AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Guardian Minister List: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठले पालकत्व, मुंडे यांना कोणता जिल्हा? वाचा संपूर्ण यादी?

Maharashtra Guardian Minister List: गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच तीन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.

Maharashtra Guardian Minister List: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठले पालकत्व, मुंडे यांना कोणता जिल्हा? वाचा संपूर्ण यादी?
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jan 18, 2025 | 9:42 PM
Share

Guardian Minister list announced: राज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वादात आलेले धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्यांचे नाव बीडसाठी चर्चेत होते. परंतु त्यांना मोठा विरोध होत होता. यामुळे आता अजित पवार बीडचे पालकत्व सांभाळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच तीन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.

तीन जिल्ह्यांना सहपालकमंत्रीसुद्धा

तीन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.

तीन जणांना दोन जिल्हे

एकनाथ शिंदे, अजित पवार आणि चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्हे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांना ठाणे सोबत मुंबईची जबाबदारी दिली आहे. तसेच अजित पवार यांनाही बीड आणि पुणे जिल्हा दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्हा दिला आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री

  • गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्रीआशिष जयस्वाल
  • नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
  • अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
  • ठाणे – एकनाथ शिंदे
  • मुंबई शहर- एकनाथ शिंदे
  • पुणे – अजित पवार
  • बीड – अजित पवार
  • सिंधुदुर्ग- नितेश राणे
  • अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
  • वाशिम – हसन मुश्रीफ
  • सांगली – चंद्रकांत पाटील
  • सातारा -शंभुराजे देसाई
  • छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
  • जळगाव – गुलाबराव पाटील
  • यवतमाळ – संजय राठोड
  • कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
  • अकोला – आकाश फुंडकर
  • भंडारा – संजय सावकारे
  • बुलढाणा – मकरंद जाधव
  • चंद्रपूर – अशोक ऊईके
  • धाराशीव – प्रताप सरनाईक
  • धुळे – जयकुमार रावल
  • गोंदिया – बाबासाहेब पाटील
  • हिंगोली – नरहरी झिरवळ
  • लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
  • मुंबई शहर – एकनाथ शिंदे
  • मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
  • नांदेड – अतुल सावे
  • नंदुरबार – माणिकराव कोकाटे
  • नाशिक – गिरीष महाजन
  • पालघर – गणेश नाईक
  • परभणी – मेघना बोर्डीकर
  • रायगड – अदिती तटकरे
  • सिंधुदुर्ग- नितेश राणे
  • रत्नागिरी – उदय सामंत
  • सोलापूर – जयकुमार गोरे
  • वर्धा – पंकज भोयर
  • जालना – पंकजा मुंडे
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.