मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली.
1 / 7
नेहरु नगर इथं असलेली ही एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली.
2 / 7
इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय.तर या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
3 / 7
ही इमारत जुनी असल्याची माहिती मिळतेय. महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्याची नोटीस दिली गेली होती. तरिही काही कुटुंब याठिकाणी राहत होती. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य केलं गेलं.
4 / 7
जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला मलबा हटवून खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.
5 / 7
आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी जात पाहणी केली. तसंच बचावकार्य वेगात व्हावं, अश्या सूचना दिल्या.
6 / 7
तसंच आदित्य यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचं सांत्वन केलं. त्यांना खचू नका, सरकार पाठिशी आहे, असं म्हणत धीर दिला.