AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंबोजवर 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप; भाजपामध्ये प्रवेश करताच कारवाईला स्थगिती- मलिक

कंबोज यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांनी 1100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या चौकशीला स्थगिती देण्यात आल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

कंबोजवर 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप; भाजपामध्ये प्रवेश करताच कारवाईला स्थगिती- मलिक
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 07, 2021 | 11:27 AM
Share

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्स प्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेले मोहीत कंबोज हे वानखेडे यांचे  साथीदार असून तेच आर्यनखान प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. कंबोज यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांनी 1100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये आणि आता भाजपामध्ये गेलेल्या नेत्याच्या मागे फिरत होते. सरकार बदलल्याने त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. दिंडोशीतून निवडणूक लढवली, मात्र पराभूत झाल्याने त्यानंतर त्यांना भाजप युवा मोर्चाचे पद देण्यात आले. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या घरावर सीबीआयची धाड पडली होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चौकशीच बंद झाल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

मेव्हुण्याच्या मदतीने कट रचला 

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, मी 9 ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी एससीबीचे अधिकारी वानखेडे यांनी सात ते आठ लोकांना अटक केल्याचे व्हिडीओमधून दिसून येत होते. मात्र कीती लोकांना अटक करण्यात आली? याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. किती लोकांना अटक केली आहे, याचा खुलासा वानखेडे का करत नाही असा सवालही मी त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानंतर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन 14 लोकांना अटक केल्याचे सांगितले, मात्र अटक झालेल्या आरोपींची नावे त्यांनी सांगितली नव्हती. घटनास्थळावरून यातील तीघांना अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा, ऋषभ सचदेव यांना त्यांचे कुटुंबीय घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे तिघे कंबोज यांचे मेव्हुणे असल्यानेच त्यांची सुटका करण्यात आली, व आर्यन खानला खंडणीसाठी या प्रकरणात आडकवण्यात आले. कंबोज यांनी आपल्या मेव्हुण्याच्या मदतीने हा कट रचल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

कंबोज, वानखेडेंचे चांगले संबंध 

आर्यन खान हा क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही, त्याला बोलावण्यात आले होते. कंबोज यांचे मेव्हुणे असलेल्या प्रतिक गाभा आणि सचदेवने त्याला पार्टीसाठी बोलवले होते. आणि त्यानंतर पद्धशीरपणे प्लॅन करून त्याला अडकवण्यात आले. हा किडनॅपिंगचा प्रकार असून, कंबोज हा या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. ते खंडणी वसूल करण्याचे काम करतात. त्यांचे आणि वानखेडे यांचे चांगले संंबंध आहेत,  याबाबतचा एक व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे देखील मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान सात तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमीजवळ भेटल्याचा गौप्यस्फोट देखील यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे. ड्रग्सचा धंदा सुरूच राहावा असे वानखेडेंना वाटत असून, ते याच्या नावाखाली बॉलिवूडमधील कलाकारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या 

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

हा सॅम डिसूझा नाही, सॅनविल स्टॅनली डिसूझा आहे, मलिक यांचं ट्विट

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?