Maharashtra News LIVE : गोंदिया : आठवडाभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन ठार, चार जण जखमी
नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा गुरुनाथ मांढरे दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. तर नाशिकमध्ये आज शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग...

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनीषा यांना दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. पुण्यातून देखील मोठी माहिती समोर येत आहे, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉपरिट कंपन्यांच्या अनैतिक स्पर्धेविरोधात येत्या दि. 20 मे रोजी देशभरात लाक्षणिक बंद पुकारला आहे. या बंदमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील 15 हजार औषध विक्रेते सहभागी होणार असल्याचे केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट अध्यक्षांनी माहिती दिली. तर नाशिकमध्ये आज शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी बैठका होणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे देखील पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर येणार आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
शिर्डी : 23 मे रोजी ऐतिहासिक संरक्षण उत्पादन केंद्राचे उद्घाटन
आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या भारताच्या ध्येयाला मोठी चालना देत शिर्डीत ग्लोब फोर्ज या संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते 23 तारखेला होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
-
अहिल्यानगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलिसांचा रूटमार्च
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस दलाकडून आज शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. शहरातील मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे मौलाना आझाद चौकापर्यंत हा रूट मार्च पार पडला.या रूट मार्चमध्ये श्रीरामपूर शहर पोलीस, तालुका पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि होमगार्ड पथकाने संयुक्त सहभाग घेतला.
-
-
राहुरी : अमावस्येच्या रात्री घरासमोर लिंबु-मिरच्या, जादूटोण्याच्या संशयाने खळबळ
आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमधे जादूटोण्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कारवाडी परिसरात एका घरात कपडे, कागदपत्रे आणि इतर वस्तूंना अचानक आग लागत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अमावस्येच्या रात्री घरासमोर लिंबू-मिरचीसह काही संशयास्पद वस्तू आढळल्याने जादूटोण्याची चर्चा रंगली आहे.
-
गोंदिया : आठवडाभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन ठार, चार जण जखमी
खरीप व रब्बी हंगाम आटोपल्यानंतर ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला रोजगार नसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दीड महिना तेंदूपत्ता संकलनाच्या कामासाठी जातात. यातून चांगले उत्पन्न मिळत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मदत होते. वितभर पोटासाठी भल्या पहाटेपासून मजुरांची तेंदूपत्ता तोडण्यासाठी धडपड सुरू होते. मात्र तेंदूपत्ता संकलनादरम्यान वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले असून जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात चार जण जखमी तर दोन जणांचा बळी गेला. परिणामी वितभर पोटासाठी जीव मुठीत घेऊन जंगलात तेंदूपत्ता संकलन करावे लागत असल्याचे बिकट चित्र जिल्ह्यात आहे.
-
कोंढव्यात कोयता गँगचा धुमाकूळ, मशिदीच्या इमामवर हल्ला
कोंढवा परिसरात किरकोळ वादातून कोयता गँगने दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. काही तरुणांनी भररस्त्यात कोयते फिरवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. यावेळी मशिदीच्या इमामवरही हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे.
-
-
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
खासदार नागेश पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण
विकास कामासंदर्भात भेट घेतल्याची माहिती समोर
मात्र या भेटीमुळे पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा
-
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यलयात शेतकऱ्यांचा गोंधळ
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यलयात शेतकऱ्यांचा गोंधळ
शेतकऱ्याने कार्यालयातच गळ्याला लावला फास
धाराशिवमधील घटनेनं मोठी खळबळ
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी निवष्ठामध्ये गैरव्यवहार झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप
अधिकाऱ्यांनी चौकशीत टाळाटाळ केल्याने शेतकरी घुसले कृषी अधीक्षक यांच्या मुख्य कार्यालयात
-
बदलापुरात जनगणनेच्या कामात हलगर्जी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा
बदलापुरात जनगणनेच्या कामात हलगर्जी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा
जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई
आदेश देऊन ही कर्तव्यावरती हजर न राहिल्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
कुळगांव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या आदेशानं कारवाई
2027 च्या जनगणनेच्या पूर्वी घर गणती मोहिमेला सुरुवात
वारंवार फोन करूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही
-
मानवत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या गॅस साठी रांगा
परभणीच्या पाथरी मानवत रोडवर असलेल्या मानवत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या गॅससाठी रांगा लागल्या आहेत. ऑनलाइन बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याने भर उन्हात नागरिकांच्या लागल्या रांगा.
-
कोळसा नेणाऱ्या मालवाहू रेल्वे बोगीत आग
जळगाव रेल्वे स्थानकानजीक कोळसा नेणाऱ्या मालवाहू रेल्वे बोगीत किरकोळ आग लागल्याची घटना समोर आली आहे. वाढते तापमान व घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता, रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
-
गॅस वितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात चक्काजाम
नांदेडच्या नायगाव शहरातील घरगुती गॅस वितरण व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उसळला. नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौकात नागरिकांनी अचानक रिकाम्या गॅस टाक्या थेट रस्त्यावर फेकून चक्काजाम आंदोलन केले. गॅस बुक करून गॅस मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले होते. या अचानक उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
-
पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवरती अत्याचार
पुण्यात मुंढवा कोरेगाव पार्क परिसरात चालत्या कारमध्ये महिलेवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पार्टी वरून घरी परतताना घरी सोडतो अशा बहाण्याने आरोपीकडून महिलेवर अत्याचार केले. पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
वाशिममध्ये गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त
वाशिममध्ये गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त… एकबुर्जी प्रकल्पातील पाण्याची पातळी घटल्याने दुर्गंधी आणि गढूळपणा वाढला… नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन…
-
शेतकऱ्यांनी कांद्यासाठी साठवण क्षमता तयार करावी- पाशा पटेल
शेतकऱ्यांनी कांद्यासाठी साठवण क्षमता तयार करावी. कांदा कमी पिकवावा याचाही विचार करावा लागेल. कांदा कमी पिकवल्यास त्याला जास्त भाव मिळेल.. 4 महिन्यांत कांद्याला चांगला भाव मिळेल- पाशा पटेल
-
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत बोलत राहणार-संजय राऊत
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत बोलत राहणार- -संजय राऊत. माध्यमांमधल्या वक्तव्यांबद्दल 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावलं होतं. न्यायव्यवस्थेवर टीका करणं बंद करा, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर
-
पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना
पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना. पुण्यातील मुंढवा- कोरेगाव पार्क रोडवरील घटना. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची घटना. अत्याचारप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल
-
आपल्यामुळे हसू येत असेल तर त्यापेक्षा काय चांगले – नाना पाटेकर
“विदर्भात खूप ठिकाणी काम सुरू आहे. सामूहिक पद्धतीने केलेलं काम हे एकट्याने केलेल्या कामापेक्षा मोठंच असणार. आपल्याकडे एवढ्या संस्था आहेत, सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण काही राजकीय पक्ष नाही,सरकार काय करायचे ते ठरवतील. आपल्यामुळे हसू येत असेल तर त्यापेक्षा काय चांगले” असं अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. ते जलक्रांती परिषदेत बोलत होते.
-
पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार
पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार. पुण्यातील मुंडवा कोरेगाव पार्क रस्त्यावरची घटना. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बाहाण्याने कार मध्ये बलात्कार. बलात्कार प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल.
-
जळगावच्या विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या जळगावचा देखील समावेश आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. अवघ्या सात दिवसांवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांसह उमेदवारांची तारांबळ उडणार. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बाकी असताना पहिल्यांदाच विधान परिषदेची निवडणूक पार पडत आहे. महायुती असली तरी भाजप बरोबरच शिवसेना शिंदे गटाने देखील विधान परिषदेच्या जागेवर दावा केला आहे.
-
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बाजार समितीत आज कांद्याला प्रति किलो अवघा १ रुपया ५० पैसे ते ८ रुपये दर मिळत आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्र्यांनी १२ रुपये ३५ पैशाने कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी अंमलबजावणी कधी होणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
-
20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने लग्नासाठी दबाव
भुसावळ शहरातील 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नाविल शेख याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
राज्य मंत्रीमंडळात पावसाळी अधिवेशनापुर्वी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता – सूत्रांची माहिती
राज्य मंत्रीमंडळात पावसाळी अधिवेशनापुर्वी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर अर्थ खात्याबाबत महायुतीच्या तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेणार. अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहीती. त्या ऐवजात दोन मोठी मंत्रीपदे राष्ट्रवादीला बहाल केली जातील पण याला राष्ट्रवादीतील एका गटाचा विरोध असल्याचे सूत्रांनी सांगितलं. अर्थ खातं भाजपकडे गेलं तर गृहखातं शिवसेनेला द्यावं अशी शिवसेना पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे समजते.
-
नीट पेपरफुटी प्रकरण – शिवराज मोटेगावकर संबंधित विद्यार्थ्यांचीही चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक करण्यात आली असून शिवराज मोटेगावकर संबंधित विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे. तसेच बँक तपशील तपासणीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्यात येत आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ..
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर 500 रुपयांनी तर चादीचेदर 4 हजारांनी वाढलेत.
जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 61 हजार 195 रुपयांवर पोहोचले तर चांदीचे दर 2 लाख 75 हजार 10 रुपयांवर पोहोचलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात दीड टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
आयात शुल्कामध्ये वाढ तसेच चांदीच्या आयातीवर लावलेले निर्बंध यामुळे सोन्याने चांदीच्या दरात वाढ झाल्याचा सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे.
-
NSUI चं पुण्याच मॉडर्न विद्यालयाबाहेर आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
NSUI चं पुण्याच मॉडर्न विद्यालयाबाहेर आंदोलन सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू.
-
सोलापूर – धन बचतीसाठी सोलापूर झेडपीचा आज ‘नो व्हेईकल डे’
इंधन बचतीसाठी सोलापूर झेडपीचा आज ‘नो व्हेईकल डे’. जिल्हा परिषदेचे सीईओ आणि उपाध्यक्ष सायकलवर आले. सीईओ कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार दोघेही सायकलवर झेडपी आले. जिल्हा परिषद कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनांचा वापर टाळत पर्यायी साधनांचा अवलंब केल्याचे पाहायला मिळाले. उपक्रमात जिल्हा परिषदेमधील सुमारे 1 हजार 400 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
-
पुणे – NSUIचं मॉडर्न विद्यालयाबाहेर आंदोलन
पुणे – NSUIचं मॉडर्न विद्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा मांढरे या मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत. कॉलेजच्या गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
पुणे – नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज माटेगावकरला सीबीआयकडून अटक
पुणे – नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी नीट पेपर फुटी प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली होती, आता शिवराज मोटेगावकरलाही सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत.
-
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 111 डॉलर्स प्रतिबॅरलवर
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 111 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत. होर्मुझमधल्या इराण-अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे तेलबाजारात हाहाकार माजला आहे. अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा अमेरिकी माध्यमांचा दावा आहे. कच्च्या तेलाच्या किमती २ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. तर ही वादळापूर्वीची शांतता आहे, वेळ संपत चालली आहे असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. लवकर डील करा अन्यथा इराणमध्ये काहीही उरणार नाही, असंही ते म्हणाले.
-
कांद्राप्रश्नी लासलगावमध्ये रोहित पवारांचं आंदोलन
कांद्राप्रश्नी लासलगावमध्ये रोहित पवार आंदोलन करत आहे. ट्रॅक्टरवर बसून रोहित पवार आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे कांद्राप्रश्नी आंदोलन पेटलं असून छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्ग अडवला आहे. आठवडाभरात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
-
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरांची तब्बल 11 तासांपासून चौकशी सुरू आहे. पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयात मोटेगावकरांची 11 तासांपासून चौकशी सुरू आहे. शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक आहेत. मोटेगावकरांना सीबीआय टीम दिल्ली कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.
-
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या टोरेंट जलविद्युत प्रकल्पाला विरोध
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या टोरेंट जलविद्युत प्रकल्पाला विरोध होतोय. टोरेंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार पोशीर धरणाला गावकऱ्यांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड, जंगल नष्ट होण्याची भीती आणि त्यामुळे परिसराचं होणारं नुकसान या कारणांमुळे स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू केलंय. सयाजी शिंदे यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर राजकीय पक्षांनीदेखील या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
-
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात ठाकरे गटाकडून ठाण्यात आंदोलन
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या विरोधात ठाकरे गटाकडून ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांसह इतर पदाधिकारीदेखील ठाणे रेल्वे स्थानकाजवळ आंदोलनात सहभागी झाले आहेत.
-
नरेंद्र मोदी हे सध्याच्या संकटाच्या परिणामांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत- रवी किशन
पंतप्रधान मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्याबाबत बोलताना भाजप खासदार रवी किशन म्हणाले, “परदेशी राष्ट्रांच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदी एक नेते म्हणून पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या परिणामांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.”
-
शेतकऱ्यांसाठी आणखी गुन्हे दाखल झाले तरी चालेल, अंबादास दानवे आक्रमक
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मागच्या वेळी अनेक कांदा उत्पादकांचे आंदोलन बाकी आहे, ज्या शेतकऱ्यांचा कांदा ५० पैसे आणि चार आण्याने गेला त्याचे काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसैनिकांना गुन्हे नवीन नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमच्यावर आणखी गुन्हे दाखल झाले तरीही चालेल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. या आठवडाभरात जर शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
-
तुम्ही काय पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी आहात का? संजय राऊतांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्र संकटात असताना पंतप्रधान कुठे आहेत, असा सवाल करत संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी सध्या युरोपमधील ७ देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि निवडणूक संपल्यावर त्यांना देश संकटात असल्याचे समजले का? मोदी दोन गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते, तुम्ही काय पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी आहात का?” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
-
नागपुरात ‘आपल्या बस’चा भीषण अपघात; कंटेनरने इलेक्ट्रिक बसला दिली धडक
नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपल्या बस’ सेवेतील एका इलेक्ट्रिक बसला आज सकाळी पंचशील चौकात भीषण अपघाताचा सामना करावा लागला. ही बस खापरीकडून बर्डीकडे येत असताना, समोरून अत्यंत भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. या अपघाताच्या वेळी बसमध्ये ५ प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवाने या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. या धडकेत बसचे चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऐन सकाळच्या सुमारास वर्दळीच्या चौकात हा अपघात झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
-
नागपूरमध्ये खळबळ, माधवनगरीत एकाच ठिकाणी दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या हत्या!
नागपूरच्या एमआयडीसी पोलिसठाण्याच्या हद्दीतील माधवनगरी परिसरात काल रात्री ८ वाजेच्या सुमारास अंकुश शेंडे या मजूर तरुणाची अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी गुरुवारी याच घटनास्थळावर आकाश बरडे नावाच्या तरुणाचीही अशाच पद्धतीने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हे दोन्ही मृत व्यक्ती एकाच इसासनी भागातील रहिवासी असून, पोलिसांनी पहिल्या हत्येतील आरोपीला आधीच अटक केली आहे; तर कालच्या घटनेतील आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. पोलीस जरी या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे सांगत असले, तरी एकाच ठिकाणी लागोपाठ घडलेल्या या दोन क्रूर हत्यांमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
राज्यातील विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त असलेल्या १६ जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. तर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
-
NEET पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी कारवाई; लातूरच्या आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले असून, लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतले आहे. पेपरफुटीच्या गैरव्यवहारात मोटेगावकर यांचा थेट संबंध असल्याच्या संशयावरून सीबीआयने ही धडक कारवाई केली असून, सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेल्या क्लासेसच्या संचालकालाच ताब्यात घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
-
कांदाप्रश्नी ठाकरेंची शिवसेना आक्रमक; अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन
कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल केवळ १२ रुपये भाव मिळत असल्याचा आरोप करत, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर जोरदार ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. “कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ज्यानंतर पोलिसांनी अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल, चोराने..
तळेगाव दाभाडे येथील धनराज गोल्ड या सराफ पेढीत ग्राहक बनून आलेल्या एका जोडप्याने तब्बल ५ ग्रॅम वजनाची सोन्याची वाटी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सोन्याच्या वस्तूची किंमत तब्बल ८० ते ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण हातचलाखी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सराफा व्यापारी यांनी याबाबत तळेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तर तळेगांव पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या जोडप्याचा शोध घेत आहेत
-
सह्याद्रीच्या छातीवर गिर्यारोहण तानाजी केकरेचे नाव
कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. आंबेवाडी गावचे रहिवासी आणि ‘महाराष्ट्र रेंजर्स’ संस्थेचे गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर दोन मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तानाजी यांनी सह्याद्रीतील सर्वात कठीण मानले जाणारे टप्पे विक्रमी वेळेत पार केले.
-
मंठा तालुक्यातल्या जांभरुण शेत शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील जांभरुण येथील शेत शिवारात मंठा पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला या कारवाई मध्ये पोलिसांनी जुगाराचे साहित्य दुचाकी आणि काही रोख रक्कम असा एकूण 3 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.शिवाय पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या गुन्हा दाखल केला. मागच्या काही दिवसापासून या परिसरामध्ये बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू होता आणि गोपनीय माहिती द्वारे पोलिसांनी हा छापा टाकला आणि कारवाई केली
-
शेतकऱ्याकडे बघत असताना त्यात राजकारण होऊ नये रोहित पवार यांचे विधान
शेतकऱ्याकडे बघत असताना त्यात राजकारण होऊ नये. सत्तेतील, विरोधातील राजकारणी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न पाठीमागे उभे राहणे गरजेचे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कांद्याला ३ , ५ रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्च जास्त आहे. मागील वेळी २०० रुपये कांदा अनुदान जाहीर केले, दिले अवघे ५० रुपये…१५० रुपयांचे काय झाले…नाफेड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करते, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
-
गेवराईमध्ये किर्तनकार महाराजांवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ कॉल
सप्ताहाचा हिशेब मागितल्याने कैलास महाराज आनंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, ते गंभीररित्या जखमी असून बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे विचारपूस करत काळजी करू नका असे आश्वासन दिले. तर युवासेनेच्या बाजीराव चव्हाण यांच्याकडून वैद्यकीय उपचारासाठी खर्च देण्यात आला आहे. कोणालाही सोडणार नाही, कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री शिंदेंचे महाराज मंडळींना आश्वासन. वारकऱ्यांवर जर कोणी हात उचलत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही.
-
शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले…
अमरावतीत कापसाचे दर प्रतिक्विंटल साडेनऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस विकला 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल. वाढलेल्या कापसाच्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा; शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीचा फायदा नाही
-
राज्य मंत्री मंडळ बैठकीसह इतर महत्वाच्या बैठकीसाठी राज्य सरकारचा नवा निर्णय
मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळ बैठक व इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाइन उपस्थित राहणार. मुंबई पासून लांब असणाऱ्या मंत्र्यांना व नेत्यांना बैठकांसाठी मुंबईत येण्याची गरज नाही. राज्य सरकारकडून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर नवी संकल्पना राबवण्यात येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
-
वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा 40 टक्के पेट्रोल पंप बंद
वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून आजही जिल्ह्यातील 40 टक्के पेट्रोल पंप बंद डिझेल- पेट्रोल अभावी बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेती मशागतीची कामही कोळंबली आहेत. तर प्रवासी वाहनांनाही याचा फटका बसला असून वाहन बंद करून ठेवण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. आज सायंकाळपर्यंत डिझेल पुरवठा सुरळीत होईल असं पंपचालकांकडून सांगण्यात येत असलं तरी नागरिकांमध्ये मात्र यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय.
-
राज्यभरात उष्णतेमुळे नागरिक त्रस्त…
दिवसभर उन्हाची प्रखर तीव्रता तर रात्री उकाड्याने नाहगरिक हैराण झाले आहेत. पुण्यातही उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
भोंदू अशोक खरातने बेनामी खात्यातून तीन महिन्यात काढले 52 कोटी
भोंदू अशोक खरातने बेनामी खात्यातून तीन महिन्यात 52 कोटी काढले. डिसेंबर 2025 मध्ये वावी पोलीस ठाण्यात जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू खरातने बँकेतून 52 कोटी काढले. जानेवारी ते मार्चमध्ये अटक होईपर्यंत पैसे काढले. 65 बनावट खाते उघडून चार दिवसात 200 हून अधिक व्यवहारांद्वारे 52 कोटी काढले. अटके पूर्वीच काळा पैसा पांढरा करून विदेशात पळण्याचा प्लॅन होता.
-
९५ वर्षीय आजोबांच्या घरातील चोरी उघड, नातलग आरोपी अटकेत
जुन्नरच्या नेतवड कुटेमळा इथे ९५ वर्षीय बजाबा कुटे यांच्या घरातून ४ लाख २० हजारांचे ७ तोळे सोने चोरीला गेले होते. ओतूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपास करून आरोपी अभिषेक खंडू कुटे याला टिटवाळ्यातून अटक केली. विशेष म्हणजे चोरीचा १००% मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपी हा फिर्यादीच्याच गावातील आहे.
-
दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून ५२ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
पुणे जिल्ह्यातील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत २३ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. यात घरफोडी, मोटारसायकल चोरीसह विविध मालमत्ता गुन्ह्यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे १६ लाखांचे सोने, दीड लाखांची रोख रक्कम तसेच २४ लाखांच्या मोटारसायकली व इतर वाहनांचा समावेश आहे. परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते नागरिकांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे तसेच पोलीस पथक उपस्थित होते.
-
शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले…
अमरावतीत कापसाचे दर प्रतिक्विंटल साडेनऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल कापूस विकला. वाढलेल्या कापसाच्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा झाला असला तरी, शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीचा फायदा झालेला नाही.
-
मुंबई-गोवा महामार्गावरील पथकराला मंत्र्यांचाच विरोध, अदिती तटकरे यांची लवकरच गडकरींशी चर्चा
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही पथकर वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मंत्री अदिती तटकरे यांनीही या पथकर वसुलीला विरोध केला आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याला स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
-
पुण्यात दोन दिवस पावसाची शक्यता….
गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात येत आहे. तर पुढील पाच दिवसात हवामान फारसा बदल होणार नसल्याने तापमान स्थिर राहणार आहे तसेच पुढील दोन दिवसात शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
-
पुण्याची वाटचाल जीसीसी हबकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य…
जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणून पुणे शहराची ओळख निर्माण होत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा करण्याचे काम वेगाने सुरू आहे देशातील एकूण गुंतवणुकी पैकी सुमारे 25 टक्के गुंतवणूक पुण्यात होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
Published On - May 18,2026 8:01 AM
