Maharashtra News LIVE : कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोकण-पश्चिम महाराष्ट्रासाठी मोफत बससेवा
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दुपारी १२ वाजता मांजरसुंबा येथे मराठा समाजाच्या बांधवांशी इशारा बैठक घेणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाला आगामी मुंबई आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनिती काय असेल, याबाबत मार्गदर्शन करतील. परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि जालना येथील यशस्वी दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा बीड दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात द्राक्ष उत्पादन वाढीवर परिसंवाद होणार आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. आता सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोकण-पश्चिम महाराष्ट्रासाठी मोफत बससेवा
खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कल्याण लोकसभेतील विविध भागांतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या मोफत 900 बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यासह खासदार शिंदेंनी मोफत बससेवेचा शुभारंभ केला. खासदार शिंदे यांच्याकडून उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पूर्व, दिवा, कळवा आणि डोंबिवली या भागातील गणेशभक्तसांठी ही खास सोय करण्यात आली. कोकणकरांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांना समाधान मिळाल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं.
-
संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांच्या गोंधळ
संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांच्या गोंधळ झाला आहे. कार्यकर्त्यांनी स्टेजजवळ गोंधळ केल्याने पोलिसांचा कार्यकर्त्यांना काठीचा प्रसाद दिला. तसेच या गोंधळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान पोलिसांचे नियोजन कोलमडले.
-
-
लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा फोटो
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. अशात सर्वच गणेश भक्तांची गणेशोत्सवासाठी लगबग सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 92 वं वर्ष आहे.
-
रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईत, खेडमधील नियमित बसफेऱ्या रद्द
गणेशोत्सवानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईत पाठवण्यात आल्याने खेड तालुक्यात ग्रामीण भागातील नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ग्रामीण वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. खेड आगारात प्रवाशी तासंतास अपेक्षित मार्गावरील बसच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे खाजगी वाहनांचा आधार घेणाऱ्यांना दुप्पट-तिप्पट भाड्याचा बोजा सहन करावा लागत आहे.
-
जोवर सत्य स्वीकारणार नाही, तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील – फडणवीस
देवेंद्र फडणवीस विरोधकांवर बोलताना म्हणाले की, ‘2014 मध्ये मोदी जिंकले तेव्हा काँग्रेसचे देशात आणि राज्यात सत्ता होती. 15 वर्षा पासून सत्ता होती. जोवर हे विचार करणार नाही की आपण का हरतो आहे, जनतेने आपल्याला का नाकारले आहे, याचा अभ्यास केला नाही तर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील.
-
-
जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात मुसळधार पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान
जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आव्हाने शिवारात काही भागांमध्ये केळी जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. केळीचे गड लागलेले खोड पावसामुळे जमीन दोस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
-
शिर्डी: साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के दरवाढ
शिर्डी साईबाबा संस्थानतर्फे विक्रीस असलेल्या बुंदी लाडू प्रसादाचा दर 50 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार आहेत.. या दरवाढीमुळे साईभक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.
-
संग्राम भंडारे यांच्या किर्तन करण्याच्या पद्धतीमुळे वारकरी संप्रदायात खळबळ
किर्तनकार संग्राम भंडारे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत आहेत. आता त्यांना वारकरी संप्रदायाने सुनावलं आहे. किर्तन परंपरेत हिंसा करण्या-याचं उदात्ती करण करणे चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत तरुण कीर्तनकार सौरभ शिंदे केलं आहे. तसेच जेष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यास ह.भ.प श्यामसुंदर सोनार यांनी देखील कीर्तनाच्या माध्यमातून अनेकजण विष पसरवत असल्याचं म्हटलं आहे.
-
सरकार बोलतंय एक अन् करतंय एक, सुशिलकुमार शिंदेंचा हल्लाबोल
केंद्र आणि राज्य सरकार हे बोलतंय एक आणि करतंय एक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा हल्लाबोल
पराभव झाला म्हणून काही होत नाही, आम्ही 3 वेळा पराभूत होऊनही उभे राहिलो – सुशिलकुमार शिंदे
1973-74 साली काँग्रेसला कार्यकर्ते मिळत नव्हते – शिंदे
मात्र तरीही झोपडपट्टीतून कार्यकर्ते उभे राहिले आणि काँग्रेस उभारली- शिंदे
-
नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद
नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद
मंदिरातील वादाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, व्हिडिओ व्हायरल
यापूर्वीही मंदिरात झाला होता दानपेटीवरून वाद
कपालेश्वर मंदिर परिसरात दोन परिवारात तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती
दानपेटीचा ताबा घेण्यावरून ही हाणामारी झाल्याची चर्चा
-
उद्धव ठाकरेंच्या हस्ते फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दहिसरमध्ये स्वेटहील जिम आणि फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन
उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वेटहील जिम आणि फिजिओथेरपी सेंटरचीही केली पाहणी.
शिवसेना शाखा क्रमांक ४ मधील कार्यकर्त्यांशी भेटून साधला संवाद
-
हसणाळमधील ग्रामस्थ आक्रमक, मंत्री अतुल सावेंची गाडी अडवली
मदत मिळाली नसल्याने हसणाळ येथील पुरग्रस्त ग्रामस्थ आक्रमक
हसनाळा गावात पालकमंत्री अतुल सावेंची गाडी अडवली
संतप्त ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केला रोष
सात दिवसानंतर पालकमंत्री पूरग्रस्त हसनाळ दौऱ्यावर
ग्रामस्थांकडून मदतीची मागणी
-
देव तारी, त्याला कोण मारी
आंबेगाव तालुक्यातल्या विठ्ठलवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतील एक काळजाचा थरकाप उडविणारा क्षण पाहायला मिळाला. या शर्यतीत बैलगाडा घाटात धावत असताना बैलगाड्यासमोर पळणाऱ्या घोडीवर बसलेला युवक तोल जाऊन शर्यती मधेच बैलगाडा घाटातच खाली पडला. मागून भरधाव वेगात येणाऱ्या बैलांच्या व बैलगाड्याच्या खाली आता घोडेस्वार सापडणार व त्याला मोठी दुखापत होणार असेच क्षणभर सर्वांना वाटले होते. पण घाटात पडलेले पाहून भरधाव वेगात धावत येणाऱ्या बैलांच्या दोन्ही जोड्यांनी आगदी बैल गाड्यासह युवकाच्या वरून उडी मारली आणि मोठी दुर्घटना टळली . या अपघातात बचावल्याने बैलांच्या समय सूचकतेची व मुक्या प्राण्यांच्या माणसांप्रती असणाऱ्या सद्भावनांची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
कायद्याच्या चौकटीतील आरक्षण सरकार देणार
आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० % आरक्षण दिले आहे.कायद्याच्या चौकटीत असेल ते आरक्षण दिले जाईल, असे मत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्या मोर्चासंदर्भात दिले.
-
धाराशिवच्या तुळजापूरमध्ये उभारला जाणार प्राणी संग्रहालय
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द परिसरातील वनविभागाच्या जागेत प्राणीसंग्रहालय उभारले जाणार आहे. प्राणी संग्रहालयात वाहक सिंह जिराफ यासारखे प्राणी असणार आहेत. प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची भाजप आमदारांना जगजितसिंह पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यासह पाहणी केली. पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वनविभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं राणा पाटील यांनी यावेळी सांगितलं.
-
नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी
नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होत आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही अनेक भागात काही आहे.
-
शरद पवार गटाकडून गड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम
खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळ संघटनेची साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर, गड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.लंके यांच्या या गड संवर्धन मोहिमेत खासदार निलेश लंके यांच्यासह, राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आणि जयंत पाटीलही सहभागी झाले आहेत.
-
तर 1001 रु प्रत्येकी बक्षीस
खासदार सुप्रियाताई सुळे यांचे सारखे सत्य बोलण्याचे धाडस मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी दाखवले तर 1001 रु प्रत्येकी बक्षीस देणार असे शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकाल लवांडे यांनी जाहीर केले.
-
मग लाडकी बहीण योजना बंद करू का?अजितदादा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. या विषयावर आज पुण्यात अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी थेट भूमिका न जाहीर करता “…मग योजना बंद करू का?” अशी प्रतिक्रिया दिली
-
“सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आक्रोश”
“सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आक्रोश आहे. असं वक्तव्य शहाण्या माणसाचं लक्षण नाही. वारकरी संप्रदायांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचाजाहीर निषेध केला आहे. त्यांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं. यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये,” अशा शब्दांत ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात यांनी नाराजी बोलून दाखवली.
-
नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी
नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होत आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही अनेक भागात आहे.
-
चेतेश्वर पुजाराकडून क्रिकेटला रामराम
चेतेश्वर पुजाराने क्रिकेटला रामराम केलंय. त्याने सर्व फॉरमॅट्समधून संन्सास जाहीर केलाय. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्याने संन्यास घेत असल्याची घोषणा केली.
-
अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी
पुणे- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत.
-
पंढरपूर- सांगोल्यात लांडग्याचा धुमाकूळ
पंढरपूर- सांगोल्यात लांडग्याच्या हल्ल्यात नऊ लोक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर सहा लोक किरकोळ जखमी झाले आहेत. सांगोला तालुक्यातील एखतपूर, धायटी आणि चंचोली गावातल्या नऊ लोकांवर हल्ला झाला आहे.
-
तब्बल एक तासाच्या नंतर मडगाव मांडवी एक्सप्रेस ठाणे स्थानकात आली..
24 तास अगोदरच गणेशोत्सव निमित्त कोकणवासी रांगेत उभे होते… कोकणात जाण्यासाठी गणेश भक्तांचे हाल… 7 वाजून 55 मिनिटांची गाडी 9 नंतर ठाणे स्थानक या ठिकाणी आली…. Rpf पोलिसांकडून सुरक्षेची काळजी…
-
महागणपती रांजणगाव येथे आजपासून भाद्रपद द्वार यात्रा उत्सव सुरू
अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे आजपासून भाद्रपद द्वार यात्रा उत्सव सुरू झाला असून पहाटे ३ वाजता महापुजा आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुल करण्यात आलं. चार दिवस चालणाऱ्या या द्वार यात्रा उत्सव काळात भावीक भक्तांना लाडक्या बाप्पाच्या मुर्तीला स्पर्श करत जलाभिषेक करून दर्शन घेता येणार आहे. भाद्रपद यात्रा उत्सवा निमित्त लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभारा परिसर आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलाय…
-
मत गेली कुठे? याआधीही राद ठाकरेंनी हा सवाल केला होता – संजय राऊत
मत गेली कुठे? हा प्रश्न आठ महिन्यांनंतर देखील कायम आहे… याआधीही राद ठाकरेंनी हा सवाल केला होता… मोदी मतचोरीनं सत्तेत आले हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला… ठाकरे बंधूंनी मतचोरीचा मुद्दा राज्याच्या घराघरात पोहोचवला… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आध्यात्मिक आघाडी आक्रमक
सुप्रिया सुळे यांनी आमच्या पांडुरंगाला मटन खाल्लेले चालतं केलं होतं वक्तव्य… वारकरी संप्रदायाचा सन्मान करता येत नसेल तर अपमान करू नका… मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार…
-
दादर 14 नंबर प्लॅटफॉर्मवर कोकण वासियांची गर्दी
कोकणात जाण्यासाठी दादरवरून सुरू केलेल्या मोदी एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी कोकण वासियांनी केली गर्दी… थोड्या वेळात नितेश राणे या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवणार… याआधी नितेश राणे कर स्थानकावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे…
-
शांततेत सण साजरे करा, पालघरमध्ये सलोखा राखण्यासाठी समन्वय समितीच्या बैठकीतून आवाहन
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने पालघर जिल्ह्यामध्ये सलोखा राखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी या बैठकीत शांतता समितीचे प्रतिनिधी, नागरिक आणि सर्वधर्मीय धर्मगुरूंची मते जाणून घेतली. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षकांनी दोन्ही सणांच्या शुभेच्छा देत, हे सण शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे करण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध धर्मांचे धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाविकांसाठी अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून भाविकांसाठी अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या मोहोळ तालुका शाखेने या यात्रेची व्यवस्था केली आहे. या यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक अयोध्येसह, मथुरा आणि काशी यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन सोलापूरला परतणार आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकावरून रवाना होण्यापूर्वी भाविकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
-
उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, गाणगापूरला पुराचा फटका
महाराष्ट्रातील पुणे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आणि उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे, कर्नाटकातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गाणगापूरला पुराचा फटका बसला आहे. गाणगापूर परिसरात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. गाणगापूर-विजयपूर हा महत्त्वाचा राज्यमार्ग ठप्प झाला असून, गाणगापूर-इटगा पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांतील भीमा नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर
पिंपरी-चिंचवड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात द्राक्ष उत्पादन वाढीवर परिसंवाद होणार आहे. राजकीय वर्तुळात या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीची चर्चा सुरू आहे. या व्यासपीठावरून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
पुणे महापालिकेकडून डेंग्यू डासांच्या उत्पत्ती प्रकरणी कारवाई; २१७१ जणांना नोटीस
पुणे शहरात डेंग्यू डासांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत, शहरातील २,१७१ ठिकाणी डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळले आहे. त्यासंदर्भात संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये घरे, सोसायट्या, सरकारी आणि खाजगी कार्यालये यांचा समावेश आहे. या कारवाईतून महापालिकेने ४ लाख ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
-
पुणे, साताऱ्यात घाटमाथ्यावर तुरळक पाऊस, यलो अलर्ट जारी
पुणे आणि सातारा जिल्ह्यांत आज घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून आता ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः घाटमाथ्यावर प्रवास करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावर, इशारा बैठक पार पडणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यात इशारा बैठक आयोजित केली आहे. दुपारी 12 वाजता मांजरसुंबा येथे होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये यशस्वी दौरे केल्यानंतर आता जरांगे पाटील बीडमध्ये मराठा समाजाला मुंबई आंदोलनाची पुढील दिशा देणार आहेत. त्यांनी यापूर्वीच मराठा समाजाला मुंबईतील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे, आजच्या बैठकीत जरांगे पाटील राज्य सरकारला कोणता इशारा देणार आणि आंदोलनाची पुढील रणनीती कशी असेल, याबाबत सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर मुंबई आंदोलनाची दिशा अधिक स्पष्ट होईल.
Published On - Aug 24,2025 8:56 AM
