AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Bandh : उद्या महाराष्ट्र बंदची हाक; महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा, या सेवा होणार प्रभावित, चाकरमान्यांना बसेल फटका

Maharashtra Bandh 24 August 2024 : उद्या 24 ऑगस्टला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा अनेक सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Bandh : उद्या महाराष्ट्र बंदची हाक; महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा, या सेवा होणार प्रभावित, चाकरमान्यांना बसेल फटका
महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक
| Updated on: Aug 23, 2024 | 9:08 AM
Share

महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो.

जागा वाटपाची चर्चा रद्द

महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा होणार होती. पण राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा मांडत जागा वाटपाची चर्चा रद्द करण्यात आली आणि शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यात बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामकाजावर परिणाम दिसू शकतो.

प्रत्येकाने बंद पाळा

‘मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे.’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. हा राजकीय पक्षांचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावा यासाठी हा बंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक दळणवळणावर परिणाम

राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे.

बाजारपेठ राहतील बंद

हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

जालन्यात काँग्रेसकडून बंदची हाक

जालना काँग्रेसच्या उद्याजालना बंदची हाक देण्यात आलीये.. बदनापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेलं हिसांचार प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालये आणि शाळा याठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगिता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.. उद्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली असून व्यापार्यांनी सहकार्य करावं असंही संगिता गोरंट्याल यांनी म्हंटलंय.. दरम्यान बदलापूर प्रकरणात एका महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरल्या प्रकपणा माजी नगराध्यक्षा विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी संगिता गोरंट्याल यांनी केली आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण