मुंबई महापालिकेच्या निवृत्तीवेतन धारकांसाठी Form-16 31 मार्च 2022 पर्यत उपलब्ध

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 6:21 PM

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 1 लाख 8 हजार 923 निवृत्तीवेतन धारक आहेत. या कर्मचाऱ्यांना संबंधित नियमांनुसार दरमहा निवृत्तीवेतन देण्यात येते.

मुंबई महापालिकेच्या निवृत्तीवेतन धारकांसाठी Form-16 31 मार्च 2022 पर्यत उपलब्ध
BMC

Follow us on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना संबंधित नियमांनुसार दरमहा निवृत्तीवेतन देण्यात येते. याबाबत ऑगस्ट 2021 मध्ये उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 1 लाख 8 हजार 923 निवृत्तीवेतन धारक आहेत. यापैकी 72 हजार 562 इतक्याच निवृत्तिवेतनधारकांचे ‘प्रपत्र-16’ (Form-16) महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. (Form-16 available for BMC pensioners till 31st March 2022)

या निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या स्तरावर आयकर व परतावा विषयक कार्यवाही करणे गरजेचे असते. या अनुषंगाने निवृत्तीवेतन धारकांना ऑनलाईन पद्धतीने आर्थिक वर्ष 2020-21 चे आयकर विषयक ‘प्रपत्र – 16’ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जेणेकरुन, निवृत्तीवेतन धारकांना घरबसल्या आवश्यक ती संबंधित कार्यवाही करणे सुलभ होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या प्रमुख लेखापाल (कोषागार) विभागाच्या सुलोचना कवडे यांनी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सालाबादप्रमाणे कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारक यांना आर्थिक वर्ष 2020-21 चे आयकर विषयक ‘प्रपत्र – 16’ ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Form-16 कसे प्राप्त होतील?

  • सदर ऑनलाईन प्रपत्रे (Form) कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरचा उपयोग करुन प्राप्त करता येऊ शकतील.
  • इंटरनेट ब्राऊझर ओपन केल्यानंतर ‘https://form16.mcgm.gov.in’ या संकेतस्थळावर लॉग इन करावे.
  • दिलेल्या चौकोनामध्ये कर्मचारी संकेतांक नमूद करणे
  • त्याखालील चौकोनामध्ये ‘पॅन’ क्रमांकाची अचूक नोंद करावी.
  • कर्मचारी संकेतांक आणि पॅन क्रमांकाची नोंद केल्यावर स्क्रीनवर दिसणाऱ्या captcha code दिलेल्या चौकोनामध्ये अचूक नोंद करणे
  • नंतर ‘कन्फर्म’ (confirm) वर क्लिक करावे.

आपला ‘FORM 16’ दोन भागांमध्ये म्हणजे ‘भाग अ’ (PART A) आणि ‘भाग ब’ (PART B) स्क्रीनवर दिसेल. ‘भाग अ’ (PART A) हा आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एकूण वजा केलेल्या आयकराशी संबंधित आहे आणि ‘भाग ब’ (PART B) हा आर्थिक वर्ष 2020-21 मधील उत्पन्न, गुंतवणूक आणि त्यावरील आयकर यांचा तपशील आहे. त्यानंतर ‘डाऊनलोड’ (Download) वर क्लिक करावे.

‘भाग अ’ (PART A) मधील एकूण वजा केलेली आयकराची रक्कम, ‘भाग ब’ (PART B) मध्ये नमूद केलेल्या देय आयकराच्या रकमेतून वजा करुन योग्य ती आयकर देय किंवा परताव्याची रक्कम मिळवावी आणि निर्धारित वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न आयकर खात्याला सादर करावे. आर्थिक वर्ष 2021-21 चे प्रपत्र – 16 महापालिकेच्या संकेतस्थळावर फक्त 31 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध राहील, याची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आयकर विभागाच्या नियम क्रमांक 26C हा नुसार आर्थिक वर्ष 2021-22 करिता निवृत्तीवेतन धारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतले असल्यास निवृत्ती वेतन धारकांनी प्रपत्र ‘12 बीबी’ हे www.incometaxindia.gov.in या साईटवर जाऊन, Forms.. Income tax.. forms.. Form No.: 12BB या इंटरनेट पाथनुसार ‘डाऊनलोड’ करावे. ‘डाऊनलोड’ केलेले फॉर्म वित्तीय संस्थेच्या ‘पॅन’ क्रमांकासह सर्व माहिती ‘प्रपत्र-12 बीबी’ (12BB) मध्ये नमूद करुन ते पुढील पत्त्यावर विहित वेळेत सादर करावे.

इतर बातम्या

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी सरकारचं पाऊल, 5 नवीन अत्याधुनिक वेगवान गस्तीनौका

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या

(Form-16 available for BMC pensioners till 31st March 2022)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI