AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्दी, खोकला आणि ताप, कोरोनाची लक्षणे, पण RTPCR चा रिपोर्ट निगेटिव्ह, खासदार प्रीतम मुंडे क्वारंटाईन

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता.

सर्दी, खोकला आणि ताप, कोरोनाची लक्षणे, पण RTPCR चा रिपोर्ट निगेटिव्ह, खासदार प्रीतम मुंडे क्वारंटाईन
प्रितम मुंडे, खासदार
| Updated on: Apr 24, 2021 | 4:46 PM
Share

मुंबई : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता. त्यानंतर मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. यानंतर त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आलाय. असं असलं तरी त्या घरीच विलगीकरणात थांबल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला (Pritam Munde get Corona symptoms but RTPCR test negative).

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मागील आठवड्यात 14 ते 18 एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. तेथे रुग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस केली. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यांना योग्य ती कारवाई करायला भाग पाडलं. या माध्यमातून मी आपलं कर्तव्यच पार पाडतेय. हे काम करुन मी पुन्हा 18 एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी 21 एप्रिल रोजी RTPCR चाचणी केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.”

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी चाचण्या कराव्या लागणार

“केवळ RTPCR चाचणी निगेटिव्ह आली म्हणून आपल्याला कोरोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मीही माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली औषधं घरीच विलगीकरणात राहून घेत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही चाचण्या मला कराव्या लागतील. त्याची माहिती तुम्हाला नक्कीच सांगेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

“मी माझ्या कर्तव्यात कमी पडणार नाही, पण…”

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मी माझ्या कर्तव्यात कमी पडणार नाही. पण आज स्वतः आजारी असताना काहीतरी मागे पुढे होऊ शकतं, कमीजास्त होऊ शकतं. परंतू पंकजा मुंडे, जिल्ह्यातील इतर सर्व आमदार आणि भाजपची टीम खंबीरपणे संपूर्ण जिल्ह्यात सर्वांना मदत करण्यासाठी अहोरात्र कटीबद्ध आहे. सर्वांनी आपली अडलेली कामं त्यांच्या माध्यमातून पूर्ण करुन घेऊ शकता. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने पुन्हा लवकरच आपल्या सेवेत 24×7 रुजू होईल.”

“सर्व नागरिकांना कळकळीची विनंती की कोणतंही लक्षण, दुखणं अंगावर न काढता त्वरित आपल्या जवळच्या आरोग्य यंत्रणेला संपर्क साधा. लवकरात लवकर उपचार मिळवा. जितक्या लवकर आजाराची माहिती होईल आणि उपचार होतील तितकं कोरोनावर मात करण्यात यश मिळेल. मी काळजी घेत आहे, तुम्हीही काळजी घ्याल हीच विनंती,” असंही आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा :

सर्व शब्द झेलत होतास..हा शब्द का ओलांडलास..तू बेटा जगायचं होतंस अजून..! गोविंद मुंडेंच्या निधनानं पंकजा मुंडे भावूक

पालकमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावं, प्रीतम मुंडेंचा टोला, अचानक जिल्ह्यात आल्याने उशिरा शहाणपण, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

 बीडच्या पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं, प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेवर निशाणा

व्हिडीओ पाहा :

Pritam Munde get Corona symptoms but RTPCR test negative

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.