AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Vs Rana : मोठी बातमी- राणांचं मुंबईतलं आंदोलन स्थगित, मोदींच्या मुंबई दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, फडणवीसांची स्तुती तर ठाकरे टार्गेटवर

Thackeray Vs Rana : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मोदींचा दौरा रद्द व्हावा असा काही लोकांचा इरादा आहे.

Thackeray Vs Rana : मोठी बातमी- राणांचं मुंबईतलं आंदोलन स्थगित, मोदींच्या मुंबई दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, फडणवीसांची स्तुती तर ठाकरे टार्गेटवर
राणांचं मुंबईतलं आंदोलन स्थगितImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मोदींचा दौरा रद्द व्हावा असा काही लोकांचा इरादा आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. मोदींचा दौरा झाला पाहिजे. ते महाराष्ट्राला आणि मुंबईसाठी काही तरी संदेश देतील. दिशा देतील, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्यामुळेच आमचं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा अमरावतीचे आमदार रवी राणा (ravi rana) यांनी केली. रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची तोंडभरून स्तुती केली. तसेच ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर जसा हल्ला तसाच हल्ला आमच्या घरावर झाला आहे. त्यामुळे पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेच गुन्हे शिवसैनिकांवर दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचंही रवी राणा यांनी सांगितलं.

रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या. मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. मोदी हे देशाचा गौरव आहेत. आमदार आणि खासदार म्हणून त्यांच्या दौऱ्यात काहीही अनुचित प्रकार घडू नये हे आमचं कर्तव्य आहे. पंतप्रधानांसारखं व्यक्तीमत्त्व आपल्या शहरात येत असेल तर त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागता कामा नये. पंतप्रधानांचा दौरा रद्द व्हावा असं त्यांना वाटतं. पण वेळात वेळ काढून मोदी येत आहेत. ते कोणती तरी दिशा देतील. त्यामुळे त्यांचा दौरा निर्विघ्न पार पडावा म्हणून आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत, असं रवी राणा म्हणाले.

तर काय बिघडलं असतं?

महाराष्ट्रात जी परिस्थिती तयार आहे. त्यावर मुख्यमंत्री एक शब्द बोलत नाहीत. काही हनुमान भक्त आता हनुमान चालिसा मातोश्रीवर वाचत होते. मुंबईकरांना त्रास देऊन तुम्ही आता चालिसा वाचत आहात. हेच हनुमान जयंतीला केलं असतं तर त्यांचं काय बिघडलं असतं?, असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्र बंगालच्या दिशेने जातोय

हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसा वाचा एवढाच आमचा मुख्यमंत्र्यांना आग्रह होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षात संकट आली. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. मातोश्री आमच्या हृदयात आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहे. मी चुकीचं वक्तव्य केलं नाही. चुकीचं विधान केलं नाही. माझा आणि नवनीत राणांचा विरोध करणं योग्य नाही. आम्हाला सकाळीच ताब्यात घेतलं. काही शिवसैनिकांना पाठवून आमच्या घरावर हल्ला केला. दगड फेक केली. मुख्यमंत्र्यांचा आदेश या शिवसैनिकांना असावा असं वातावरण आहे. मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर माहाराष्ट्राचं दुर्देव आहे. महाराष्ट्र पश्चिम बंगालकडे जात आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला.

फडणवीस यांची स्तुती

यावेळी रवी राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. फडणवीस मुख्यमंत्री असताना कधीच राज्यात असं वातावरण झालं नाही. त्यांनी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला. फडणवीस चांगले मुख्यमंत्री आणि कुशल प्रशासक होते, अशी स्तुती त्यांनी केली. तसेच फडणवीस यांनीही मोदी महाराष्ट्रात येत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आम्ही घाबरलो असं नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Pravin Darekar: आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचाल तर भाजप स्वस्थ बसणार नाही; प्रवीण दरेकर यांचा इशारा

Maharashtra News Live Update : राज्यात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे – अशिष शेलार

रामदेव बाबांच्या शिबिरात पहिली भेट, अमरावतीत मैत्री, मुंबईत प्रेम, नवनीत कौर अशा झाल्या मिसेस राणा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.