AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai versova fire live update | 10 ते 12 सिलिंडरचा स्फोट, घटनेचा पोलिसांकडून तपास

| Edited By: | Updated on: Apr 15, 2021 | 3:47 PM
Share

Mumbai Varsova fire news : शहरातील वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली लागल्याची घटना घडली आहे. (Mumbai versova fire)

Mumbai versova fire live update | 10 ते 12 सिलिंडरचा स्फोट, घटनेचा पोलिसांकडून तपास
अशा प्रकारे वर्सोवा येथे आग लागली आहे.

मुंबई : शहरातील वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली लागल्याची घटना घडली. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील एका गोदामाला आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. अजूनतरी आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.  (In Mumbai versova fire of level 2 has been broke out)

अग्निशमन दलाच्या 16 गाड्या दाखल

वर्सोवा परिसरातील यारी रोडवर आग लागल्याची घटना घडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच येथे अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मानखुर्दमधील आग 8 तासांनी आटोक्यात

मानखुर्दमधील केमिकल कंपनीच्या गोदामाला 5 फेब्रुवारी रोजी आग लागली होती.  यावेळीआगीचे वृत्त समजताच मुंबई, नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 30 गाड्या, 50 हून अधिक पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम करीत असताना केमिकल अंगावर उडाल्याने एक अग्निशमन दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला होता.

दरम्यान, सिलिंडरच्या स्फोटमुळे लागलेल्या आगीचे स्वरुप मोठे असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही 16 अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

इतर बातम्या :

Mumbai Mankhurd Fire | तब्बल आठ तासानंतर मानखुर्दमधील आग आटोक्यात

मुंबईत गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओत आग, अनेक लोक अडकल्याची शक्यता; पाहा व्हिडिओ!

प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू

(In Mumbai versova fire of level 2 has been broke out)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Feb 2021 01:45 PM (IST)

    10 ते 12 सिलिंडरचा स्फोट, घटनेचा पोलिसांकडून तपास

    वर्सोवा येथे एकूण 10 ते 12 सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथे आग लागली. मुंबई अग्निशमन दल आणि पोलिस पथक या आगीच्या घटनेची तपास करीत आहेत, ही आग ज्या ठिकाणी लागली आहे त्या जागेत सिलिंडरचे गोदाम आहे. आगीमुळे आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

  • 10 Feb 2021 01:30 PM (IST)

    सिलिंडरच्या स्फोटामुळे बाजूच्या झोपडपट्टीतील घरांच्या भिंतीचे नुकसान

    वर्सोवा येथे सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीचा परिणाम बाजूच्या झोपडपट्टी परिसरातही झाला आहे. सिलिंडरच्या स्फोटात झोपडपट्टीमध्ये असलेल्या काही घरांच्या भितींचे नुकसान झाल्याचे तेथे राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे.

  • 10 Feb 2021 01:25 PM (IST)

    सध्या आग नियंत्रणात, प्रकरणाची चौकशी सुरु : डीसीपी अभिषेक त्रिमुखे

    वर्सोवा येथे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे येथील डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. तसेच या आगीत 4 जाण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचेही ते म्हणाले.

  • 10 Feb 2021 01:16 PM (IST)

    कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी : भारती लव्हेकर

    मुंबई : र्सोवा येथे यारी रोडवर सिलेंडरच्या गोदमाला आग लागून चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी हे सर्व अनधिकृत व्यवसाय सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यांनतर घटनास्थळासा स्थानिक आमदार भारती लव्हेकर यांनी भेट दिली. याविषयी बोलताना, ‘या ठिकाणी जर अनधिकृत असे काही असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. माझाकडे अश्या प्रकारे काही तक्रार आली नव्हती. मात्र, ज्या विषयीची तक्रार करुनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे,’ असे आमदार लव्हेकर म्हणाल्या.

Published On - Feb 10,2021 1:45 PM

Follow us
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.