैशिष्ट्ये जाहीर
हा निकाल जाहीर होण्यापूर्वी, आज सकाळी ११ वाजता बोर्डाची एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राचा बारावीचा निकाल, तसेच विविध विभागांनुसार निकालाची आकडेवारी आणि वैशिष्ट्ये जाहीर केली जातील. या पत्रकार परिषदेनंतर, दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी त्यांच्या वैयक्तिक निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या विविध अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने mahresult.nic.in या वेबसाईटचा समावेश आहे.
निकाल कुठे पाहाल?
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
- sscresult.mkcl.org
- hsc.mahresults.org.in
निकाल कसा चेक कराल?
- सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
