कंटेनमेंट झोनबाहेर फिरायला जाताय? सरकारची ही नियमावली तुमच्यासाठी

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

कंटेनमेंट झोनबाहेर फिरायला जाताय? सरकारची ही नियमावली तुमच्यासाठी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी नवी नियमावली जारी करण्यात आली आहेत. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना नव्या नियमावलीची कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले आहेत. (Government announces new SOP for tourist destinations and tourists outside the containment zone)

मिशन बिगीन अगेन अंतर्गत 21 डिसेंबर २०२० रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पर्यटनस्थळांवर मास्कचा वापर, सॅनियाटयजरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटनस्थळांचे ऑनलाईन तिकीट बुकींग करावे, पर्यटनस्थळांवर फक्त लक्षणे विरहीत पर्यटकांनाच परवानगी असेल, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, १० वर्षाखालील मुले, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींनी घरीच थांबावे, पर्यटकांनी शक्यतो चलन वापरण्याचे टाळून डिजीटल पेमेंटवर भर द्यावा, अशा विविध सूचना पर्यटकांसाठी देण्यात आल्या आहेत.

पर्यटनस्थळांवर कोरोना संसर्गाला आळा घालणयासाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन आणि संबंधीत विविध विभागांतील प्रतिनिधींची कोव्हिड 19 टीम बनविण्यात यावी. या टीमने पर्यटनस्थळांवर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटनस्थळांवर किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यासंदर्भात निर्णय घ्यावा. समूहभेटी, गाईडेट टुर्स, सार्वजनिक कार्यक्रम, विशेष किंवा खाजगी कार्यक्रम आदींवर व्यवस्थापन नियंत्रण करु शकते.

पर्यटनस्थळांवरील विविध आस्थापनांचे कर्मचारी यांनीही कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घ्यावयाची आहे. तसेच अन्नपदार्थ आणि पेयांचा पुरवठा करताना घ्यावयाची काळजी याबाबतही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. संबंधित आस्थापनांनी मार्गदर्शक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हे ही वाचा

Varsha Sanjay Raut | ईडी कार्यालयात हजेरीचे आदेश, संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांच्या चौकशीकडे लक्ष

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI