AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पावसाची दाणादाण, अनेक गावांना पुराचा वेढा; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून होणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती या लेखात चर्चेला आली आहे. शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत असून, काही भागात पूर आला आहे.

मुंबईत पावसाची दाणादाण, अनेक गावांना पुराचा वेढा; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
| Updated on: Aug 18, 2025 | 8:20 AM
Share

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल रात्रभर अनेक ठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या 15 दिवसांची पावसाची कसर पूर्ण झाली आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल या ठिकाणी पाणी साचले आहे. तर मुंबई उपनगरात अंधेरी, विरार, वसई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि रायगडमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत भर दिवसा अंधाराचे वातावरण

गेल्या शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ सुरू आहे. आजही मुंबई शहर आणि उपनगरांत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे. सध्या मुंबईत भर दिवसा अंधाराचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभर असंच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा 52 टक्क्यांवरुन 58 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.

नांदेडमध्ये पूरस्थिती, हसणाळा गावाला पुराचा वेढा

तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्याला ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हसणाळा गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) ची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

सोलापुरात पावसामुळे शेती पिकांना धोका

तसेच सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणाऱ्या या नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.