Maharashtra Rain LIVE | कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द 

| Updated on: Jul 29, 2021 | 12:11 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता.

Maharashtra Rain LIVE | कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jul 2021 11:04 PM (IST)

    पंकजा मुंडे यांची गुरुवारी परळी शहरातून पुरग्रस्तांसाठी मदतफेरी

    परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गुरुवारी सकाळी अकरा वाजता परळी शहरातून पुरग्रस्तांसाठी मदतफेरी काढणार असून, त्याद्वारे जमा होणारी मदत कोल्हापूर, सांगली, कोकण भागातील पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे.

  • 28 Jul 2021 08:45 PM (IST)

    कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द 

    मुंबई : कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी

  • 28 Jul 2021 07:58 PM (IST)

    माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे, काळजी करण्याचे कारण नाही : जयंत पाटील

    जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल, असे जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

  • 28 Jul 2021 07:13 PM (IST)

    तळीये गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल : आदिती तटकरे

    मुंबई : एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगडमध्ये असावा अशी विनंती केली होती. एसडीआरएफचा बेस कॅम्प तरी रायगडमध्ये द्यावा अशी मागणी केली होती. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महाडमध्ये एक जागा उपलब्ध करुन तिथे हा बेस कॅम्प उभारला जाईल. पुनर्वसनाबाबत बाधितांवर जोर जबरदस्ती न करता त्यांच्या विनंतीप्रमाणेच पुनर्वसन केलं पाहिजे. जिथे तळीये गाव होतं. त्या गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल, असा निर्णय सरकारने घेतलाय. त्यावर लवकर अंमलबजावणी केली जाईल, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

    तळीये गावातील लोकांचं पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी 6 महिन्यात केले जाईल. त्यांच्या इच्चेनुसारच त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकार निर्णय घेईल.

  • 28 Jul 2021 07:12 PM (IST)

    ठाकरे सरकार एनडीआरएफचा एक बेस कॅम्प रायगडमध्ये उभारणारण्याची शक्यता, आदिती तटकरे यांचे संकेत

    रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगडमध्ये असावा अशी विनंती केली होती. एसडीआरएफचा बेस कॅम्प तरी रायगडमध्ये द्यावा अशी मागणी केली होती. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महाडमध्ये एक जागा उपलब्ध करुन तिथे हा बेस कॅम्प उभारला जाईल.  पुनर्वसनाबाबत बाधितांवर जोर जबरदस्ती न करता त्यांच्या विनंतीप्रमाणेच पुनर्वसन केलं पाहिजे. जिथे तळीये गाव होतं. त्या गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल, असा निर्णय सरकारने घेतलाय. त्यावर लवकर अंमलबजावणी केली जाईल, असं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

  • 28 Jul 2021 06:20 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात सायंकाळी काही ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात 

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात सायंकाळी काही ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात

    चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात

    आज चालू असलेल्या पावसामुळे पिकांना मिळणार नवसंजीवनी

    शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

  • 28 Jul 2021 05:57 PM (IST)

    अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत

    कोल्हापूर : अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर केलीय

    आज त्यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली

    यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल दहा कोटींची मदत जाहीर केली आहे.

  • 28 Jul 2021 05:40 PM (IST)

    रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कँप उभारण्यास मंजुरी

    मुंबई : रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कँप उभारणार

    राज्य सरकारनं अलिबाग इथं बेस कँपला मंजुरी दिली

  • 28 Jul 2021 04:39 PM (IST)

    अकोल्यात जोरदार पावसाला सुरुवात 

    अकोला : अकोल्यात जोरदार पावसाला सुरुवात

    अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

  • 28 Jul 2021 04:21 PM (IST)

    कृष्णेची पाणीपातळी 55 फुटावरून 43 फुटावर, पूर ओसरताच पंचनामे होणार 

    सांगली - कृष्णेची पाणीपातळी हळूहळू ओसरत आहे

    कृष्णेची पातळी 55 फुटावरून 43 फुटावर आली आहे

    पूर ओसरताच पंचनामे होणार

  • 28 Jul 2021 10:39 AM (IST)

    कोयना धरणाचा पाणीसाठा 90.88 टीएमसीपर्यंत पोहोचला

    कोयना धरणाचा पाणीसाठा 90.88 टीएमसी झाला

    105 tmc कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता

    कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस मंदावला

    धरणात 27186 कयुसेक पाणी आवक सुरु

    धरणाचे सहा दरवाजे 5 फुटावर स्थिर

    33266 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु

  • 28 Jul 2021 08:35 AM (IST)

    रावेर सातपुडा पर्वताने हिरवा शालू परिधान केला

    जळगाव

    रावेर सातपुडा पर्वताने हिरवा शालू परिधान केला

    -रावेर सातपुड्याच्या कुशीत वसलेले पाल अभयारण्य मान्सूनच्या आगमनानंतर जणू

    - सातपुडा पर्वताने हिरवा शालू परिधान केला

    जिल्ह्यातील पाल अभयारण्य एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे

    पाल अभयारण्य अनेक हिरव्यागार वनसंपत्ती आणि वन्यप्राण्यांनी नटलेलं क्षेत्र आहे

    अभयारण्य एक समृद्ध वृक्षसंपदेबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख

    कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षीही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहे

    रे व इको-टुरिझम मला गती देणारे असे पर्यटन स्थळ आहे.

  • 28 Jul 2021 07:47 AM (IST)

    मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर

    नाशिक -

    मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर

    दुपारपर्यंत नाशिकला पोहोचणार अमित ठाकरे

    आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अमित ठाकरे घेणार आढावा

    मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी करणार वन टू वन चर्चा

    आढावा घेऊन मनसे अध्यक्षांना पाठवणार अहवाल

    अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महापालिकेची जवाबदारी येण्याची शक्यता

  • 28 Jul 2021 07:44 AM (IST)

    कोकणातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला मराठा क्रांती मोर्चा

    औरंगाबाद -

    कोकणातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला मराठा क्रांती मोर्चा

    राज्यातील अतिवृष्टी ग्रस्तांसाठी पाठवणार अन्नधान्याची मदत

    मराठा क्रांती मोर्चाकडून अन्नधान्य संकलन केंद्र सुरू

    अतिवृष्टी ग्रस्तांसाठी अन्नधान्य मदत करण्याचं आवाहन

    आतापर्यंत चार क्विंटल अन्नधान्य झाले जमा

    जमा झालेले अन्नधान्य 29 तारखेला मराठा क्रांती मोर्चा पाठवणार कोकणात

    मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील कोटकर यांच्या नेतृत्वात केली जाणार मदत

  • 28 Jul 2021 07:25 AM (IST)

    महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं 66 कोटीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

    कोल्हापूर :

    महापुरामुळे जिल्ह्यात शेतीचं 66 कोटीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

    पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके झाली बाधित

    करवीर,शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका

    ऊस भात सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान

    शेतातील पाणी कमी झाल्या नंतरच पंचनामे केले जाणार

  • 28 Jul 2021 06:53 AM (IST)

    मुंबईत बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण

    मुंबईत बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण

    जोरदार, मुसळधार पावसाची नोंद अद्याप नाही

    मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी रिमझीम पावसाची नोंद

    दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची तसेच काही ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता

  • 28 Jul 2021 06:52 AM (IST)

    हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडले

    भुसावळ तालुक्यातील हातनूरचे दरवाजे गेल्या दोन दिवसापासून उघडलेले

    हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडले

    धरणातून 15750 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

    हातनुर धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडले

Published On - Jul 28,2021 6:50 AM

Follow us
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.