मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर FastTag अनिवार्य, लाँग वीकेंडहून परतणाऱ्या वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर FastTag अनिवार्य, लाँग वीकेंडहून परतणाऱ्या वाहनांच्या रांगा

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्यामुळे सोमवारी रजा घेऊन अनेक जणांनी लाँग वीकेंडचा आनंद घेतला (FASTag Mumbai-Pune Expressway)

अनिश बेंद्रे

|

Jan 26, 2021 | 2:14 PM

पिंपरी चिंचवड : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे वरळी सी लिंकवर आजपासून वाहनांना फास्टटॅग (FasTag) अनिवार्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक्स्प्रेस वेवर फास्टटॅग वाहनधारकांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे फास्टटॅग वापरणाऱ्या कारचालकांची संख्या वाढल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (FASTag compulsory at Bandra-Worli Sea Link Mumbai-Pune Expressway)

लाँग वीकेंडसाठी पर्यटक हिल स्टेशनला

प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला सुट्टी असल्यामुळे सोमवारी रजा घेऊन अनेक जणांनी लाँग वीकेंडचा आनंद घेतला. चौथा शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिन (मंगळवार) यांच्यामध्ये सोमवारी सुट्टी घेऊन अनेकांनी हॉलिडेचं नियोजन केलं होतं. त्यामुळे लोणावळा, खंडाळा, पुणे यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढला.

परतीच्या प्रवासामुळे एक्स्प्रेस वेवर गर्दी

रोड ट्रीप करत कारने निघालेल्या कुटुंबांमुळे शनिवारी एक्स्प्रेस वेवर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. आता आज (मंगळवारी) सुट्टी संपवून परतीच्या प्रवासाला लागलेल्या पर्यटकांमुळे प्रजासत्ताक दिनी सकाळपासूनच पुन्हा ट्राफिक जामची स्थिती पाहायला मिळाली. एक्स्प्रेस वेवर फास्टटॅग अनिवार्य केल्यामुळे जुन्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढल्याने सोमाटणे, तळेगाव टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

फास्टटॅगचे बंधन

फास्टटॅगधारकांसाठी असलेल्या टोलनाक्यावरील रांगेत अन्य वाहनाने प्रवेश केल्यास त्यांना दुप्पट टोल आकारला जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे वरळी सी लिंकवर वाहनचालकांना पैसे देऊन टोल भरता येईल, मात्र तिथल्या स्टॉल्सवर फास्टटॅग विकत घेणे बंधनकारक असेल.

टोलनाक्यावर फास्टटॅगद्वारे पेमेंट करणाऱ्या वाहनधारकांना पाच टक्के कॅशबॅक देण्याची योजना एमएसआरडीसीने मर्यादित काळासाठी सुरु केली आहे. रेडिओ फ्रीक्वेन्सीद्वारे टोलनाक्यांवर फास्टटॅग तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. यामुळे सुट्ट्या पैशांचा त्रास, वेळ वाचणार आहे. फास्टटॅग लिंक केलेल्या बँक वॉलेटमधून डिजिटली टोलची रक्कम वजा होईल. वॉलेटमध्ये पुरेशी रक्कम नसल्यास कारचालकांना मेसेज येईल.

संबंधित बातम्या :

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

FASTag | आता व्हॉट्सॲपसह ‘या’ पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

(FASTag compulsory at Bandra-Worli Sea Link Mumbai-Pune Expressway)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें