Maharashtra Election News LIVE : मुंबई महापालिकेचा महापाैर महायुतीचाच होणार- अमित साटम
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता महापौरपदासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदं मिळावी अशी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांची भूमिका असल्याचं समजतंय.

LIVE NEWS & UPDATES
-
महापौर युतीचा होणार बोलता, मग सौदेबाजी कशासाठी? संजय राऊत
महापौर नव्हे तर स्थायी समित्यांमध्ये शिंदे यांना रस आहे. महापौर युतीचा होणार बोलता, मग सौदेबाजी कशासाठी? ब्लॅकमेल करुन दुसरं पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताय. आमचे केडीएमसीतील दोन नगरसेवक दिसत नाहीत… यावर कारवाई सुरु आहे.
-
महापौर पदासाठी फिल्डिंग सुरू, घडामोडींना वेग…
प्रबळ दावेदारांकडून विविध पातळ्यांवरून पक्षाकडे मोर्चे बांधणी सुरू, दावेदारांमध्ये मनपा राजकारणातील ज्येष्ठता , पक्षी श्रेष्ठींबरोबरची जवळीक अनुभव, शिफारस, पक्षनिष्ठता या निकषांचा केला जाणार विचार. महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार असले तरी प्रबळ दावेदारांकडून मोर्चे बांधणी
-
-
अमित साटम यांचे अत्यंत मोठे विधान, मुंबई महापालिकेच्या…
मुंबईत महायुतीत तडजोड करण्याची गरज नाही आणि मुंबईचा महापाैर हा महायुतीचाच होणार असल्याचे स्पष्ट शब्दात अमित साटम यांनी म्हटले आहे.
-
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आत्तापर्यंत 34 अर्ज दाखल
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. एका खिचडी विक्री करणाऱ्याच्या तरुणाची खीचडी रस्त्यावर फेकून दिली आहे. शहरातील जाधवमंडी येथे रात्री उशिरा शेतकरी पालेभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात. त्यामुळे याठिकाणी छोट्या छोट्या हॉटेलवर नाश्ता विक्रीसाठी तयार केला जातो.पण रात्री उशिरापर्यंत हॉटेल कशी सुरू ठेवली म्हणत पोलिसांनी हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या खिचडीचा पातेले फेकून दिले.
-
-
कल्याण खडकपाडा परिसरात खळबळ, मध्यरात्री एकाच घरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता
पहाटे घराचा मुख्य दरवाजा उघडा आढळल्याने खळबळ. 14 वर्षीय आणि दोन 13 वर्षीय मुलीचा समावेश. पहाटे उठल्यानंतर कुटुंबीयांना मुली घरात नसल्याचे लक्षात आले. परिसर, शाळा व नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलींचा पत्ता नाही. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा कुटुंबाचा संशय
-
कापुस वेचत असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग
केज तालुक्यातील एका गाव परिसरातील शेतात सासु आणि जावेसोबत कापूस वेचत असलेल्या महिलेशी आरोपी अर्जुन महादेव घुगे याने वाईट हेतुने झटापट केली. या घटनेनंतर महिलेने युसुफ वडगाव पोलिसात तक्रार दिली असुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
-
-
भाजपा शिवसेना युती आणि जागावाटप वर एकमत नाही, आज पुन्हा चर्चा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर काल रात्री दोन वाजेपर्यंत पंचतारांकित हॉटेलमध्ये खलबते झाली. परंतु युतीबाबत काहीही ठोस निर्णय झाला नाही. आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे नेते सकाळी युती बाबत पुन्हा चर्चेला बसणार आहेत
-
पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 30 जानेवारीपर्यंत; आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती
पुणे महापालिकेच्या 2026 – 27 या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून 30 जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केलं जाईल. सुमारे 15000 कोटी रुपयांपर्यंत हे अंदाजपत्रक जाणार असून यामध्ये रस्त्याची दुरुस्ती, नवीन रस्त्यांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा या कामांना विशेष प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त यांनी दिली आहे.
-
पुण्यातील बेशिस्त वाहन चालकांकडून नऊ महिन्यांत 17 कोटींचा दंड वसूल
पुण्यातील बेशिस्त वाहन चालकांकडून नऊ महिन्यांत 17 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात 1 एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 60 हजार 721 बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून 17 कोटी 18 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
-
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर तरुणींचे लपून फोटो काढणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चोप
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रवास करणाऱ्या तरुणींचे एका परप्रांतीय तरुणाने लपून मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा आरोप करत स्टेशन परिसरात गोंधळ घालण्यात आला. फोटो काढणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मराठी युवकांनी जाब विचारत चोप दिला. फोटो काढलेल्या महिला प्रवाशांनीदेखील तरुणाला धडा शिकवला आहे. आरोपीला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
-
मुंबई महापौरपदाबाबत भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही, सूत्रांची माहिती
मुंबई महापौरपदाबाबत भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश दिल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच मित्रपक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मुंबई महापौरपद आपल्याकडेच राहावं, यावर भाजप ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
-
नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती
नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून महापालिकेला पुन्हा दणका देण्यात आला आहे. लवादाने संपूर्ण अहवाल सादर केल्याशिवाय तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही झाड तोडू नये असं स्पष्ट करत स्थगिती दिली आहे.
-
जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार
पुणे- जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीची बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने ही रणनीती आखली आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिल्याने बंडखोरी टाळण्यात यश आलं होतं. जिल्हा परिषद पंचायत समितीला अनेक इच्छुक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शेवटच्या क्षणाला ए बी फॉर्म देणार आहे.
-
पुण्यातील नगरसेवकांना अजित पवारांचा संदेश
पुणेकरांनी विरोधात बसण्याचा कौल दिला असून आपण आपली कामगिरी चोखपणे पार पाडली पाहिजे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभाराचा पूर्ण अभ्यास करावा आणि पुणेकरांची बाजू प्रकल्पने महापालिकेच्या सभागृहात मांडावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिली आहे.
-
नाशिकमध्ये गोदावरी जन्मोत्सवाला सोमवारपासून सुरुवात
नाशिकमध्ये गोदावरी जन्मोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी मातेचा माघ मास जन्मोत्सव सुरू झाला आहे. पुढील बारा दिवस हा गोदावरी जन्मोत्सव सुरू राहील. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील. तर मुख्य आकर्षण 28 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता होणारा जन्म सोहळा असेल.
-
मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार
मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार आहे. मुंबईतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याचं समजतंय.
-
शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज सकाळी 11 वाजता कोकण भवनला जाणार
शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज सकाळी 11 वाजता कोकण भवनला जाणार आहेत. शिवसेना नगरसेवकांचा ताज लॅंड्स एंड हाॅटेलमध्ये मुक्कामाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांच्या भेटीसाठी एकत्र गाडीतून रवाना होणार आहेत. निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांकडे पुरावे सादर करणार आहेत.
मुंबई महापौरपदाबाबत भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश दिल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर मित्रपक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मुंबई महापौरपद आपल्याकडेच राहावं, यावर भाजप ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाण्याच्या महापौरपदासाठीही भाजपने दोन वर्षांचा दावा कायम ठेवला आहे. तर मुंबई आणि अन्य महापालिकेत महायुतीत सन्मानपूर्वक तोडगा काढा असे निर्देश दिल्लीतील नेतृत्त्वाने दिले आहेत. मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असून आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार आहे. मुंबईतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Jan 20,2026 8:05 AM
