AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून स्वत:हून बाहेर पडणार, कारण काय?

गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून स्वत:हून बाहेर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई हायकोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून स्वत:हून बाहेर पडणार, कारण काय?
गुणरत्न सदावर्ते
| Edited By: | Updated on: Oct 14, 2024 | 7:00 PM
Share

बिग बॉस हिंदीमध्ये गेलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे स्वतःहून लवकरच बिग बॉसच्या घरातून बॅक आऊट करणार आहेत. गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून लिव्ह घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसला आपली अडचण कळवली आहे. 7 दिवसांपूर्वी गेलेले गुणरत्न सदावर्ते हे लोकप्रियता मिळत असल्याने अद्यापही बिग बॉस हिंदीच्या घरातच आहेत. त्यांनी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसले आहेत”, अशी माहिती वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आली. यावेळी हायकोर्टाने सदावर्ते यांच्यावर ताशेरे ओढले.

“या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले?”, असा सवाल हायकोर्टाने केला. “मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही”, असं हायकोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे सदावर्ते यांना आता या प्रकरणी युक्तिवाद करता येणार नाही. पण तरीही पुढच्या सुनावणीला त्यांनी विनंती केल्यावर त्यांना हायकोर्ट युक्तिवादासाठी परवानगी देतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सदावर्ते पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार?

बिग बॉस तक या ट्विटर हँडलवर गुणरत्न सदावर्ते बाहेर जाणार असल्याची बातमी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या केससाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहेत. ते कदाचित नंतर पुन्हा घरात जाऊ शकतात, असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सुनावणी संपल्यानंतर सदावर्ते पुन्हा बिग बॉसच्या घरात जातात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सुनावणी आता 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.