तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी धनंजय मुंडेंच्या जवळच्या; तक्रारदार महिलेच्या वकिलाचा गंभीर आरोप

तक्रारदार महिलेच्या आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. (Renu sharma Dhananjay Munde)

  • ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:36 PM, 14 Jan 2021
Renu sharma Dhananjay Munde
तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच, तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. तसेच, तक्रारदार महिलेने जर सांगितलं तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दुसरा अधिकारी देण्याची मागणीही करणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. तक्रारदार महिला रेणू शर्मा (Renu sharma) यांनी डीएन नगर पोलीस ठाण्याला आज (14 जानेवारी) भेट दिली . यावेळी त्यांनी सहायक आयुक्त यांच्यासमोर जबाब नोंदवीला. यावेळी रेणू शर्मा यांच्या वकिलांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Renu sharmas advocate denied the allegations made by Dhananjay Munde)

तक्रारदार महिलेचे वकील काय म्हणाले?

तक्रारदार महिला यांनी डीएन पोलीस ठाण्यात आज जबाब नोंदवीला यावेळी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी महिलेची भूमिका मांडली. यावेळी बोलताना “या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे या घटनेत तक्रारदार महिलेला न्याय मिळणार नाही. या बाबत मी तक्रारदार महिलेशी चर्चा करणार आहे. त्यांनी सांगितलं तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दुसरा अधिकारी देण्याचीही विनंती करणार आहे,” असे अ‌ॅड. रमेश त्रिपाठी म्हणाले.

तक्रारदार महिला अजूनही गरीब

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपले स्पष्टीकरण दिले होते. यावेळी त्यांनी तक्रारदार महिला रेणू शर्मा यांच्याकडून मला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला होता. मुंडे यांच्या आरोपांचे रेणू शर्मा यांच्या वकिलांनी खंडन केले आहे. “रेणू शर्मा या गरीब आहेत. त्या अजूनही पेईंग गेस्ट रुममध्ये राहतात. मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले ब्लॅकमेलिंगचे आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत,” असे तक्रारदार महिलेच्या वकिलांनी म्हटलंय.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू माझ्यासोर माडंली आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन धनंजय मुंडे यांच्यावर निर्णय घेईल अशी भूमिका राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. ते मुंबईत आज (14 जानेवारी) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ” सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरील (Dhananjay Munde) आरोपांचं स्वरुप गंभीर आहे, आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ, असे शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचीही ‘तीच’ भूमिका, धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं भाष्य

धनंजय मुंडेंची चौकशी व्हायला हवी, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची आग्रही मागणी

धनंजय मुंडे प्रकरणात मी काही बोलणार नाही; जावयाच्या गुन्ह्याची शिक्षा सासऱ्याला का: जयंत पाटील

(Renu sharmas advocate denied the allegations made by Dhananjay Munde)