दादर फुलमार्केटमध्ये लोकांची तुफान गर्दी, नियोजनासाठी ना पोलिस ना पालिका कर्मचारी

आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने  दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

दादर फुलमार्केटमध्ये लोकांची तुफान गर्दी, नियोजनासाठी ना पोलिस ना पालिका कर्मचारी
दादर फूल मार्केटमध्ये तुफान गर्दी

मुंबई : आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने  दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होणार हे माहिती असूनही इथे कुठल्याही प्रकारच्या पोलिस बंदोबस्त दिसला नाही किंबहुना महापालिकेचे कर्मचारी देखील दिसले नाही.

दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची तोबा गर्दी

आजपासून पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पण या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशावेळी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सगळे नियम पाळून राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पण लोकांनी नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. पहाटे पाच पासून नागरिकांनी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली. अनेक लोकांनी मास्क लावलेला नाहीये. तर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करत नाही.

सार्वजनिक ठिकाणी कोव्हिड नियमांचं पालन नाही

आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी लोक घरातून निघाले आहेत पण कोविड प्रोटोकॉलचं पालन होताना दिसत नाहीय. विना मास्क संख्या जास्त आहे. एकंदरितच सार्वजनिक ठिकाणी कोव्हिड नियमांचं कोणतंही पालन होताना दिसत नाही.

गणपती बाप्पांचं आगमन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन (Ganpati Special News) आज होत आहे. बाप्पा येणार म्हणून घराघरांत जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना विधिवत व्हावी यासाठी पुरोहितांना बोलावले जाते. यंदा पुरोहितांची आगाऊ नोंदणी झाली आहे. इतकेच नव्हे, तर महिला पुरोहितांना बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा मान दिला जात आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये महिला पुरोहित या क्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महिला पुरोहितांना प्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले जात आहे.

हे ही वाचा :

Ganesh Chaturthi 2021| एक पाऊल स्त्री-पुरुष समानतेकडे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुरोहित करणार बाप्पाची पूजा

Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन

शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल

अफगाणिस्तानमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, रस्त्यावर उतरल्या महिला, तालिबान्यांचं गोळीबारानं उत्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI