मालवणीत भाजपाने लावलेले प्रभू रामाचे पोस्टर्स पोलीसांनी फाडल्याचा आरोप, प्रकरण चिघळणार?

अयोध्या येथे राम मंदिर उभारणीसंदर्भात भाजपने लावलेले पोस्टर मालवणी पोलिसांनी फाडल्याच्या आरोप होतोय. (Ram temple banner Malwani police)

मालवणीत भाजपाने लावलेले प्रभू रामाचे पोस्टर्स पोलीसांनी फाडल्याचा आरोप, प्रकरण चिघळणार?
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 9:59 AM

मुंबई : भाजपने मालवणी येथे राम मंदिरासंदर्भात लावलेले पोस्टर मालवणी पोलिसांनी फाडल्याच्या आरोप होतोय. या आरोपनंतर आता भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला असून येथील भाजप नेते आज ( 23 जानेवारी) मालवणी पोलीस ठाण्यावर जाऊन यासंबधी जाब विचारणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा यात सहभाग असेल. (banner of lord Ram temple is torned by Malwani police alleged by BJP)

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर अनेक गटांकडून मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे काम सुरु आहे. भाजपडून मंदिर उभारणीसंबंधी जनजागरण मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मालवण भागात राम मंदिर उभारणीविषयी माहिती देणारं बॅनर लावण्यात आलं होतं. मालवणी पोलिसांनी हे बॅनर 15 जानेवारी रोजी फाडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच बॅनर फाडल्यामुळे शेकडो हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचंहीभाजपने म्हटलं आहे.

भाजप कार्यकर्त्यांवरच कारवाई

हा प्रकार घडल्यानंतर भाजप नेते गणेश खणकर, माजी नगरेवक आणि मुंबई भाजपचे सचीव विनोद शेलार यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी मालवणी पोलिसांना याबाबत विचारले. मात्र, चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर येथील पोलिसांनी भाजप नेत्यांवरच कारवाई करण्यास सुरुवात केली, असा आरोप भाजपने केला आहे.

पोलिसांना जाब विचारणार

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप आमदार भाई गिरकर, भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री योगेस सागर, भाजप आमदार सुनील राणे, भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आज मालवणी पोलीस ठाण्यात जाणार आहेत. यावेळी ते येथील पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या कारवाईबाबत विचारणा करणार आहेत. त्यामुळे राम मंदिरासंबंधिचे बॅनर फाडण्याचं हे प्रकरण आगामी काळात चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या :

राम मंदिरासाठी निधी गोळा करणारी मुस्लीम महिला कोण? लोकांकडून जोरदार कौतुक

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी गौतम गंभीरकडून 1 कोटी रुपयांचा निधी

शिक्षण अवघं सातवीपर्यंत, तरीही अब्जावधींची उलाढाल, राम मंदिरासाठी 11 कोटी देणारा उद्योगपती आहे तरी कोण?

(banner of lord Ram temple is torned by Malwani police alleged by BJP)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.