Special Report | मुंबईकरांना कारमध्ये बसून बघता येणार भव्य स्क्रीनवर चित्रपट, काय असते Drive-in Theatre?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 03, 2021 | 9:02 AM

रिलायन्स इंडस्ट्रीजने जगातील पहिल्या रुफ टॉप, खुल्या जिओ ड्राईव्ह इन थिएटरची घोषणा केली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे 5 नोव्हेंबर रोजी हे ओपन एअर थिएटर सुरु होईल.

Special Report | मुंबईकरांना कारमध्ये बसून बघता येणार भव्य स्क्रीनवर चित्रपट, काय असते Drive-in Theatre?
Jio World Drive
Follow us

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेली दीड वर्ष राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह बंद होती. या काळात तमाम रसिक प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मचाच आधार होता. अनेक नवीन चित्रपट ओटीटीवर रिलीज होत होते. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची सवय लागली. घरचा टीव्ही ऑन केला, नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राईम सुरु केलं, की मनोरंजनाचा धबधबा कोसळू लागतो. आपण फक्त क्लिक करायचं, आणि तुमच्या पसंतीचा कलाकार तुमच्या मनोरंजनासाठी हजर. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना पुन्हा सिनेमागृहांकडे खेचून आणणं हा एक मोठा टास्क आहे.

जिओ वर्ल्ड ड्राईव्ह काय आहे?

फक्त चित्रपटगृह मालकच नाही, तर चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, कलाकार यांच्यासाठीही हे मोठं आव्हान आहे. प्रेक्षकांची पावलं पुन्हा मनोरंजनगृहांकडे वळवण्याचा एक भाग म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) नुकतंच जगातील पहिल्या रुफ टॉप, खुल्या (ओपन एअर) (world’s first rooftop open-air) जिओ ड्राईव्ह इन थिएटर (Jio Drive-in Theatre) ची घोषणा केली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) – Bandra Kurla Complex (BKC) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह (Jio World Drive (JWD) येथे 5 नोव्हेंबर रोजी हे ओपन एअर थिएटर सुरु होईल.

रिलायन्सने सुरु केलेला प्रीमियम शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मुंबईतील ग्राहकांना तंत्रज्ञानसज्ज, स्टाईल आणि अत्याधुनिक नावीन्यपूर्ण अनुभव प्रदान करण्यासाठी सज्ज आहे. मनोरंजन, खाद्य आणि रिटेल क्षेत्रात भारतातील हा पहिला अनुभव असेल. हे ड्राईव्ह इन थिएटर सर्वोत्तम जागतिक अनुभव भारतात आणण्याच्या दृष्टीने आणि जगाला सर्वोत्तम भारत दाखवण्याच्या दृष्टीकोनाने बांधले गेले आहेत.

ड्राईव्ह इन थिएटरची संकल्पना काय?

खरं तर वांद्र्याच्या रहिवाशांसाठी ड्राईव्ह इन थिएटर ही संकल्पना नवीन नाही. कलानगर भागात मिठी नदीजवळच्या खारफुटी जमिनीवर 70 च्या दशकात हे ड्राईव्ह इन थिएटर उभं राहिलं होतं. त्यावेळी मोजक्या लोकांकडे स्वतःची चारचाकी असायची. त्यामुळे ड्राईव्ह इन थिएटर हे उच्चभ्रू व्यक्तींची मक्तेदारी मानली जात असे. 2003 मध्ये या थिएटरला घर-घर लागली आणि ते पाडण्यात आलं. त्यानंतर जवळपास अठरा वर्षांनी प्रेक्षकांना याची पुन्हा अनुभूती घेता येणार आहे.

ईशा अंबानी काय म्हणतात?

दरम्यान, जिओ वर्ल्ड ड्राईव्हच्या निर्मितीमागील तत्त्वज्ञान आणि दूरदर्शीपणा स्पष्ट करताना, रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी (Isha Ambani) म्हणाल्या की, “जिओ वर्ल्ड ड्राईव्हचा जन्म एका विचारातून झाला आहे की आधुनिक काळातील ग्राहक खरेदीकडे संवेदना समृद्ध करणारा अनुभव म्हणून पाहतात – फन, एक्स्प्लोरेशन आणि डिस्कव्हरी.”

“जिओ वर्ल्ड ड्राईव्हसह, आम्ही जगभरातील सर्वोत्कृष्ट किरकोळ आणि मनोरंजन अनुभव मुंबईत आणत आहोत. हे केवळ एक ब्रँड किंवा ठिकाण नाही, तर वैयक्तिक अनुभवांचे संपूर्ण नवीन जग आहे, जे ग्राहकांना अभूतपूर्व पद्धतीने गुंतवून ठेवेल. ही दृष्टी जिओ ड्राईव्ह-इन थिएटरच्या उद्घाटनामुळे मुंबईकरांना आणखी एक नवीन अनुभव देईल” असेही इशा अंबानी म्हणाल्या.

भारतातील पहिले ओपन-एअर रूफटॉप थिएटर

जिओ वर्ल्ड ड्राईव्ह हे भारतातील पहिले ओपन-एअर रूफटॉप थिएटर असून 5 नोव्हेंबर रोजी उघडेल. PVR द्वारे संचालित जिओ ड्राईव्ह इनमध्ये 290 कारची क्षमता आहे. शहरातील सर्वात मोठ्या सिनेमा स्क्रीन प्रेक्षकांना अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सुसज्ज आहे. विशेषतः सध्याच्या काळात स्वतःच्या कारमधून चित्रपट पाहण्याचा एक अनोखा अनुभव देईल” असे रिलायन्सतर्फे सांगण्यात आले आहे.

खाद्यसंस्कृतींचा मिलाफ

लवकरच जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे नाईन डाईन हे एक मल्टी-क्युझिन कॅज्युअल-डाइन लाँच होणार आहे. जे जागतिक पातळीवरील नऊ खाद्यसंस्कृतींचा एकत्रित अनुभव देईल. म्हणजेच कारमध्ये बसल्या जागी तुम्हाला मनपसंत जेवणाचाही अनुभव घेता येईल. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा भव्य पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Meta | नामांतरामुळे फेसबुक ‘मेटा’कुटीला, इस्राईलमध्ये गदारोळ, हिब्रू भाषेतील अर्थ माहित आहे का?

JioPhone Next बाजारात, बुकिंगसाठी ग्राहकांकडे 3 पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

64MP बॅक, 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo शानदार स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI