Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

सिद्धेश सावंत

Updated on: Nov 30, 2022 | 7:25 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज मंगळवार, 29 नोव्हेंबर. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या न्यायालयीन सुनावणींकडे आज राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. पुढील आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बेळगाव सीमाप्रश्नी उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज चंपाषष्टी आहे. त्यानिमित्त राज्यातील खंडोबा मंदिरात उत्सव साजरा केला जाईल. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यार असणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींसह सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी, शहरांमधील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या अपडेट्सचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Nov 2022 08:27 PM (IST)

  आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

  पुणे :

  – आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो. आम्हाला कोणी मते देत नाही,

  – मते देण्याच्या वेळी अनेक जण आमच्याकडे पाठ फिरवतात,

  – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत,

  – रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकऱ्यांसमोर व्यक्त केली खंत,

  – रिक्षा चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज ठाकरेंची घेतली भेट

 • 29 Nov 2022 06:13 PM (IST)

  सीमावादाचा प्रश्न मध्येच कसा वर येतो?

  Marathi News LIVE Update

  सीमावादाचा प्रश्न मध्येच कसा वर येतो?

  लक्ष वळविण्यासाठी सीमावादाच प्रश्न समोर आणण्यात आला

  राज ठाकरे यांचा निशाणा नेमका कोणावर

  राज्यपाल कोश्यारी यांना कोणी स्क्रीट लिहून देतं का?

  राज ठाकरे यांनी केली टीका

 • 29 Nov 2022 06:04 PM (IST)

  कोल्हापुरच्या दौऱ्यानंतर कोकणचा दौरा करणार

  Marathi News LIVE Update

  कोल्हापुरच्या दौऱ्यानंतर कोकणचा दौरा करणार

  पुढचा दौरा पश्चिम महाराष्ट्रात असेल

  अंबाबाईच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात करणार-राज ठाकरे

  पदाधिकाऱ्यांशी बोलून निवडणुकांबाबत पुढची पावलं टाकणार

 • 29 Nov 2022 05:03 PM (IST)

  कृषीमंत्री महिला मंत्र्यांना शिव्या देतात, पण कारवाई नाही

  Marathi News LIVE Update

  कृषीमंत्री महिला मंत्र्यांना शिव्या देतात, पण कारवाई नाही

  मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कान टोचणी केलेली नाही, आदित्य ठाकरे यांचा आरोप

  आंदोलनं केली की शेंबडी पोरं म्हटलं जातं, विरोधकांवर आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

  राज्यातून अनेक मोठे प्रकल्प गुजरात राज्यात गेले,

  आमच्यावर टीका केली, आम्ही खोटं बोलत आहोत, असा आरोप करण्यात येत आहे

  वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल धादांत खोटं बोलल्या जात आहे- आदित्य ठाकरे

 • 29 Nov 2022 04:27 PM (IST)

  कोल्हापूरमध्ये राज ठाकरे यांचे जंगी स्वागत

  Marathi News LIVE Update

  कोल्हापूरमध्ये राज ठाकरे यांचे जंगी स्वागत

  कोकण दौऱ्याआधी ठाकरेंचं कोल्हापूरात आगमन

  राज ठाकरे कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

  कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे केले जंगी स्वागत

  कोल्हापूरमध्ये मनसैनिकांची बाईक रॅली

  ताराराणी चौकात ठाकरे यांचे स्वागत

 • 29 Nov 2022 04:12 PM (IST)

  नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

  Marathi News LIVE Update

  उद्धव ठाकरे हे कधीही आंदोलनात गेले नाहीत

  महाराष्ट्राची एक इंचही जागा जाणार नाही

  नारायण राणे यांची सीमाप्रश्नी प्रतिक्रिया

  सीमावादावर शरद पवार आता बोलायला लागले आहेत

  आदित्या ठाकरेंचा केला पिल्लू असा उल्लेख

 • 29 Nov 2022 02:52 PM (IST)

  दिलासादायक! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची वाढ

  पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची वाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज प्राप्त

 • 29 Nov 2022 02:45 PM (IST)

  वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक

  पुणे : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, जगदीश गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी, पोलीस स्टेशनमध्येच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

 • 29 Nov 2022 02:01 PM (IST)

  10 ते 12 झोपडपट्ट्या जळून खाक

  कोल्हापूर: शिवाजी पार्क परिसरातील झोपडपट्यांना मोठी आग, 10 ते 12 झोपडपट्ट्या जळून खाक, अग्निशमन दलाच्या एकूण 6 गाड्या घटनास्थळी, शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

 • 29 Nov 2022 01:32 PM (IST)

  Ruturaj Gaikwad च्या विक्रमी 7 सिक्सवर आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया

  Ruturaj Gaikwad विक्रमावर आई-वडिलांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, म्हणाले....वाचा सविस्तर....

 • 29 Nov 2022 01:32 PM (IST)

  इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल

  'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावरील टिप्पणीचा वाद

  इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल

  सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने पोलिसांत दाखल केली तक्रार

  'द काश्मीर फाइल्स'ला म्हणाले असभ्य आणि प्रचारकी

 • 29 Nov 2022 01:03 PM (IST)

  शिवसेना पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात होणार सुनावणी

  12 डिसेंबरला होणार सुनावणी

  चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गट युक्तिवाद करणार

  दोन्ही गटांचे वकील युक्तिवाद करणार

 • 29 Nov 2022 12:56 PM (IST)

  राज ठाकरे साताऱ्यामध्ये दाखल 

  राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

  साताऱ्यामार्गे कोल्हापूरसाठी होणार रवाना

  अमित ठाकरेसुद्धा राज ठाकरेंच्या सोबत
 • 29 Nov 2022 12:13 PM (IST)

  श्रद्धा वालियार हत्या प्रकरण : आफताबची नार्को टेस्ट होणार

  श्रद्धा वालियार हत्या प्रकरण

  आरोपी आफताबची 1 डिसेंबर ला नार्को टेस्ट होणार

  नार्को चाचणी पूर्वीच्या सर्व तपासण्या पूर्ण

  दिल्ली पोलीस आफताब ची करणार नार्को टेस्ट

 • 29 Nov 2022 12:01 PM (IST)

  संजय राऊतांवर हल्ला होऊ शकतो- भुजबळ 

  संजय राऊतांच्या जीवाला धोका असल्याचे भुजबळांचे मत

 • 29 Nov 2022 11:04 AM (IST)

  उद्या सकाळी विरोधी पक्षांची बैठक

  उद्या सकाळी 11 वाजता विरोधी पक्षांची बैठक, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व विरोधी पक्षांची बैठक, अजित पवार यांच्या दालनात होणार बैठक, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गटाचे नेते होणार सहभागी

 • 29 Nov 2022 10:17 AM (IST)

  10 डिसेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांचा रत्नागिरी दौरा

  रत्नागिरी- राज्याचे मुख्यमंत्री येणार रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर, 10 डिसेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांचा रत्नागिरी दौरा, राज्यातील पहिल्या मिनी तारांगणाचा करणार शुभारंभ, कोकणातील पहिली जाहिर सभा सुद्धा घेणार

 • 29 Nov 2022 09:57 AM (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

  सात वर्षानंतर राज ठाकरे कोल्हापुरात

  मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं ताराराणी चौकात होणार जल्लोषी स्वागत

  राज ठाकरे सायंकाळी चार वाजता कोल्हापुरात येणार

  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार

 • 29 Nov 2022 09:56 AM (IST)

  बैलगाडा शर्यतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  बैलगाडा शर्यतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र सरकार कडून ॲड. तुषार मेहता युक्तिवाद करणार, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून वकील गौरव अग्रवाल युक्तिवाद करणार

 • 29 Nov 2022 09:27 AM (IST)

  नाशिकमध्ये लम्पी आजारामुळे 79 जनावरे दगावली

  नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत लम्पी या आजाराने 79 जनावरे दगावली

  62 जनावरांच्या मालकांना शासकीय मदत प्राप्त

  जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 609 जनावरांना लम्पी आजाराची बाधा

  1 हजार 232 जनावरे आजारातून पूर्णपणे बरे

  जिल्ह्यात आतापर्यंत जनावरांचे 99.99 टक्के लसीकरण

  नाशिक जिल्हा परिषदेने दिली माहिती

 • 29 Nov 2022 09:21 AM (IST)

  रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

  पुणे : रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला, पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेणार भेट

 • 29 Nov 2022 09:05 AM (IST)

  पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक 

  सर्वर डाऊन असल्याने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना येत आहे अडचण

  अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी

  अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

 • 29 Nov 2022 09:02 AM (IST)

  सोलापुरात गोवरचे दोन संशयित रुग्ण

  सोलापुरात गोवरचे दोन संशयित रुग्ण आढळले

  त्यांचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत

  त्यापैकी एका रुग्णाला उपचार करून सोडून देण्यात आले

  तर दुसऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  सोलापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी स्वराज लोहार यांची माहिती

 • 29 Nov 2022 08:54 AM (IST)

  आमदार रोहित पवारांना मोठा धक्का

  अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना मोठा धक्का, अखेर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले भाजपात जाण्याच्या तयारीत

 • 29 Nov 2022 08:25 AM (IST)

  वर्धा नदीत पहाटे ट्रक कोसळला

  चंद्रपूर :  राजुरा ते बल्लारपूर मार्गावर असलेल्या वर्धा नदीत पहाटे ट्रक कोसळला, एकाचा मृत्यू, ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात

 • 29 Nov 2022 08:03 AM (IST)

  शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा खून

  यवतमाळ : शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा खून, महागाव तालुक्यातील काळी दौलतखान येथील घटना

 • 29 Nov 2022 07:56 AM (IST)

  नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू

  नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू

  शिक्षकांकडून बनावट कागदपत्रे सादर केली जाण्याची शक्यता

  बदलीपात्र शिक्षकांच्या कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून पुन्हा होणार छाननी

  जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांचे आदेश

 • 29 Nov 2022 07:52 AM (IST)

  धावत्या टेम्पो ट्रॅव्हलरने घेतला पेट

  मालेगाव : धावत्या टेम्पो ट्रॅव्हलरने घेतला पेट, चांदवडच्या राहूड घाटातील घटना, टेम्पो मधील 16 प्रवासी अगदी थोडक्यात वाचले

 • 29 Nov 2022 07:50 AM (IST)

  कासारवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

  नाशिक : सिन्नर तालुक्यातील कासारवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून बिबट्याने 200 कोंबड्या फस्त केल्याची समोर

 • 29 Nov 2022 07:41 AM (IST)

  रत्नागिरी- पतितपावन मंदिर स्वातंत्रवीर सावरकरांनी बांधल्याच्या ट्टिटवरून वादंग

  भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं होतं ट्विट

  ट्टिटवरून चित्राताई वाघ यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी  काँग्रेस आक्रमक

  भागोजीशेठ किर यांनी बांधलेल्या मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा वाघ यांनी केला होता उल्लेख

 • 29 Nov 2022 07:20 AM (IST)

  गुरुवारी पुण्यात पाणीबाणीची शक्यता

  पुणे : गुरुवारी शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद, बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड, शिवाजीनगर याभागात पाणीपुरवठा होणार नाही, जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद

 • 29 Nov 2022 07:18 AM (IST)

  सत्तासंघर्षाची सुनावणी पुढील आठवड्यात?

  नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता, आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, घटनापीठातील पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर

 • 29 Nov 2022 07:13 AM (IST)

  राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर, राज ठाकरे सकाळी पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना होणार, कोल्हापुरात राज ठाकरे महालक्ष्मीचं दर्शन घेणार, कोल्हापूरहून राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार

Published On - Nov 29,2022 7:12 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI