बीएमसी आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स, खाजगी सुरक्षारक्षक नेमल्याने महापौरही चकित

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत.

बीएमसी आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स, खाजगी सुरक्षारक्षक नेमल्याने महापौरही चकित
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 5:15 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात (Bouncers Posted For Security Outside The BMC Commissioners Office) करण्यात आले आहेत. पालिकेचे साडेतीन हजार सुरक्षा रक्षक असतानाही थेट खासगी सुरक्षा रक्षक नेमून लाखोंची उधळपट्टी करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना कुणापासून धोका आहे?, पालिका आयुक्त कुणाला इतकं घाबरत आहेत? पालिकेत खाजगी बाऊन्सर्सना बोलावण्याची वेळ का आलीय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे (Bouncers Posted For Security Outside The BMC Commissioners Office).

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या मागेपुढं असणारे हे बाऊन्सर्स आता मुंबई महापालिकेत पहायला मिळत आहेत. पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या कार्यालयाबाहेर इतकी कडक सुरक्षा व्यवस्था कधीच नव्हती. परंतु आता मात्र काळ्या ड्रेसमधील, बॉडी कमावलेले बाऊन्सर्स पहायला मिळत आहेत. आयुक्त कार्यालयाबाहेरच्या व्हरांड्यातून इकडून तिकडं जाणाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. असं काय झालं की आयुक्तांना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर भरवसा राहिला नाही. विरोधकांनी यासंदर्भात आयुक्तांना लक्ष्य केलं आहे.

मागील आठवड्यात भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करुन त्यांच्या नेमप्लेटवर निषेधाचे फलक चिकटवले होते. तसेच, बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेराव घालत त्यांना कोंडून ठेवले होते. याचाच धसका बहुधा आयुक्तांनी घेतल्याचे दिसतं आहे. नगरसेवक हे गुंड आहेत का? त्याच्यासाठी बाऊन्सर्स बोलवले जात आहेत, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला आहे.

आयुक्तांनी बाऊन्सर्स नेमण्याला महापौरांनीही विरोध केला आहे. बाऊन्सर्सची गरज त्यांना असते जे वाईट कामं करतात. आयुक्तांना तशी गरज वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

पालिकेच्या सुरक्षा रक्षकांबरोबर खाजगी सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या प्रत्येक गेटवर पहायला मिळत आहेत. त्यामुळे आयुक्तांना नेमकी कुणाची भीती वाटतंय, ज्यासाठी एवढा वारेमाप खर्च करण्याची वेळ आली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Bouncers Posted For Security Outside The BMC Commissioners Office

संबंधित बातम्या :

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा

मुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.