प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे…; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Prakash Ambedkar Vanchit And Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर...; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण... वंचित मविआत येणार की नाही? आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे...; संजय राऊत काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 12:27 PM

प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली असती तर ती आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही. प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर भावनिक विषय आहे. आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी काही वेळाआधी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांना वंचितसोबतच्या आघाडीबाबत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी स्पष्ट भाष्य केलं.

आजही वाटतं…; संजय राऊत काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला. हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे. आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं मजबूत लोकशाहीच ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. जागा वाटपात एखादं दोन गोष्टी मागेपुढे होऊ शकतात, असा आशावाद संजय राऊतांनी बोलून दाखवला.

वंचित- शिवसेना आघाडी का झाली होती?

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शिवसेनेची युती झाली याला दीड वर्ष झालं आणि ते अतिशय चांगल्या हेतूने झालेली युती होती. त्यात प्रामुख्याने लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका यासंदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे. त्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही त्या दोन नेत्यांमधली भूमिका होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे. ते एकत्र आले याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. त्यावेळेला युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती. पण विधानसभा महानगरपालिका या स्तरावर काम करू असं ठरलं, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

शिवशक्ती भीमशक्ती एका व्यक्तीची शक्ती नसते. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. ही शिवशक्ती भीमशक्ती आहे… तिच एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.