Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan : हल्ला केल्यानंतर आरोपी BJ कुठे दडून बसला? पोलिसांनीच केला खुलासा, असा पकडल्या गेला

Accused Mohammad alias BJ, Bijay Das Arrested : गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या मोहम्मद आलियान उर्फ बिजय दास याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नाट्यमयरित्या त्याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली.

Saif Ali Khan : हल्ला केल्यानंतर आरोपी BJ कुठे दडून बसला? पोलिसांनीच केला खुलासा, असा पकडल्या गेला
सैफ अली खान, मोहम्मद आलियान
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 8:45 AM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्लाप्रकरणात चार दिवसानंतर 200 पोलिसांच्या टीमला मोठे यश आले. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या मोहम्मद आलियान उर्फ बिजय दास याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटजवळील लेबर कॅम्पच्या जंगलात तो लपून बसला होता. नाट्यमयरित्या त्याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. तो गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता.

ठाण्यात एका हॉटेलवर वेटर

आरोपी मोहम्मद आलियान उर्फ BJ, बिजय दास याला मध्यरात्री अटक करण्यात आली. तो मुळचा पश्चिम बंगालमधील आहे. ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता. 16 फेब्रुवारी रोजी तो सैफ अली खान याच्या घरात घुसला होता. त्याने एक कोटी रुपयांची मागणी सैफकडे केली होती. त्याने सैफवर सहा वार केले होते. घटनेपासून तो पोलिसांना सतत हुलकावणी देत होता.

हे सुद्धा वाचा

असा पकडला आरोपी

डाटा डंम्प तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेण्यात आली. तो सतत लोकेशन बदलत होता. ठाण्यातील कासारवडवली भागातील लेबर कॅम्पमध्ये जंगलात अंगावर गवत आणि झाडाची पानं अंगावर घेत लपून बसला होता. आरोपी अगोदर या भागात मजूर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला या भागाची माहिती होती. तो पोलिसांपासून लपण्यासाठी या भागात लपला होता. रात्री पोलिसांनी या भागातील मजूरांकडे त्याची विचारणा केली. त्याचा फोटो दाखवला. त्यानंतर तो पकडला गेला.

बिजय दास नाही तो मोहम्मद आलियान

मोहम्मद आलियान याला पोलिसांनी पकडण्यासाठी सापळा रचला. तो जंगलात लपला होता. त्याला पकडल्यावर त्याने स्वतःचे खोटे नाव सांगितले. बिजय दास असे नाव त्याने सांगितले. आरोपीला अगोदर चेंबूर पोलीस ठाण्यात त्यानंतर त्याला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बडे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले. त्याची कसून झाडाझडती घेतल्यानंतर तो मोहम्मद आलियान असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी कोणत्या उद्देशाने सैफच्या घरी घुसला, त्याचा हेतू काय? याविषयी पोलीस तपास करत आहेत.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.