AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, आयतं कोलीत मिळताच विरोधकांचा आरोपाचा डाव रंगला, कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला

Manikrao Kokate Play Rummy : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. आरोपांचा डाव रंगला आहे. तर कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला सुरू झाला आहे.

'शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी', आयतं कोलीत मिळताच विरोधकांचा आरोपाचा डाव रंगला, कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला
माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधक तुटून पडले Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 20, 2025 | 11:40 AM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादात सापडले आहेत. वाद आणि कोकाटे हे समीकरण आता जास्तच जुळल्याचे एका व्हिडिओवरून समोर आले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करताच आरोपांचा डाव रंगला आहे. तर कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला सुरू झाला आहे.

रोहित पवारांनी व्हिडिओ केला शेअर

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठीना विचारू असं सुनील तटकरे यांनी म्हणल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तटकरे यांना उत्तर देताना सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप निर्णय घेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही काम शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यामुळेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहात बसून रम्मी खेळण्याची वेळ आली असावी असा टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी कृषिमंत्री यांचा व्हिडिओ ट्विट करताना जंगली रम्मी पे आओ ना महाराज म्हणत कृषीमंत्र्यांच्या परिस्थितीची खिल्ली उडवली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांना चांगलाच चिमटा काढला आहे. ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, असा खणखणीत टोला त्यांनी लगावला आहे.

यापूर्वी त्यांनी कृषीमंत्र्यांच्या व्हिडिओवर जळजळीत प्रतिक्रिया दिली. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांविषयी उलटसूलट वक्तव्य करायचे. दुसरीकडे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत. तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत असल्यावर त्यांनी टीका केली.

विजय वडेट्टीवार यांचा घाणाघात

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. हे नत भ्रष्ट सरकार आहे. हे जनतेच्या बोकांडी बसलेल नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच परवा नसलेल हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली दबलेला आहे. आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. वन थर्ड शेतकरी हे पीक विम्याचे राज्य सरकार भरत होतं. आता पूर्णतः पिक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे. मत घ्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहेय, अशी टीका त्यांनी केली.

भाजपवाल्यानी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलाय. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे, असा घाणाघात वडेट्टीवार यांनी घातला. चड्डी बनियान लुंगी बनियान वाले मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललंय महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यांना तुमचा सरकार नाही तुमचं तुम्ही बघा. यात धोकेबाज सरकारला धडा शिकवा, आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषिमंत्री यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.