VIDEO : वाढदिवशी धुरळा, दोन-चार नाही, एकाच वेळी 550 केक कापले, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

सध्याच्या जगात कोण काय करेल याचा काहीही नेम नसतो. मुंबईच्या कांदिवली येथे एक-दोन नाही तर तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 550 केक कापण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO : वाढदिवशी धुरळा, दोन-चार नाही, एकाच वेळी 550 केक कापले, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल
Kandivali Cake Cutting


मुंबई : सध्याच्या जगात कोण काय करेल याचा काहीही नेम नसतो. मुंबईच्या कांदिवली येथे एक-दोन नाही तर तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 550 केक कापण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमका प्रकार काय आणि कोणी कापले 550 केक?

मुंबईतील कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने एकाच वेळी 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. 550 केक एकत्र कापणाऱ्या व्यक्तीचे नाव सूर्य रतुरी आहे. त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ –

वाढदिवशी चक्क आयफोनने कापला केक

केक कापण्यासाठी सामान्यत: आपण चाकू वापरतो. मात्र, सध्या कर्नाटकमधील भाजप आमदाराच्या मुलाचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. आमदाराच्या या मुलाने केक कापण्यासाठी चाकू नव्हे तर थेट आयफोनचा वापर केला आहे. आयफोन घेऊन त्याने केक कापला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

नेमका प्रकार काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा कर्नाटक राज्यातील भाजप आमदाराच्या मुलाचा आहे. या आमदाराचं नाव बसवराज दादेसुगूर असून त्याच्या मुलाचे नाव सुरेश असे आहे. सुरेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी जवळपास दहा ते पंधरा केक आणल्याचं दिसत आहे. हे सर्व केक कापण्यासाठी सुरेशने चक्क आयफोनचा वापर केला आहे. सुरेश प्रत्येक केकला आयफोनच्या मदतीने कापत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | तलवारीने केक कापण्याची चमकोगिरी महागात, सोलापुरात तरुणावर गुन्हा

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI