AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार? दिल्लीतील मोठी घडामोड काय? राष्ट्रवादीचा हा नेता अमित शाहांच्या भेटीला

MLA Vikram Kakde Meet Amit Shah : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीत त्यासाठी भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. दादांचे राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अजितदादांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार? दिल्लीतील मोठी घडामोड काय? राष्ट्रवादीचा हा नेता अमित शाहांच्या भेटीला
अजितदादा पवार
| Updated on: Aug 04, 2026 | 3:45 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली. नुकतीच पक्षाच्या सर्व आमदारानी अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत सह्यांचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं आणि केंद्राकडे शिफारस करण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर ही भेट घेण्यात आली. दादांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाह यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा गट) विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली. त्यांनी दादांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार देण्याची मागणी केली. त्यांनी या भेटीत याविषयीचे निवेदन शाहांना दिले. राजकीय, सावर्जनिक जीवनातील दादांच्या योगदानाचा गौरव व्हावा यासाठी त्यांना देशातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर जाहीर करावा अशी विनंती त्यांनी केली. अजितदादांनी राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात अनेक वर्षे विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी अनेक वर्षे राज्याचे अर्थ खाते सांभाळले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचाही विक्रम केला आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

MLA Vikram Kakde Meet Amit Shah

विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाहांची भेट

पद्यविभूषण पुरस्कार

पद्यविभूषण हा भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, सामाजिक कार्य, उद्योग, वैद्यक, क्रीडा अशा प्रकारात केंद्र सरकारकडून असामान्य आणि अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान दिल्या जातो. 1954 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली होती. भारताच्या राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार देण्यात येतो. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर पद्यविभूषण पुरस्कार आहे. भारतीय नागरीकच नाही तर काही परदेशी नागरिकांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. काही व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार कुणाला द्यायचा याचा निर्णय केंद्र सरकारची पद्य पुरस्कार निवड समिती ठरवते. पद्य पुरस्कार समिती शिफारशींचा विचार करून अंति मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी केंद्र सरकारची मंत्रालये, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, विविध संस्था तसेच सर्वसामान्य नागरीकही नामांकन सुचवू शकतात.

मरणोत्तर पुरस्कार प्राप्त व्यक्ती

अरूण जेटली (2020)

सुषमा स्वराज (2020)

जॉर्ज फर्नांडिस (2020)

कल्याण सिंग (2024)

बाळकृष्ण दोशी (2023)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी