Ujwal Nikam On Rajdroha : कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असी तरतूद व्हायला हवी

Ujwal Nikam On Rajdroha : कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असी तरतूद व्हायला हवी

| Updated on: May 06, 2022 | 8:07 PM

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात कोणते कलम लावायचे याबाबत पोलिसांचा अभ्यास कमी पडला. न्यायालयानं कलम लागत नाही असं सांगितल्यावर सरकारला चपराक असं म्हणता येणार नाही. पण समोर आलेल्या पुराव्यानुसार हा राजद्रोह सिद्ध होत नाही हे कोर्टानं सांगितलं.

मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions court) नोंदवलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या भाषण, लिखाण किंवा कृतीद्वारे सरकारची बदनामी होत असेल तर ती दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी त्या काळी निर्माण केलेलं हे कलम आजही लावलं जातंय. मात्र भारतीय राज्य घटनेत तर प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या कलमात आता सुधारणा झाली पाहिजे, असं मत अनेकदा व्यक्त केलं गेलंय. सुप्रीम कोर्टातदेखील हा प्रश्न प्रलंबित आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दिली. राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी लावलेलं हे कलम चुकीचं असल्यामुळे पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Published on: May 06, 2022 08:07 PM