AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सावधान… ही घटना कोणत्याही देशात घडू शकते… नेपाळमधील सरकार कोसळताच राऊतांचं सूचक विधान; त्या इशाऱ्याने चर्चेला उधाण!

नेपाळमध्ये आंदोलकांनी संसदेला आग लावली आहे. जनतेच्या रागामुळे केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

Sanjay Raut : सावधान... ही घटना कोणत्याही देशात घडू शकते... नेपाळमधील सरकार कोसळताच राऊतांचं सूचक विधान; त्या इशाऱ्याने चर्चेला उधाण!
Raut on Nepal
| Updated on: Sep 09, 2025 | 5:29 PM
Share

Nepal Protest: नेपाळमध्ये आंदोलक आक्रमक झाले असून संसद भवन पेटवले आहे. तसेच अनेक मंत्र्यांची घरे जाळली आहेत. वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेच्या रागामुळे केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या देशाबाहेर पळाले असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा राजकारणात रंगली आहे.

नेपाळमध्ये संतप्त जमावाची नेत्याला मारहाण

आज नेपाळची राजधानी काठमांडूसह देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी राडा घातला. संतप्त जमावाने अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा पाठलाग केला आणि त्यांना रस्त्यावर पळवून-पळवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांचे ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना मारहाण होत असलेल्या या व्हिडिओवर ट्विट करताना म्हटलं की, ‘ही घटना कोणत्याही देशात घडू शकते, सावध रहा. भारत माता की जय, वंदे मातरम्.’ राऊत यांच्या विधानाचा रोख दुसऱ्या कोणत्याही देशाकडे नसून भारताकडे आहे. भारतातही एखाद्या नेत्याला मारहाण होऊ शकते असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे असं दिसत आहे.

विष्णू पौडेल कोण आहेत

विष्णू प्रसाद पौडेल हे नेपाळमधील महत्वाचे नेते आहेत, तसेच ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे उपाध्यक्ष आहेत. पौडेल हे मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री होते. याआधीही त्यांनी अनेक वेळा महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. 2021 मध्ये ते उपपंतप्रधान होते आणि त्यांनी गृह मंत्रालय, उद्योग मंत्रालय, पाणी मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचेही काम पाहिले आहे. ते याआधी 2020-2021 आणि 2015-16 अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच 1994 -99, 2008-09 आणि 2021 मध्ये त्यांनी जल मंत्रालयाचा कार्यभार सांभाळलेला आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.