AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डबल नेमचा खेळ कुणाचा करणार गेम? अनेक मतदारसंघात सारख्या नावाचा प्रयोग, बिघडवणार गणित?

Same Name Game : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पाडापाडीसाठी आतापासूनच अनेक राजकीय पक्षांनी पडद्यामागून डावपेच आखले आहे. आता डाव टाकून मतदानावेळी उमदेवाराला पेचात टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. डबल नेमचा गेम कोणत्या उमेदवाराचं गणित बिघडवेल हे निकालानंतर समोर येईल.

डबल नेमचा खेळ कुणाचा करणार गेम? अनेक मतदारसंघात सारख्या नावाचा प्रयोग, बिघडवणार गणित?
डबल नेमचा फास कुणाला?
| Updated on: Nov 01, 2024 | 4:37 PM
Share

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 8 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामधील 7,994 उमेदवारांचे अर्ज छाननीनंतर वैध ठरले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. पण आता या निवडणुकीत एक नवीन ट्विस्ट आला आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पाडापाडीसाठी आतापासूनच अनेक राजकीय पक्षांनी पडद्यामागून डावपेच आखले आहे. आता डाव टाकून मतदानावेळी उमदेवाराला पेचात टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. डबल नेमचा गेम कोणत्या उमेदवाराचं गणित बिघडवेल हे निकालानंतर समोर येईल.

आता उमेदवारांचे देव पाण्यात

राज्यातील अनेक मतदारसंघात उमेदवारांचे देव सध्या पाण्यात आहेत. कारण त्यांच्या नामसदृश्य काही उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकाच नावाचे दोन-दोन, तीन-तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकणार आहेत. आता ज्या मतदारसंघात उमेदवार अर्ज मागे घेतील. तेथील उमेदवार सुटकेचा निश्वास टाकतील. तर इतर ठिकाणी या सारख्या नावामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. पक्षीय चिन्हं समोर असले तरी नाम साधार्म्यामुळे गुलिगत धोका होण्याची दाट शक्यता आहे.

या मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार

राज्यातील काही मतदारसंगात एकाच नावाचे अनेक उमेदवार मतदारांना दिसतील. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. आता या उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवले आहे.

पर्वती मतदारसंघ : या मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ विरुद्ध शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांच्यात मुख्य लढत आहे. पण या ठिकाणी दोन अश्विनी कदम नावाच्या महिलांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात एकूण तीन अश्विनी कदम उमेदवार असतील.

मुक्ताईनगर मतदारसंघ : या मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे चंद्रकांत पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यात थेट लढत होत आहे. याठिकाणी रोहिणी गोकुळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे अशा नावाच्या दोन अपक्ष महिला आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये अपक्ष अर्ज भरणाऱ्या दोन्ही रोहिणी खडसेंपैकी एक वाशिम जिल्ह्यातील तर दुसऱ्या अकोल्यातील आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील नावाच्या दोन अपक्ष उमेदवारांनी सुद्धा अर्ज भरला आहे. म्हणजे ईव्हीएम मशीन वर तीन रोहिणी खडसे आणि तीन चंद्रकांत पाटील असे दोन नावांचे सहा उमेदवार असतील.

तासगाव-कवठेमहाकाळ : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजय काका पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. येथे एकूण तीन वेगवेगळ्या रोहित पाटील नावाच्या व्यक्तींनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर एका अपक्षाचे नाव संजय पाटील असंही आहे. त्यामुळे मतदानावेळी एकूण चार रोहित पाटील आणि दोन संजय पाटील असे उमेदवार असतील. योगायोग म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील हे चष्मा लावतात आणि तासगावात अपक्ष अर्ज करणारे तिन्ही रोहित पाटीलही चष्मावालेच आहेत. विशेष म्हणजे चेहरापट्टी आणि दाढी-मिशीतही बरेच साम्य आहे. ही मुख्य उमेदवारासाठी मोठी डोकेदुखी आहे.

वाळवा-इस्लापूर मतदारसंघ : सांगलीमधीलच या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांच्यात सामना होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांचं पूर्ण नाव जयंत राजाराम पाटील असं आहे. तर जयंत राजाराम पाटील नावाचे एक तर जयंत रामचंद्र पाटील नावाचे दुसरे अशा दोघांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर अजित पवार गटाच्या निशिकांत पाटील यांच्या नाम साधर्म्य साधण्याचा ही प्रयत्न झाला आहे. या मतदारसंघातून निशिकांत प्रल्हाद पाटील आणि निशिकांत दिलीप पाटील अशा दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघ : पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे विरुद्ध शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील अशी थेट लढत होत आहे. या ठिकाणी हर्षवर्धन पाटील नावाचे दोन तर दत्तात्रय भरणे नावाच्या एका व्यक्तीने अर्ज दाखल केला आहे. इंदापुरात एकूण तीन हर्षवर्धन पाटील आणि दोन दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेत शिंदे गटाचे महेश शिंदे आणि शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आमने-सामने आहेत. तिथे महेश शिंदे नावाच्या तीन वेगवेगळ्या लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला. तर एक अपक्ष अर्ज शशिकांत शिंदे नावाने दाखल झाला आहे. त्यामुळे कोरेगाव विधानसभेतून एकूण चार महेश शिंदे आणि दोन शशिकांत शिंदे असे दोन नावांचे एकूण सहा उमेदवार असणार आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघ : अहिल्यानगर जिल्ह्यातील या मतदारसंघात पण नावाची खेळी खेळण्यात आली आहे. शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपच्या राम शिंदेंमध्ये लढत होईल. या ठिकाणी इतर दोन रोहित पवारांनी तर दोन राम शिंदेंनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. इतर अपेक्षांनी अर्ज मागे न घेतल्यास ईव्हीएम मशीनवर एकूण तीन रोहित पवार आणि तीन राम शिंदे उमेदवार असतील.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.