AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Alliance CJP Protest Live Updates : राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या याचिका काऊंटरपर्यंत पोहचले

| Edited By: | Updated on: Oct 12, 2026 | 10:08 PM
Share

Maharashtra Live News : आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमानवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

India Alliance CJP Protest Live Updates : राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या याचिका काऊंटरपर्यंत पोहचले

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात ज्युनिअर ठाकरेंनी रविवारी आंदोलन केलं. तर शिवसेना भवानासमोर पोलीस आणि ठाकरेंच्या शिवसेमेमध्ये झटापट झाली. याच कारणामुळे ज्युनिअर ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक बोलावली आहे. मनसेचे सर्व नेत्यांची शिवतीर्थावर बैठक होणार आहे. काल झालेल्या सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलण्यात आली आहे. मनसेची पुढच्या आंदोलनाची आज रणनीती आखली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्येतील मुख्य फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग यांना प्रयागराज येथून अटक केल्यानंतर ठाण्यातील गुन्हे शाखा या ठिकाणी आणण्यात आले आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Oct 2026 09:50 PM (IST)

    जळगावच्या उमाळा फाट्याजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

    जळगावच्या उमाळा फाट्याजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

    या अपघातात वाहनातील ८ ते १० विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती

    अपघातात जखमी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

  • 12 Oct 2026 09:40 PM (IST)

    ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम

    ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेची मीरा रोड रेल्वे स्थानकावर स्वाक्षरी मोहीम.

    मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचे आयोजन.

    राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा देत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत घेतला सहभाग

    मीरा-भाईंदरमध्ये स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • 12 Oct 2026 09:25 PM (IST)

    नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्टेशन परिसर अंधारात

    नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्टेशन परिसर अंधारात

    वीज पुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांना अंधारातून करावा लागला प्रवास

    अचानक लाईट गायब झाल्याने मोबाईल टोर्च घेऊन नागरिकांचा प्रवास

    रेल्वेच्या भुयारी मार्गावर देखील अंधार, प्रवाशांमध्ये संताप

  • 12 Oct 2026 09:10 PM (IST)

    अंधेरी पूर्वमध्ये ताडी पिल्याने तरुणाचा मृत्यू

    मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. ताडी पिऊन 26 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बब्रुवान दुर्गे असं मृत तरुणाचं नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष नगर येथील ताडी माडी केंद्रावर ही घटना घडली आहे.

  • 12 Oct 2026 06:45 PM (IST)

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले, त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल केली, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सुर्यकांत उपस्थित नव्हते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या काऊंटरपर्यंत पोहचून त्यांनी याचिका दाखल केली आणि ते बाहेर पडले आहेत. त्यांच्या सोबत प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे देखील होत्या.

  • 12 Oct 2026 06:41 PM (IST)

    राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या याचिका काऊंटरपर्यंत पोहचले

    लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आता सुप्रीम कोर्टाच्या काऊंटरपर्यंत पोहचून त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्यो सोबत अशोक गेहलोत, डीके शिवकुमार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत.

  • 12 Oct 2026 06:28 PM (IST)

    परभणीत बोअरवेल खणताना आग लागून मजूराचा मृत्यू

    परभणीच्या दुधगाव येथे शेतात बोरवेल खणत असतांना मशिनला आग लागल्याने एका मजूराचा भाजून मृत्यू झाला आहे. दुधगाव येथील शेतकरी शिवाजी राऊत यांच्या शेतात पाण्याचा बोरवेल पाडत असताना ही घटना घडली आहे.नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण कळलेले नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे.

  • 12 Oct 2026 06:21 PM (IST)

    दादरमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहिम सुरु

    मनसेचे नेते राज ठाकरे यांनी साक्षरी करुन मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेची  सुरुवात केली आहे.  दुसरीकडे शिवाजी पार्कात मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या येथे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मूक मोर्चा काढला आहे.

  • 12 Oct 2026 06:16 PM (IST)

    नागपुरात सीजेपी कार्यकर्त्यांचे संविधान चौकात आंदोलन

    नागपुरात सीजेपी कार्यकर्ते संविधान चौकात आंदोलन करत आहेत. मुख्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला घेऊन घोषणा बाजी करत आहेत. पोलिसांनी आधीच आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, परंतु आता एक तासाची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी संविधान चौकात मोठा बंदोबस्त लावला आहे.

  • 12 Oct 2026 06:10 PM (IST)

    मनसेचे नेते राज ठाकरे दादर येथील मोर्चासाठी निघाले

    मनेसेचे नेते राज ठाकरे दादर येथील मोर्चासाठी निघाले आहेत. काल दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना रोखल्याची बातमी पसरल्याने शिवसेनेचे युवा नेते नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे मैदानात उतरले होते.

  • 12 Oct 2026 05:43 PM (IST)

    पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, पण आम्ही घाबरणार नाही – वरुण सरदेसाई

    पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, पण आम्ही घाबरणार नाही.  गुन्हे दाखल झाले तरी आंदोलन सुरूच राहणार – वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला निर्धार.

    ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.  मोठ्या प्रमाणात मतचोरी होऊनही आम्ही निवडून आलो आहोत. SIR आणि मतचोरीबाबत असंख्य प्रेझेंटेशन दिली आहेत, असं सरदेसाई म्हणाले.

  • 12 Oct 2026 05:41 PM (IST)

    तेजस ठाकरेंचा दादरमध्ये मोर्चा

    तेजस ठाकरेंचा दादरमध्ये मोर्चा. शिवाजी पार्क येथे तेजस ठाकरे दाखल झाले आहेत. मनसेकडून देखील याच ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काल आदित्य आणि अमित ठाकरे आंदोलनासाठी एकत्र आले होते.  कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काल त्यांनी आंदोलन केलं होतं. आजही या सगळ्या घटनेचा निषेध म्हणू, काळया फिती बांधून, हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे.

  • 12 Oct 2026 05:36 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या आंदोलकांना बॅरिकेड्सपासून हटवलं

    राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा सुप्रीम कोर्टाजवळ पोहोचला असून अतिशय मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आली आहे.  अनेक आंदोलकांनी बॅरिकेड्सवर चढून ती ओलांडून जाण्याचा  प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बॅरिकेड्सपासून दूर हटवलं.  कार्यकर्ते आक्रमक झाले असून, अनेक घोषणा दिल्या जात आहेत. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे, आम्हाला पुढे जाऊ द्या, असं ते पोलिसांना सांगत आहेत.

  • 12 Oct 2026 05:19 PM (IST)

    नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. 

    दिल्लीच्या रस्त्यांवर राजकारण तापलं, सुप्रीम कोर्टाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.  अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना  पोलिसांना देण्यात आल्या आहेत. इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी,  बॅरिकेड्स ओलांडून जाण्याच्या तयारीत आहेत. पोलीसांकडून मोठी तयारी., महिला पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे.

  • 12 Oct 2026 05:04 PM (IST)

    राहुल गांधींसह विरोधकांचा मार्च सुप्रीम कोर्टाजवळ

    राहुल गांधींसह विरोधकांचा मार्च सुप्रीम कोर्टाजवळ पोहोचला .  सुप्रीम कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. दिल्ली पोलीस,  RAF,  ITBP, CPRF,  SSB तैनात आहेत. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढण्याच्या प्रयत्नात आहेत.

  • 12 Oct 2026 04:55 PM (IST)

    राहुल गांधींच्या लीगल टीमकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

    राहुल गांधींच्या लीगल टीमकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. राहुल गांधींची ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका दाखल. तर दुसरीकडे राहुल गांधींसह विरोधकांचा सुप्रीम कोर्टाकडे मार्च

  • 12 Oct 2026 04:44 PM (IST)

    मोदी सरकारमधलेच 200 अधिकारी आम्हाला माहिती पुरवतात, राहुल गांधींचा मोठा दावा

    ज्ञानेश कुमारांनी अॅप्रूव्हर बनावं… मोदी सरकारमधलेच 200 अधिकारी आम्हाला माहिती पुरवतात… राहुल गांधींचा मोठा दावा… लोकशाही वाचवणार, आता मागे हटणार नाही, राहुल गांधींचा निर्धार

  • 12 Oct 2026 04:29 PM (IST)

    सरन्यायाधीश एखाद्या पार्टीच्या मोर्चाला कसे भेटतील?-फडणवीस

    सरन्यायाधीश एखाद्या पार्टीच्या मोर्चाला कसे भेटतील? सुप्रीम कोर्टाला बदनाम करण्याचं षडयंत्र.  मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा

  • 12 Oct 2026 04:18 PM (IST)

    वारंवार लाँच होणारं नेतृत्व फेल होतंय-फडणवीस

    वारंवार लाँच होणारं नेतृत्व फेल होतंय. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा काँग्रेस अराजकतेच्या मानसिकतेत आहे. संविधान संपवण्याचं षडयंत्र काँग्रेसनं रचलंय- फडणवीस
     
  • 12 Oct 2026 04:07 PM (IST)

    इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टाच्या दिशेने

    निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांची सुप्रीम कोर्टाकडे कूच… मंडी हाऊसवरुन मोर्चा आता कॅनॉट प्लेसपर्यंत पोहोचला… ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका दाखल करणार…

  • 12 Oct 2026 03:45 PM (IST)

    आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    कितीही मोर्चे काढले तरी संविधान संपवू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 12 Oct 2026 03:01 PM (IST)

    महाराष्ट्र सदनातून काँग्रेसचे नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना

    सुप्रीम कोर्टात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. इंडिया आघाडीचे खासदार बसमूधन सुप्रीम कोर्टाच्या दिशेने निघाले आहेत. महाराष्ट्र सदनातून काँग्रेसचे नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना. सपकाळ वडेट्टिवार नाना पटोले थोरात हे मोर्चामध्ये पायी सहभागी झाले आहेत.

  • 12 Oct 2026 02:49 PM (IST)

    दिल्लीत इंडिया आघाडी एकवटली

    दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. सलग पाचव्या दिवशी हे आंदोलन सुरु आहे. सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार राहुल गांधी यांनी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असून, मतचोरी आणि मतदार यादीतील फेरफाराच्या मुद्द्द्यावरून सरकारविरोधात इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • 12 Oct 2026 02:30 PM (IST)

    काश्मीरची सफरचंद आता 30 तासांत मुंबईत

    चिनाब रेल्वे पुलामुळे काश्मीर आणि मुंबईमधील कनेक्टिव्हिटीला चांगलीच गती मिळाली आहे. पूर्वी रस्तेमार्गे लागणारे 45 तास आता थेट 30 तासांवर पोहोचले आहे. शिवाय वाहतूक खर्चातही बचत होत आहे. या नव्या मार्गामुळे काश्मीरची ताजी सफरचंद आणि चेरी खराब न होता अवघ्या एका दिवसात वांद्रे स्थानकात पोहोचत आहेत. यामुळे आता मुंबईकरांना स्वस्त आणि ताजी फळे तर मिळतीलच, शिवाय व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळतोय.

  • 12 Oct 2026 02:05 PM (IST)

    मुंबई आणि दिल्लीत भाजपचे आक्रमक आंदोलन

    काँग्रेस खासदाराविरोधात मुंबई आणि दिल्लीत भाजप महिला मोर्चाने आक्रमक निदर्शने केली. काँग्रेस कार्यालयाकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दोन्ही शहरांत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, वाढत्या तणावामुळे परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 12 Oct 2026 12:55 PM (IST)

    राहुल गांधींच्या नौटंकीला जनता थारा देणार नाही- खासदार अनिल बोंडे

    १९४७ पासून काँग्रेस आणि त्यांच्या पूर्वजांनी देशाला लुटलं, असं वक्तव्य भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलं. राहुल गांधींच्या नौटंकीला जनता थारा देणार नाही, अशी टीका खासदार बोंडे यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनावर केली.

  • 12 Oct 2026 12:43 PM (IST)

    ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- राहुल गांधी

    देशाचा तिरंगा घेऊन या लढाईत आमच्यासोबत राहा, असं आवाहन मी सर्व विरोधी पक्षांना करतो. ही शंकराची वरात.. यात कुणीही येऊ शकतं. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी रोखठोक भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

  • 12 Oct 2026 12:38 PM (IST)

    मोदींची सर्व कुंडली आमच्याजवळ- राहुल गांधी

    मोदींची सर्व कुंडली आमच्याजवळ आहे. देशाच्या भविष्यासाठी लढाई करतोय, सर्व विरोधी पक्षाला आवाहन करतोय. ही लढाई काल-परवा सुरू झालेली नाही. मोदी सरकारमधील अधिकारी आम्हाला सगळी माहिती पुरवत आहेत. लाखो लोकांना ज्ञानेश कुमार यांच्यावर सवाल आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 12 Oct 2026 12:29 PM (IST)

    ज्ञानेश कुमारांसारख्याच चोराला का वाचवतोय, असं पोलिसांना वाटतं- राहुल गांधी

    इंडिया आघाडी आज सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल करणार. सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे याचिका दाखल करणार आहोत. ज्ञानेश कुमारांसारख्याच चोराला का वाचवतोय, असं पोलिसांना वाटतं, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 12 Oct 2026 12:24 PM (IST)

    ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाही? राहुल गांधींचा सवाल

    ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाही? आजही आम्हाला रोखलं जाईल. सरकारमुळे पोलीस कर्मचारी हैराण झाले आहेत.  ज्ञानेश कुमारांबाबत आमच्याकडे सर्व माहिती आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 12 Oct 2026 12:19 PM (IST)

    मोदी, शाह, ज्ञानेश कुमार हे एका बाजूला आणि विरोधक एका बाजूला- राहुल गांधी

    मोदी, शाह, ज्ञानेश कुमार हे एका बाजूला आणि विरोधक एका बाजूला आहेत. तरुणांना आरएसएसच्या गुंडांकडून मारहाण केली जाते. लोकांना अडवून सरकार मोठी चूक करतेय. सरकार ज्ञानेश कुमार यांना संरक्षण देतेय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

  • 12 Oct 2026 12:15 PM (IST)

    तरुण विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात लढा देऊन राजवटीला झुकवलं- आदित्य ठाकरे

    ‘विद्यार्थी एकजूटीचा विजय असो! जवळपास 11 दिवस विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लावलं. त्यांच्या राहत्या तालुक्यात दुष्काळ असूनही, परिवार संकटात असूनही रस्त्यावर बसायला लावलं आणि काल ह्याच तरुण विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात लढा देऊन राजवटीला झुकवलं,’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

  • 12 Oct 2026 12:13 PM (IST)

    दिल्लीत रेल्वे, मेट्रो बंद केल्या, 20-30 हजार पोलिसांचा बंदोबस्त- राहुल गांधी

    ज्ञानेश कुमार हटाव मागणीसाठी दिल्लीत चार-पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीत रेल्वे, मेट्रो बंद केल्या. 20 ते 30 हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. सर्वत्र फक्त पोलीस दिसतायत, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 12 Oct 2026 12:05 PM (IST)

    अभिनेता इमरान खानविरोधात किरीट सोमय्या दाखल करणार तक्रार

    आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खान याच्या विरोधात किरीट सोमय्या पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता ते यासाठी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात जाणार आहेत. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल व्हावा या मागणीसाठी ते तक्रार करणार आहेत.

  • 12 Oct 2026 11:52 AM (IST)

    अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपच्या संगीता शिंदे यांच्याकडून बंडखोरी, पक्षाकडून कारवाई

    अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक, मतदारसंघ शिंदे सेनेला सुटल्यावरही भाजपच्या संगीता शिंदे यांच्याकडून बंडखोरी करण्यात आली होती. या बंडखोरीनंतर शिंदे यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.  निलंबन केल्यावरही संगीता शिंदे म्हणतात पक्षश्रेष्ठींवर माझा विश्वास, केलेल्या कारवाईवर आपल्याला हरकत नाही, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.  शिक्षक परिषद भाजपच्या विचाराशी जुळलेली आहे, त्यांनी मला उमेदवारी दिली आहे. शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण सतत लढत राहू, असे त्या म्हणाल्या.

  • 12 Oct 2026 11:40 AM (IST)

    ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील – आशुतोष रांका

    ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे आशुतोष रांका यांनी सांगितले. ते आंदोलनास परवानगी मागण्यासाठी संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांच्यासोत सौरव दास देखील होते. लोकशाहीत सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे, असे रांका यांनी सांगितले.

  • 12 Oct 2026 11:25 AM (IST)

    देश आणीबाणीच्या दिशेने चाललाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल

    इंडिया आघाडीच्या मोर्चात सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. या मोर्चाआधी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारावर टीका केली. देश आणीबाणीच्या दिशेने चाललाय का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

  • 12 Oct 2026 11:15 AM (IST)

    पोलिसांकडून आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

    यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई, आदित्य ठाकरे संदीप देशपांडे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   तर मनसे आणि ठाकरे च्या काही नेत्यांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत.  काल झालेल्या आंदोलनावरून शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई केली.  सरकारी कामात अडथळा बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.  सरकारी कामात अडथळा आणल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विनापरवानगी जमाव जमवणे परवानगी नसताना आंदोलन करणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

  • 12 Oct 2026 11:07 AM (IST)

    राहुल गांधींच्या आंदोलनादरम्यान सरन्यायाधीशांचं मोठं विधान

    इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट नाकारल्याने सरन्यायाधीश सूर्यकांत चर्चेत आले आहेत. इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुप्रीम कोर्टाचे सर्वांसाठी खुले आहेत. कोणीही याचिका, कोणत्याही सामान्य व्यक्तीने याचिका दाखल केल्यास आम्ही दखल घेऊन सुनावणी करू, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिली.

  • 12 Oct 2026 11:06 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे नगरसेवक अन् स्थानिकांमध्ये हाणामारी

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईनच्या पाहणी दरम्यान ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक व स्थानिकांमध्ये हाणामारी झाली.  ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक गणेश लोखंडे यांच्यासह एकास अटक करण्यात आली.  उड्डाणपुलाच्या पडेगाव परिसरात लोखंडे आणि स्थानिक नागरिकांमध्ये राडा झाला होता.  परस्परांवर चाकूने वार केल्याने दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.  घरात घुसून वाहनांची तोडफोड केल्याच्या आरोपावरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 12 Oct 2026 10:55 AM (IST)

    एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवरील ड्रोनद्वारे रेकी झाल्याच्या आरोप

    जळगावच्या मुक्ताईनगरातील एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवरील ड्रोनद्वारे रेकी झाल्याच्या आरोपावरून पोलिसांकडून चौकशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंच्या तक्रारीनंतर जळगाव पोलिसांकडून तपास. फार्म हाऊस वरून उडणारे ड्रोन नव्हे तर संबंधित विमान प्रशिक्षण विमान असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न. विमानतळ प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांकडून फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या विमानाने उड्डाण केल्याची माहिती. पोलीस विभागाच्या वतीने प्रेस नोट च्या माध्यमातून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. संशयास्पद हालचालींच्या आरोपांची पडताळणी सुरू असून पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत प्रशिक्षण विमान असल्याचे समोर

  • 12 Oct 2026 10:50 AM (IST)

    अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा विषबाधेने मृत्यू

    अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू विषबाधेनेच; अधीक्षकेंसह चार महिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूल च्या वस्तीगृहातील १७ वर्षीय विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा मृत्यू अन्नातून झालेल्या विषबाधेमुळेच झाल्याचे अखेर न्यायवैज्ञानिक अहवालातून स्पष्ट झाले आहे..

  • 12 Oct 2026 10:49 AM (IST)

    ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहिम सुरु

    ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहिम सुरु आहे.  थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोहिमेत सामील होणार आहे.

  • 12 Oct 2026 10:46 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर ट्रकला आग लागून दोघांचा होळपळून मृत्यू

    समृद्धी महामार्गावर ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला आग लागून दोघांचा होळपळून मृत्यू.. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गावर आज सकाळी चैनल क्रमांक 127 वर एका ट्रकचा टायर फुटून ट्रक जळल्याने होरपळून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे.. हा ट्रक फुलकोबी घेऊन वाहतूक करत असल्याची माहिती आहे..

  • 12 Oct 2026 10:42 AM (IST)

    राहुल गांधीचे रिलाँच करण्यासाठी प्रभारी पदाधिकाऱ्यांना धमकावयातेय-नवनाथ बन

    राहुल गांधीचे रिलाँच करण्यासाठी प्रभारी पदाधिकाऱ्यांना धमकावत आहे, काँग्रेसमध्ये हुकूमशाही  सुरु आहे, नवनाथ बन यांनी हा आरोप केला आहे.

  • 12 Oct 2026 10:37 AM (IST)

    पार्लमेंट स्ट्रीटवर मोठा सुरक्षा दल तैनात

    पार्लमेंट स्ट्रीटवर मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस आघाडीच्या संभाव्य आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि इतर सुरक्षा दलेही तैनात करण्यात आली आहेत.

  • 12 Oct 2026 10:35 AM (IST)

    विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकीचा अपघातात मृत्यू

    विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील मायलेकीचा अपघातात मृत्यू. कविता पाल (वय २९) आणि आरायू पाल (वय ४) अशी मृत्यू झालेल्या मायलेकीची नावे आहेत. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास विरारच्या कोपरी नाका येथे टँकरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. वसईच्या गावराई येथून त्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • 12 Oct 2026 10:30 AM (IST)

    सोमेश्वर कारखाना निवडणूकीचा निकाल समोर

    सोमेश्वर कारखाना निवडणूकीचा निकाल समोर, सुनेत्रा पवार यांनी खाते उघडलं. ब वर्ग गटातून संग्राम सोरटे विजयी 131 पैकी 92 मत मिळाली आहे.

  • 12 Oct 2026 10:25 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन. वयाच्या 73 व्या वर्षी घेतला पुण्यात अखेरचा श्वास. दीर्घ आजारामुळे झाली निधन. लावणी तमाशाच्या फडातून झाला मधू कांबीकर यांचा कलाप्रवास सुरू…

  • 12 Oct 2026 10:20 AM (IST)

    सौरव दास आणि आशुतोष रांका आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी पोलीस ठाण्यात

    दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सौरव दास आणि आशुतोष रांका हे पार्लमेंट पोलीस ठाण्यात आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय. आंदळनाच्या परवानगीसाठी काॅक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार. अधिकृत परवानगी मिळवण्याच्या दृष्टीने सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांशी चर्चा करणार

  • 12 Oct 2026 10:15 AM (IST)

    बनगाव पाणीपुरवठा योजना 12 दिवसांपासून बंद

    बनगाव पाणीपुरवठा योजना 12 दिवसांपासून बंद….दीड लाख लोकसंख्येपेक्षा अधिक जनतेला याचा फटका….थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित….आमगाव व सालेकसा पंचायत समिती अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायत व इतर ग्रामपंचायतींचा समावेश…नागरिकांची पायपीट…

  • 12 Oct 2026 10:10 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयाची पाळ फुटली

    गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयाची पाळ फुटली….शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली….गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती…

  • 12 Oct 2026 10:08 AM (IST)

    दिल्ली पोलिस एडिट करुन व्हिडिओ दाखवत आहे- अभिजीत दिपके

    मोदींच्या हुकुमशाहीला आम्ही घाबरत नाही, आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार, दिल्ली पोलिस एडिट करुन व्हिडिओ दाखवत आहे, रात्री तीन वाजता पोलिस अरेस्ट पेपर आणले असा आरोप अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे.

  • 12 Oct 2026 10:05 AM (IST)

    ईव्हीएम विरोधात बोरिवलीत मनसेने अनोखं आंदोलन

    ईव्हीएम विरोधात बोरिवलीत मनसेने अनोखं आंदोलन छेडलं आहे. चालत्या-फिरत्या ‘लोकशाही रथा’तून जनतेचं थेट मतदान म्हणजेच मॉक पोल आणि स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी सांगितलं की, लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी दहिसर आणि बोरिवली पश्चिम परिसरात हे अनोखं आणि शांततापूर्ण जनआंदोलन करण्यात येत आहे. केवळ स्वाक्षरी मोहीम न घेता, चालत्या-फिरत्या टेम्पोवर दोन पारदर्शक पेट्या ठेवून ‘बॅलेट पेपर की ईव्हीएम?’ या मुद्द्यावर जनतेचं थेट मतदान प्रत्यक्ष रस्त्यावर घेतलं जात आहे.

  • 12 Oct 2026 09:40 AM (IST)

    भर नवरात्र उत्सवात पूजाकांचं अंबाबाई मंदिरातच ठिय्या आंदोलन सुरू

    नवरात्र उत्सवात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री पूजकांमधील वाद उफाळला आहे. पूजाकांचं अंबाबाई मंदिरातच ठिय्या आंदोलन सुरू आहे. देवस्थान समितीकडून उत्सव काळात धार्मिक कार्यात अडथळे आणले जात असल्याचा श्रीपूजक मंडळाचा आरोप.

  • 12 Oct 2026 09:30 AM (IST)

    दुष्काळ निवारणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून निधी उभारा- उदय सामंत

    दुष्काळ निवारणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून निधी उभारण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आवाहन. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले. दुष्काळ निवारणासाठी उदय सामंत यांच्याकडून १० लाख रुपयांच्या निधीची घोषणा.

  • 12 Oct 2026 09:20 AM (IST)

    दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने मध्यम जलस्रोत गाठत आहेत तळ

    जालना जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळतंय. कारण मागच्या दोन महिन्यापासून जालना जिल्ह्यात पाऊस झाला असल्याने जलस्रोत आटायला सुरुवात झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असलेला जीव रेखा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा देखील आता 0.042 टक्क्यावर येऊन पोहोचला असून आता फक्त मृतसाठाच शिल्लक राहिलाय.

  • 12 Oct 2026 09:10 AM (IST)

    ज्ञानेश कुमार यांना अटक करा- हर्षवर्धन सपकाळ

    आधी वेळ दिली, नंतर मात्र भेट नाकारली. आधी वेळ देणे भेट नाकारणं, यात काहीतरी गौडबंगाल आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच त्यांनी ज्ञानेश कुमार यांना अटक करा अशी मागणी केली आहे.

  • 12 Oct 2026 08:59 AM (IST)

    आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात दोन आंदोलन

    आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात दोन आंदोलन होणार आहेत.  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी मनसे आणि सीजीपी आक्रमक होणार असून,  मनसेकडून आज स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार दुसरीकडे ठाकरे सेनेचं दडपशाही विरोधात मूक आंदोलन होणार आहे, हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सामील होण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेने नागरिकांना आव्हान केलं.

  • 12 Oct 2026 08:50 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे ‘हुतात्मा केसरी २०-२०’ बैलगाडा शर्यतींचा थरार

    नवरात्रोत्सवानिमित्त आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे ‘हुतात्मा केसरी २०-२०’ बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित बैलगाड्यांनी या शर्यतीत सहभाग घेतला. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली.

  • 12 Oct 2026 08:40 AM (IST)

    नवरात्र उत्सवा निमित्त शिवनेरी गडावर आई शिवाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    राज्यभरात आज नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत असून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावरही आई शिवाई मातेच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुसूर ग्रामपंचायतीच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. गडावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आई शिवाई मातेच्या नावावरून ठेवण्यात आल्याची ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे शिवाई मातेच्या दर्शनाला विशेष महत्त्व असून, राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक शिवनेरी गडावर येत असतात. नवरात्र उत्सवा निमित्त आई शिवाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आई शिवाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.

  • 12 Oct 2026 08:30 AM (IST)

    जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा मध्यम प्रकल्पाचा पाणी साठा केवळ 0.042 टक्क्यांवर

    जालना जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आली असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. कारण मागच्या दोन महिन्यापासून जालना जिल्ह्यात पाऊस झाला असल्याने जलस्रोत आटायला सुरुवात झाली, जाफराबाद तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असलेला जीव रेखा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा देखील आता 0.042 टक्क्यावर येऊन पोहोचला असून आता फक्त मृतसाठाच शिल्लक राहिलाय, या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या 10 ते 12 गावांचा पिण्याच्या पाण्यासह हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय. दरम्यान येणाऱ्या काळात हीच परिस्थिती यापेक्षाही बिकट होणार हे देखील तितकच खरं आहे,दुष्काळी परिस्थितीचं विदारक चित्र दाखवणारा ड्रोन व्हिडिओ देखील समोर आला

  • 12 Oct 2026 08:18 AM (IST)

    मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच आस्थापनांवर कारवाई

    मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.  साई प्रितम, गोदावरी लॉजिंग, सफरॉन लॉजिंग, पंचमी हॉटेल-लॉज आणि पंचवटी एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला आहे.  पाहुण्यांची संपूर्ण माहिती नोंदवणे, ओळखपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे.  १६ सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश; मात्र पालन न केल्याचे तपासात उघड. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी देश-विदेशातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यावर पोलिसांचा भर आहे.

  • 12 Oct 2026 08:16 AM (IST)

    कल्याणमध्ये सोसायटीत घुसून मास्टर कीने दुचाकी चोरी; चोरटा पसार

    कल्याणमध्ये सोसायटीत घुसून मास्टर कीने दुचाकी चोरी केल्यानंतर चोरटा पसार झाला. ही  घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. दोन दिवसांनंतरही गुन्हा दाखल नसल्याचा दावा करण्यात येत आहे.  कल्याणच्या शहाड-मोहने रोडवरील गुरु दर्शन इमारतीत मध्यरात्री भिंतीवरून उडी मारून चोरट्याने प्रवेश केला. हँडल लॉक तोडून मास्टर कीने दुचाकी सुरू केली आणि सोसायटी सदस्याप्रमाणे बंद गेट उघडून दुचाकी घेऊन पसार झाला. दुचाकी चोरीला दोन दिवस उलटूनही खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नसल्याची तक्रार रमेश जाधव यांनी केली आहे, उच्चभ्रू सोसायटीतील चोरीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 12 Oct 2026 08:13 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याचे संकेत!

    धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील भूजलस्तर आता ८.८६ मीटरवर आला आहे. ऑक्टोबर हिट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिव पाणी पातळी झपाट्याने खाली आली आहे.  २० दिवसांत १.६६ मीटरने पाणी पटली घटली. जिल्ह्यातील ११४ निरीक्षण विहिरींची भूजल विभागाकडून तपासणी केली जात आहे,  कमी पाऊस आणि वाढत्या पाणी उपशामुळे भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे.

  • 12 Oct 2026 08:12 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे त्रंबकेश्वरच्या साधूंकडून स्वागत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे त्रंबकेश्वर च्या साधूंनी स्वागत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर ठिकाणी पाहणी करायला पाहिजे होती अशी अपेक्षा साधूंनी व्यक्त केली.  यापुढेही मुख्यमंत्र्यांनी अचानक कामांची पहाणी करण्याची मागणी केली. रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या कामाची पाहणी केल्याने यंत्रणेची धावपळ उडाली होती.

Published On - Oct 12,2026 8:08 AM

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?