AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : आंबा- काजू उत्पादकांचे आंदोलन चिरडले, मोर्चा निघण्याआधीच नेत्यांना उचलले

| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 8:56 AM
Share

Maharashtra News LIVE : महागाई दिवसागणिक वाढत आहे. याचा फाटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पडत असून, गृहिणींच्या महिन्याचं गणित बिघडत आहे. सोनं - चांदी, पेर्टोल - डिझेल सोबतच, भाजीपाल्यांचे दर देखील वाढले आग

Maharashtra News LIVE : आंबा- काजू उत्पादकांचे आंदोलन चिरडले, मोर्चा निघण्याआधीच नेत्यांना उचलले

गेल्या काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडताना दिसत आहे. सोनं – चांदीनंतर आता इंधनांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल – डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असून मुंबई, पुणे, नागपुरात पेट्रोलच्या दरांनी 100 चा आकडा पार केला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 106.50 रुपये, पुण्यात 106.95 रुपये आणि नागपुरात पेट्रोलचे दर 107.18 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसताना दिसत आहे. एवढंच नाही तर, मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही भागात पाणीटंचाईमुळे शेतीवर परिणाम झाल्याने उत्पादनही घटले, ज्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतींवर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक 20 – 30 टक्क्यांनी घटली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशाच देशातील, परदेशातील, राजकीय, क्रिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 May 2026 04:48 PM (IST)

    एखादा मॅटर कोर्टात असताना यापुढे कोणीही विधान करू नये – संजय शिरसाट

    आज सुप्रीम कोर्टाने उबाटा गटाच्या नेत्याला झापले आहे. ते सर्व राजकीय पक्षांना लागू आहे. एखादा मॅटर कोर्टात असताना यापुढे कोणीही विधान करू नये असं न्यायमूर्तीने खडसावलं आहे. न्यायपालिका विकली जाते, निवडणूक आयोग विकला जातो, अशी जे विधाने करणारे होते त्यांना आता लगाम लागेल असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

  • 15 May 2026 04:29 PM (IST)

    अहिल्यानगर महापालिकेची महासभा संख्याबळाअभावी तहकूब

    अहिल्यानगर महापालिकेची महासभा संख्याबळाअभावी तहकूब करण्यात आली आहे. 68 पैकी केवळ 5 नगरसेवक सभेला उपस्थित होते. भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाची महापालिकेत सत्ता आहे. बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या महासभेत व्यापारी संकुल आणि भुयारी गटार योजनेच्या कर्ज प्रस्तावावर चर्चा होणार होती. परंतू पुरेसे संख्याबळ नसल्याने महासभा पुढे ढकलली आहे. सभा तहकूब झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

  • 15 May 2026 04:18 PM (IST)

    ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात युवा सेनेची पोस्टरबाजी

    ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात युवा सेनेने पोस्टर लावले आहे.  संजय राऊत यांच्या निषेधार्थ युवासेना कोपरी पाचपखाडी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत बॅनरबाजी करण्यात आली आहे.  संजय राऊत यांनी ट्विट करून भारतीय युवकांची बदनामी केली असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

  • 15 May 2026 04:06 PM (IST)

    आंबा- काजू उत्पादकांचे आंदोलन चिरडले, मोर्चा निघण्याआधीच नेत्यांना उचलले

    राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा- काजू उत्पादकांनी वर्षावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच महादेव जानकर,राजू शेट्टी, विनायक राऊत या नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • 15 May 2026 03:58 PM (IST)

    एका वर्षात पाच लाख घरे हे ग्रामविकास मंत्रालयाचे देशातील रेकॉर्ड- फडणवीस 

    एका वर्षात पाच लाख घरे हे ग्रामविकास मंत्रालयाचे देशातील रेकॉर्ड आहे. त्यासाठी मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष करून अभिनंदन करतो, कारण एका वर्षात पाच लाख घरे ही भारतात सुद्धा कोठे बांधली गेली नाहीत, हा रेकॉर्ड आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.

  • 15 May 2026 03:45 PM (IST)

    महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील पेट्रोल पंपांवर परराज्यातील वाहनधारकांची गर्दी

    आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे इंधन दरवाढ करण्यात आलीये, तर दुसरीकडे इंधन दरवाढ झाली असली तरी दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल आवश्यक असल्याने वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील पेट्रोल पंपावर गुजरातमधील बाईक आणि कारधारक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा झाल्याचे सांगण्यात येत असून, अनेक पेट्रोल पंपावर इंधन मिळणे मुश्किल झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

  • 15 May 2026 03:33 PM (IST)

    Msrtc च्या त्या कर्मचाऱ्याचे निलंबन, मारहाण प्रकरण भोवलं

    Msrtc च्या त्या कर्मचाऱ्याचे निलंबन

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निलंबनाचे आदेश

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मारहाणीच्या त्या व्हिडीओची सरनाईक यांच्याकडून गंभीर दखल

    कारण नसून मारहाण करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याचे निलंबन

    आधी निलंबन केलं आणि मग दिले चौकशीचे आदेश

  • 15 May 2026 03:15 PM (IST)

    उभ्या कारने अचानक घेतला पेट, चाळीसगावमधील धक्कादायक घटना

    उभ्या कारने अचानक घेतला पेट, चाळीसगावमधील धक्कादायक घटना

    हॉटेलसमोर उभी असलेली कार काही क्षणात जळून खाक

    गाडीत मोठ्या प्रमाणावर इंधन असल्याने परिसरात भीतीचे वातावरण

    नागरी वस्तीमध्ये आग लागल्याने नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी

    अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग आटोक्यात आणली

    आगीत कार पूर्णपणे जळून खाक; वाहन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान

  • 15 May 2026 02:54 PM (IST)

    परभणी : अनेक पंपावर पेट्रोल-डिझेलचा नो स्टॉकचे बोर्ड

    आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत, मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊन देखील परभणी मध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा कायम आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोलचा साठा उपलब्ध नाहीये. त्यामुळे खिशाला आर्थिक झळ भासत असूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • 15 May 2026 02:40 PM (IST)

    राहता : कांद्याला कवडीमोल भाव, शेतकरी संकटात

    अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाला तोंड देणारा शेतकरी अडचणीत संकटात सापडला आहे. कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला आज कवडीमोल भाव मिळतोय. कधी काळी शेतकऱ्याला आधार देणारा हाच कांदा आज त्याच्या डोळ्यांत पाणी आणतोय. चांगल्या कांद्याला हजार-बाराशे रुपये क्विंटल, तर साधारण कांद्याला अवघे दोन-तीनशे रुपये भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

  • 15 May 2026 02:24 PM (IST)

    कल्याण : आमराई परिसरात धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास

    कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात शुभम टॉवर मध्ये राहणाऱ्या निरा भोर ही महिला रस्त्याने जात असताना समोरून बुलेट गाडीवरून दोन बाइकस्वार आले. त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र खेचले आणि ते क्षणार्धात पसार झाले. गजबजलेल्या परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 15 May 2026 02:09 PM (IST)

    कोल्हापूर : पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे नागरिक नाराज

    पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक वाढल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंधनाच्या दरावरच महागाई अवलंबून असते. आधीच महागाईचा भडका उडाला असताना पुन्हा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने हे दर तातडीने कमी करावे अशी मागणी कोल्हापुरातील नागरिकांनी केली आहे.

  • 15 May 2026 12:55 PM (IST)

    नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यू आढळल्यानंतर धुळे जिल्हा प्रशासन सतर्क

    नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यू आढळल्यानंतर धुळे जिल्हा प्रशासन सतर्क…. 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्या असून 16 लाख कुक्कुट पक्ष्यांबाबत खबरदारीचे उपाय सुरु… नंदुरबारहून होणाऱ्या पक्षी-अंडी वाहतुकीवर बंदी…

  • 15 May 2026 12:45 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

    गडचिरोली जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा… धानाच्या आधारभूत किमतीत यावर्षी 72 रुपयांची दरवाढ… कापसाचे दर 557 रुपयांनी वाढले… केंद्र सरकारने केली आधारभूत किंमतीत वाढ…

  • 15 May 2026 12:22 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. माजी खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. नरेश म्हस्के यांची खासदारकी रद्द करावी अशी केली होती सुप्रीम कोर्टात मागणी. प्रतिज्ञापत्रात गुन्हा लपावल्याचा केला होता आरोप. पण याचिकेत तथ्य नसल्याच म्हणत याचिका कोर्टाने फेटाळली अशी खासदार नरेश म्हस्के यांची माहिती

  • 15 May 2026 12:15 PM (IST)

    संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख

    संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख. सरकारवर टीका करताना राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद उल्लेख. भारतीय युवा पिढीला कमी लेखणं चुकीचं, राहुल कनाल यांचं उत्तर. शिंदेंची शिवसेना राऊतांविरोधात आज आंदोलन करणार. राऊतांनी व्लादिमीर लेनिन यांचा कोट यावेळी ट्विट केला… ‘जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल, तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा’

  • 15 May 2026 11:57 AM (IST)

    नंदुरबारमध्ये पारा ४१ अंशांवर स्थिर; उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट

    नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ४५ अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान आता ४१ अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याने नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवेतील आद्रता कमी असल्याने उकाड्याची तीव्रता कायम असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेची ही लाट पाहता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘उष्माघात कक्ष’ तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

  • 15 May 2026 11:47 AM (IST)

    पुण्यात शरद पवार गटाची गुप्त बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खलबते?

    राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका खासगी हॉटेलमध्ये शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची अत्यंत महत्त्वाची ‘गुप्त बैठक’ पार पडली. या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली असून, यात प्रामुख्याने सुनील तटकरे यांनी नुकतीच घेतलेली शरद पवारांची भेट आणि दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर गंभीर खलबते झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असून, राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 15 May 2026 11:37 AM (IST)

    सोलापुरात गुरू माऊलीचा धक्कादायक पर्दाफाश; डुकराचा दात आणि दगडी कासवांच्या जाळ्यात शेकडो भक्तांची फसवणूक

    सोलापूरच्या माढा तालुक्यातील आढेगाव येथील भोंदू बाबा ‘गुरू माऊली’ याच्या भोंगळ कारभाराचे एकामागून एक धक्कादायक गुपित तपासादरम्यान उलगडत आहेत. या भोंदू बाबाने चक्क डुकराचा दात आणि दगडी कासवांचा वापर करून शेकडो भाविकांना दैवी शक्तीचे आमिष दाखवत लुटले आहे. टेंभुर्णी पोलिसांनी ही ‘फसवणुकीची साधने’ जप्त केली असून, तपासात या ढोंगी बाबाने सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील भक्तांची दिशाभूल करून कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हा भोंदू बाबा आणि त्याचा भाऊ गणेश विरकर पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून आणखी किती भक्तांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

  • 15 May 2026 11:27 AM (IST)

    साताऱ्यात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण; बड्या नेत्यांची एकाच गाडीतून एन्ट्री

    साताऱ्यातील ऐतिहासिक नगरपालिका चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकाच गाडीतून प्रवास करत कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील या महत्त्वाच्या नेत्यांमधील समन्वय आणि एकत्र प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत असून, मोठ्या उत्साहात या स्मारकाचे पूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे

  • 15 May 2026 11:17 AM (IST)

    पालघरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी

    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दिसून येत असून, येथील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी बाईक आणि कारची प्रचंड गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे, शेजारील गुजरात राज्यातील अनेक पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने गुजरातचे वाहन चालक देखील महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन पेट्रोल-डिझेल भरत आहेत. वाढत्या किमती आणि पुरवठ्याची टंचाई यामुळे सीमाभागात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.

  • 15 May 2026 11:07 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात दाखल; अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

    सातारा शहरात आज उत्साहाचे वातावरण असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सैनिक स्कूलच्या मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाले आहे. मुख्यमंत्री काही वेळातच शहरातील शाहू चौक येथे पोहोचणार असून, तिथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार असून, प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

  • 15 May 2026 10:52 AM (IST)

    अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात

    अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात. कांद्याचे दर तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले शेतकरी. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आंदोलन सुरू. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, शेतीपिकांच्या खर्चाचा योग्य मोबदला मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा.

  • 15 May 2026 10:39 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश

    राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांच्याशी बोलून आनंद परांजपेना प्रवेशा दिला. उदय सामंत यांनी दिली माहिती.

  • 15 May 2026 10:26 AM (IST)

    मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर मनसे नेत्याच्या गाडीचा अपघात

    मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर अपघात. अपघातात दिलीप धोत्रे गंभीर जखमी. छातीला अन् पायाला मार लागल्याची माहिती. पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात दिलीप धोत्रे.

  • 15 May 2026 10:12 AM (IST)

    सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनधारकांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा

    परळीत सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनधारकांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून डिझेल आणि पेट्रोल तसेच सीएनजी गॅस शॉर्टेज झाल्याचे दिसून येत आहे. रात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या भावामध्ये वाढ करण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे वैजनाथ ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी अनेक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी परळीत येत असतात. याच भाविकांना सीएनजी भरण्यासाठी अनेक तास रांगेत आपले वाहन उभे करावे लागत आहे.

  • 15 May 2026 09:55 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात मोठ्या स्वरूपात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

    जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपले. नो पेट्रोल – नो डिझेल चे फलक झळकले. वाहनधारकांची इंधनासाठी मोठी धावपळ सुरू. डिझेलअभावी शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत. काही पंप पूर्णपणे बंद अवस्थेत वाढत्या मागणीमुळे उपलब्ध साठाही संपला..

  • 15 May 2026 09:40 AM (IST)

    राज्यात सर्वाधिक पेट्रोलचे दर अमरावतीमध्ये

    अमरावतीत पेट्रोलचे दर 108 रुपये 24 पैसे प्रति लिटर…तर डिझेल 94 रुपये 74 पैसे. मध्यरात्रीपासून अमरावतीमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 3 रुपये 13 पैशांची वाढ. यापूर्वी अमरावती मध्ये पेट्रोलचे दर होते. 104 रुपये 11 पैसे…तर डिझेल 91 रुपये 63 पैसे. भारत आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ…

  • 15 May 2026 09:30 AM (IST)

    सोलापुरातही 3 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले

    पेट्रोल दर वाढल्यानंतर सोलापूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया. पेट्रोलचे दर वाढवल्याने आमच्या खिशाला झळ पोहचते. आम्हाला कमी पेट्रोल वापरण्यास सांगत असले तरी त्यांनी स्वतः देखील त्याचे पालन करावे. पेट्रोल वाढले असले तरी आम्ही गाडी ऐवजी सायकल वापरू. पंतप्रधानांनी सांगितले म्हणून मी सायकल वापरायला तयार

  • 15 May 2026 09:20 AM (IST)

    एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला

    एअर इंडियाने इंधनाच्या वाढत्या किंमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा मर्यादित केली आहेत. एअर इंडियाच्या विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झाला आहे. दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचे तिकीट तब्बल २ लाख ७६ हजारांच्या घरात पोहोचले आहे. याशिवाय अनेक मार्गावरील तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

  • 15 May 2026 09:05 AM (IST)

    बेस्टच्या बसची धडक; वाहकाचा मृत्यू, मोठी खळबळ

    अंधेरी पश्चिम परिसरात गुरुवारी दुपारी बेस्टच्या चार बस एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात एका वाहकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची चौकशी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने एक समिती स्थापन केली आहे.

  • 15 May 2026 08:52 AM (IST)

    ठाण्यात सीएनजीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरांत तीन रुपयांनी वाढ

    ठाण्यात सीएनजीनंतर पेट्रोल डिझेलचे दर तीन रुपये ने वाढ झाली आहे… आजचे पेट्रोलचे 106 रुपये 73 पैसे तर डिझेलचे 93.23 पैसे दर दिसून येत आहे.. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे… तर काहींचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक गाड्या देखील महाग असल्यामुळे घेतलेल्या गाड्याचे काय करायचे … सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी अशी देखील मागणी यावेळेस वाहन चालकांनी केली आहे.

  • 15 May 2026 08:40 AM (IST)

    मुंबई महापालिकेकडून देवनार डंपिंग ग्राउंडवरील तब्बल २ कोटी टन कचऱ्याच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम

    कचरा व्यवस्थापनासाठी ६४८ कोटी रुपयांचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.  जैविक प्रक्रियेद्वारे कचरा निर्मूलनासाठी २,३६८ कोटी रुपयांचा बायोरिमेडिएशन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.  ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून दररोज ६०० ते १,८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.  प्रकल्पाचे काम चेन्नई एमएसडब्ल्यू प्रा. लि. कंपनीकडे सोपवले आहे. एमपीसीबीच्या मंजुरीनंतर प्रकल्पाचे टप्प्याटप्प्याने कार्यान्वयन सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन मोकळी करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे.  संपूर्ण बायोरिमेडिएशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३ ते १४ वर्षांचा कालावधी लागू शकतो…

  • 15 May 2026 08:30 AM (IST)

    मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ

    तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे दरवाढ करण्यात आली आहे.  फ्रेंच बीन्सचा दर २०० रुपये प्रति किलोवर; आठवडाभरापूर्वी १३०-१७० रुपये होता. हिरवी मिरची १०० रुपयांवरून १५० रुपये प्रति किलो. टोमॅटोचे दर दुपटीने वाढले; २५ रुपयांवरून ५०-६० रुपये प्रति किलो, लिंबू ५ ते ७ रुपये नग दराने विक्री, कोथिंबिरीच्या जुडीचे दर ४०-६० रुपये; यापूर्वी ३०-४० रुपये होते, पापडी आणि फ्लॉवरचे दर १००-१२० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले, गवार १२० ते १६० रुपये प्रति किलो दराने विक्री, वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक २०-३० टक्क्यांनी घटली आहे.  पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचे नुकसान झालं आहे.  वाहतुकीदरम्यान भाजीपाला लवकर खराब होत असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

  • 15 May 2026 08:25 AM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांचा एकाच वाहनातून प्रवास

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांनी  एकाच वाहनातून प्रवास केला आहे.  अक्कलकोट येथील केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी एकत्र प्रवास केला. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, भाजपा आमदार देवेंद्र कोठे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी  एकाच गाडीतून प्रवास केला.

  • 15 May 2026 08:20 AM (IST)

    गाडीचा धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड

    धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे गाडीचा धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड झाली. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जमावाकडून ईटकळ येथे मंगल कार्यालयात तोडफोड, गोंधळ, घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ईटकळ येथील स्थानिकाकडून बाहेरगावच्या वऱ्हाडी मंडळींना महिलांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटातील गोंधळ करणाऱ्या विरोधात नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 May 2026 08:15 AM (IST)

    वाहनांवर १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ अनिवार्य

    राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी; तसेच आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने वाहनांची ओळख अधिक सुरक्षित राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील एचएसआरपीच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • 15 May 2026 08:07 AM (IST)

    वसई किल्ल्यात मित्राचा मैत्रिणीवर प्राणघातक चाकू हल्ला

    वसई किल्ल्यात 21 वर्षीय तरुणीवर तिच्या मित्राने चाकू हल्ला केला आहे. आपल्या सोबत मैत्री असताना मैत्रीण दुसऱ्या सोबत ही मैत्री वाढवत असल्याच्या संशयावरून पहिल्या मित्राने मैत्रिणीला वसई किल्ल्यात बोलावून, तिच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 351 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला वसई पोलिसांनी अटक केले आहे. संचित डॉमाणिक बला ( वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून हा वसईच्या पाचूबंदर येथील रहिवासी आहे.

  • 15 May 2026 08:03 AM (IST)

    अंबरनाथमध्ये युतीवरून शिवसेनेतच अंतर्गत नाराजी

    अंबरनाथमध्ये युतीवरून शिवसेनेतच अंतर्गत नाराजी दिसत आहे. काहींनी निवडणुकीत भाजपसाठी काम केलं…’ असं वक्तव्य  सेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं आहे. भाजपने स्वतःहून युतीची मागणी करायला हवी होती. सेना-भाजप युतीवरून आता शिवसेनेतच मतभेद दिसून येत आहेत.

Published On - May 15,2026 8:01 AM

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड