Shiv Sena UBT Morcha Live | ‘ज्यादिवशी सरकार येईल त्यादिवशी यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही’

| Updated on: Jul 01, 2023 | 6:03 PM

शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा निघाला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा महामोर्चा निघाला आहे. ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मोठमोठ्या घोषणाबाजी करण्यात आला. या मोर्चावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Shiv Sena UBT Morcha Live | 'ज्यादिवशी सरकार येईल त्यादिवशी यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही'

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर आज विराट मोर्चा निघाला. मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. याच भ्रष्टाचारांच्या आरोपांवरुन ठाकरे गटाकडून आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी हनुमान मंदिरात जावून दर्शन घेतलं. त्यानंतर आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल झाले. या मोर्चासाठी ठाकरे गटाचे अनेक नेते दाखल झाले. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jul 2023 05:20 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर निशाणा

    मुंबई : 

    आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरु, त्यांच्या भाषणातील मुद्दे :

    मला वाटतं आपला उत्साह पाहिल्यानंतर आपला जोश पाहिल्यानंतर, आक्रोश पाहिल्यानंतर मी एकच सांगेन, समजनेवाले को इशारा काफी आहे. आपल्याला जो जनसागर दिसतोय, भगवं वादळ दिसतंय ही फक्त शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद आहे. हे भगवं वादळ फक्त मुंबईतलं आहे. महाराष्ट्रातलं अजून आम्ही सुरु केलेलं नाही. येताना हनुमानजींचं दर्शन घेऊन आलो. मनात एकच ओढ होती की, भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे, तेच करायचं आहेत. आपल्या आजूबाजूला जी भूतं आहेत त्यांना दूर सारायचं आहे

    मुंबई महापालिकेची ही वास्तू आर्थिक केंद्र आणि शक्तीपीठ आहे. या वास्तूवर भगवाच असेल. त्याचा आवाजदेखील दिल्लीला ऐकावा लागतो. मुंबईची आज परिस्थिती काय आहे? गेल्या 25 वर्षात आपण जी कामं केली आहेत ती करुन दाखवलं आहे. पण एक वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक, कमिट्या, चेअरमन नाहीत. दाराला कुलूप लावलेले आहेत. प्रशासक आहेत. तुमचा आवाज त्यांना ऐकू येतंय का? तुमची चिंता त्यांना आहे का? तुम्ही मुंबईकर आहात. तुम्ही बिल्डर म्हणून आला तर रेड कारपेट टाकलं जाईल. पण नागरीक म्हणून आला तर वेळ नाहीय. खोके घ्यायचा वेळ आला आहे. सांगतील, वरतून फोन आलाय. मग…

    मला अधिकारी फोन करुन सांगतात की, निवडणुका लावायचा प्रयत्न करा. तुम्ही असताना कामं व्हायची. पण आता चोरी केली जातेय. त्यामुळे या चोरांना आपल्याला पळवायचं आहे. जानेवारीपासून मी वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. हेच निवेदन आम्ही मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. मी आमदार म्हणून धमकी दिली नाही तोपर्यंत त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. आदित्य ठाकरे यांचं पत्र आलं की उत्तर द्यायचं नाही, हे धोरण आहे.

    मी नवीन राज्यपालांकडे केलो. नव्या राज्यपालांकडे गेलो. जुन्या राज्यपालांकडे गेलो तर त्यांच्याकडून महारुषांचा अपमान झाला असता. ते भाजपाल होते. नव्या राज्यपालांकडे तक्रार केली. लोकायुक्तांकडे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी याबाबत आपण विचार करु, असं सांगितलं. पण अजून झालं नाही. मुंबईवर एसआयची लावली तशी ठाणे, नागपूर, पुणे महापालिकांवर लावा. घोटाळेच केले आहेत. दुसरं काहीच केलेलं नाही.

    निवडणूकला लावतो तसं होर्डिंग दिसतो. काम काहीच नाही. उलट होर्डिंग असतं. मुंबईत एवढं घाणेरडं राजकारण बघितलं नव्हतं, जिथे फोडाफोडीचं राजकारण बघितलं होतं. मी तीन घोटाळे आधीपासून बोलतोय ते सांगतोय.

    पहिला घोटाळा हा रस्त्यांचा घोटाळा आहे. मला विचारलं होतं की, तुम्ही निवेदन देणार का? मी म्हटलं, चोरांना काय निवेदन देणार? मी फाईल बनवली आहे. ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्यादिवशी आम्ही आणि पोलीस आत येणार आणि अटक करणार

    मुंबईला लुटू नका. ही आमची मुंबई आहे. मुंबईकरांची महाराष्ट्राची मुंबई आहे. मुंबईमधील सगळे रस्ते काँक्रीट करणार म्हणे. चांगलं आहे, खड्डेमुक्त रस्ते करा. तुम्ही ज्या रस्त्यावर बसले आहात ना त्याच्याखाली ४२ युटीलिटी असते. पाण्याच्या पाईपलाईनपासून ते गॅसच्या पाईपलाईन असतात. सगळ्या विभागांशी बोलून नीट ठरवून रस्त्याचं काम करावं लागलं. वाहतूक पोलिसांना विचारुन काम करावं लागतं. १६ वेगवेगळ्या एजन्सी असतात. म्हाडा, रेल्वे, एमआरडीए यांच्या सगळ्यांशी बोलून काम करावं लागतं. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती नाही. त्यांनी सात वर्ष मंत्रीपदाचा अनुभव असला तरी माहिती नाही. म्हणाले, ४०० किमी रस्ते चकाचूक करु.

    यांचे पाच कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत. त्यांनी पाच पाकिटं वाटून दिले. पाच हजार कोटींचं पहिलं टेंडर आलं. एकाही मित्राने ते भरलं नाही. मित्र आले नाहीत म्हणून ते रद्द केलं. नंतर महापालिका आयुक्तांना फोन करुन टेडर वाढवलं. कितीतरी टक्केवारी यांच्या खिशात गेली असेल. अजून काही टक्के बिडींगमध्ये वाढवले. मी पत्रकार परिषद घेतली तेव्हा बिडींग नको.

    कधी काम सुरु होण्याच्यापूर्वी पैसे दिले जातात का? ६०० कोटी रुपये यांच्या मित्राच्या खिशात जाणार होते. पण मी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे ६०० कोटी रुपये वाचले. प्रत्येकी पाच जणांना पाच पॅकेट वाटून दिलं. जूनपर्यंत फक्त ५० रस्ते तयार करु असं सांगितलं. यांना ५० शिवाय काही दिसतच नाही. आमचा डिलाईड ब्रिज डीले करुन ठेवलं आहे. असे अनेक ब्रिज राहिले आहेत.

    तुम्ही मला पप्पू म्हणतात ना, मी पप्पू चॅलेंज देणार. या अंगावर. छातीवर वार करायला या. मी त्यांना हेच सांगितलं की, मी चॅलेंज देतोय, ५० रस्तेही तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. आम्ही गेले १० वर्ष फिरतोय. महापौरांना घेऊन शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर गेलो आहे. अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. रस्त्यांची कामे कशी आणि कधी होतात ते मला माहिती आहे. मी जे बोललो ते खरं ठरलं आहे.

    मुंबई महापालिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासात हे ५० रस्त्यांंचं कमीत कमी टार्गेट घेतलं. पण एकही रस्ता ही महापालिका पूर्ण करु शकलेली नाही. महापालिकेत काय चाललं आहे? तुम्ही मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारसाठी काम करत आहात?

    मी आजही सांगून ठेवतो, ज्यादिवशी आमचं सरकार येईल, ती येणार म्हणजे येणार आहे, त्या दिवशी पहिलं काम हेच असणार मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा रस्त्यांचा घोटाळा भयानक आहे.

    कुलाब्याच्या माजी नगरसेवकाच्या वॉर्डात एकही रस्त्याचं काम झालेलं नाही. मी नगरसेवकांना सांगतोय, होय तुम्हीसुद्धा आमच्यासोबत नगरसेवक होते. तुम्ही या घटनाबाह्य सरकारचा पाठिंबा काढून दाखवा. तुम्ही भ्रष्टाचार विरुद्ध बोलतात. मग या सर्वात भ्रष्ट सरकारला काढून टाका. तुम्हाला मानसन्मान तर मिळालेलाच नाही.

    दुसरा घोटाळा हा खडी घोटाळा झाला आहे. मी डिलाईड रोडजवळ गेलो होतो. चौकशी केली. ते म्हणाले, आदित्यजी काय करु, दोन आठवड्यापासून काम ठप्प झालं आहे. जी खडी यायची होती ती येतच नाही. चार-पाच लोकांना फोनफानी केली. तर मला माहिती मिळाली की अलिबाबांच्या निकटवर्तीयांनी दमदाटी केली आणि त्यांच्या मित्राची कंपनी आहे ना, मुंबईसाठी येणार खडी येणं बंद झालेलं. कारण या कंपनीने महसूल खातीतून दमदाटी केलेली.  त्यांना सांगितलं गेली की, स्वराज्य कंपनीसोबतच करार करायचा.

    हे सगळं वातावरण का चाललाय की, मुंबईची प्रगती रोखायची आहे. मुंबईचा वेग रोखायचा आहे. बुलेट ट्रेन होईपर्यंत मुंबईची प्रगती होऊ द्यायचीच नाही.

    तिसरा घोटाळा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा. हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे. मुंबई महापालिकेच्या प्रशासकांनी ठरवलं की आम्हीच काम करणार. त्यांनी अशी यंत्रणे आपल्या हातात घेतले. एका व्यक्तीने एक ते तीन वर्षात कंत्राट घ्यायचा आणि कुठेही लावायचं आहे. याने ४० हजार बँचेस घेतले. १० हजार कुंड्या घेतात. यामध्ये जोक असा की, झाडं कोणती लावणार ते कुणालाच माहिती नाही.

    मी आज मोर्चा मुद्दाम घेतला. कारण शिवसैनिक म्हणून आपण लोकांशी बोलतो, लोकांना आजही वाटतंय की, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आमदार महिर कोटे यांनी हा घोटाळा केला. त्यांनी पत्र लिहिले तेव्हा बरोबर प्रश्च विचारले होते. त्यांना वरुन फोन आला आणि मामला शांत करण्यास सांगितलं. आमदार रईस शेख यांनी दुसरं पत्र लिहिलं. त्यांना उत्तर आलं. पण मी पाठवलेल्या पत्राला उत्तर आलं नाही. मला जे उत्तर आलं, डीएमसींना वेगळं खात्यात टाकलं, तुम्हीच हे टेंडर बघा. एकाच व्यक्तीने टेंडर पूर्ण केलं पाहिजे. फेब्रुवारीला रईस शेख यांना याच डीएमसींनी उत्तर दिलं. पण त्यांची बदली झाली आहे.

    जेव्हा उत्तरं येतात तेव्हा औपचारिक पत्र येतात. डीएमसी काळे यांनी तीन अधिकाऱ्यांची समिती बनवली आहे. त्यांच्या समितीचा अभ्यास झाला की आम्ही उत्तर देऊ. नंतर मला उत्तर आलं की, तशी कमिटीच बनवलेली नाही.

    ज्या गोष्टी शंभर कोटींहून जास्त असायला नको होत्या त्या २६३ कोटींवर जात आहेत हे आपलं दुर्भाग्य आहे. ज्यादिवशी निवडणुका होतील त्यादिवशी सरकार बनेल त्यादिवशी तुम्हाला आत टाकणार म्हणजे टाकणारच. मी अधिकाऱ्यांनाही सांगतोय. आत टाकणार म्हणजे टाकणारच. आम्ही सगळं काही बघितलं. मुंबईत आम्ही सगळं काही ऐकून घेऊ. पण आमच्या मुंबईकरांच्या पैशाला हात लावला तर याद राखा.  चौथा घोटाळा हा सॅनेटरी पॅड वेडिंग मशिनचा आहे.

    आम्ही ५०० स्केवअर फुटाची घरं करमुक्त केली आहेत. पण मुंबई महापालिकेच्या ठेवी ६०० कोटींपासून ९२ हजार कोटींपर्यंत नेलं. याला आर्थिक नियोजन म्हणतो. या आमच्या मुंबईकडून शिका. मुंबईत  आज जे भयानक चित्र झालं आहे ते बदलायचं आहे. आपल्याला शिवसेनेचा आवाज घरोघरी पोहोचवणार.

    या विरोधात आपल्याला लढायचं आहे. ही लढाई ताकदीची आणि जिद्दीची लढाई असणार आहे.

    मला इथून निघण्याआधी अजून एक गोष्ट विचारायचं आहे. सगळ्यांनी डोळे मिटा. मी बघतोय तुम्ही डोळे मिटले आहेत की नाही. डोळे मिटल्यानंतर मी तुमच्यासमोर एक दृश्य दाखवतोय. गेल्याच आठवड्यात वांद्रेत एका शाखेवर बुलडोझर चालवलं आहे. तुम्ही सगळे मुंबईकर, महाराष्ट्राचे आहात. तुमच्या मनातल्या सगळ्या भिंती बाजूला करुन बघा. जो हतोडा चालवला होता तो कुणाच्या  फोटावर चालवला होता, कुणी चालवला होता, आत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. ज्यादिवशी आपलं सरकार येईल त्यादिवशी यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहायचं नाही.

  • 01 Jul 2023 05:08 PM (IST)

    मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या बापाची आहे : संजय राऊत

    मुंबई : 

    संजय राऊत यांचं भाषण सुरु, भाषणातील मुद्दे :\

    सकाळपासून सर्वांना चिंता होती की धो-धो पाऊस पडेल आणि मोर्चाचं काय होईल? पण आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सूर्यदेवाने प्रकाश दिला आहे. आम्हाला फक्त जनतेचा नाही तर ३३ कोटी देवांचा आशीर्वाद मिळाला आहे. इथे शिवसैनिकांचा धो-धो पाऊस पडला आहे.

    आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वांची गधा दिली आहे. ही गधा अशी फिरवायची आहे की हे चोर बिळात गेल्याशिवाय राहायचे नाही. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! अंबादास दानवे त्यांना चांगला चश्मा आणून द्या आणि गर्दी दाखवा.

    ही मुंबई शिवसेनेची आहे आणि मुंबई महापालिका ही देखील शिवसेनेच्या बापाची आहे. हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्राची ४० खोके उधळपट्टी करत आहेत.

    या महाराष्ट्रावर या मुंबईवर शिवसेनेचं राज्य कायम राहील हे सांगणारा हा मोर्चा आहे

    मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरु आहे, नगरसेवकांचं राज्य जोरजबदस्तीने काढून भ्रष्टाचार सुरु आहे त्याविरोधात हा मोर्चा आहे

    मुंबईकरांना निवडणुका हव्या आहेत. चोर मचाए शोर म्हणत आहेत, आता निवडणुका घ्या, कोण चोर आहे ते जनता दाखवून द्या.ॉ

    ड्रोनच्या माध्यमातून हा विराट मोर्चा पाहा, नाही तुमच्या डोळ्यांची बुळबुळे बाहेर आली तर बोला.

    एका तरुण नेत्याने मुंबईकरांना साध घातली आणि लाखो मुंबईकर मोर्चात दाखल झाले

    या महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी आहुती दिली. त्यांचं स्मारक बाजूला आहे.

    काही उंदिर आपल्याकडे बघत असतील की हा मोर्चा किती मोठा आहे. या महापालिकेचा सातबारा हा शिवसेनेच्या नावावर आहे. तो कुणाला पुसता येणार नाही.

    मुंबईकर आज आशेने आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडे पाहतोय. निवडणुका येऊद्या तुमच्या छाताडावर पाय देवून भगवा झेंडा फडकेल.

  • 01 Jul 2023 05:01 PM (IST)

    'चोर मचाए तर शोर नाही तर हा चोरांच्या उलट्या बोंबा', सुनील प्रभू यांचा भाजपवर निशाणा

    मुंबई : 

    ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचं भाषण सुरु :

    सुनील प्रभू यांच्या भाषणातील मुद्दे :

    मुंबई महापालिकेवर आपण मोर्चा आणलाय. हा केवळ हे सांगण्यासाठी आणलाय की, मागच्या एक वर्षात या ईडी सरकारने ठेकेदारांचे खिसे भरण्याचं काम केलं ते उघड काढण्यासाठी आम्ही मोर्चा काढला

    भाजपचा चोर मचाए शोर हा मोर्चा निघणार होता. चोर मचाए तर शोर नाही तर हा चोरांच्या उलट्या बोंबा होता हे सांगायला हा मोर्चा होता

    देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख होता. या पालिकेवर शिवसेनेचे अवतिरत सत्ता राहिली. ५४ हजार कोटींचा आर्थिक बजेट असतो. महापालिकेची अत्यंत चांगली आरोग्य व्यवस्था आहे.

    स्वत:साठी पिण्याचं पाण्याचं धरण बांधलं ती मुंबई महापालिका आहे. मुंबई महापालिकेने 20 लाख कर्मचाऱ्यांना रोजगार दिला. या महापालिकेच्या करिश्म्यात शिक्षणाचा दर्जा देखील चांगला आहे. गेल्या २० वर्षात शिवसेनेने महापालिकेत काम केलं. लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. मुंबई महापालिकेची वेगळी गनिमा आहे. ही गनिमा कायम ठेवण्यासाठी काम केलं. आज ९० हजार कोटींच्या ठेवी मुंबई महापालिकेने ठेवल्या आहेत. हा मुंबईकरांचा अभिमान आहे. हे शिवसेनेचं काम आहे.

    शिंदे सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. जे करुन दाखवलं हे सांगण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत. ११९७ पासून ते २०१७ वर्ष तुम्ही महापालिकेवर सत्तेत होता. तेव्हा तुम्हाला भ्रष्टाचार दिसला नाही का? तेव्हा तोंडावा चिकटपट्ट्या लावल्या होत्या का?

  • 01 Jul 2023 04:56 PM (IST)

    ठाकरे गटाकडून मोर्चाच्या सुरुवातीला बुलडाण्यातील अपघातग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण

    मुंबई : 

    आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल

    ठाकरे गटाकडून मोर्चाच्या सुरुवातीला बुलडाण्यातील अपघातग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण

  • 01 Jul 2023 04:54 PM (IST)

    एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा सुरु असताना ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी

    मुंबई : 

    आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला धक्का देणारी माहिती समोर आली आहे

    आदित्य ठाकरे यांचे युवासेनेतील सहकारी राहूल कनाल यांचा थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी होणार पक्षप्रवेश

    पक्षप्रवेश आधी राहुल कनाल यांचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत

  • 01 Jul 2023 04:51 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होण्याआधी हनुमान मंदिराला भेट दिली

    मुंबई :

    आदित्य ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होण्याआधी हनुमान मंदिराला भेट दिली

    तिथे त्यांनी मारुतीरायाला वंदन केलं. तसेच आज शनिवार असल्याने मारुतीच्या मंदिरात मनोभावे तेल वाहिलं

  • 01 Jul 2023 04:42 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात

    मुंबई : 

    आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात

    ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

  • 01 Jul 2023 04:40 PM (IST)

    मेट्रो सिनेमाजवळून मोर्चा निघाला, शिकडो कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी

    मुंबई : 

    ठाकरे गटाच्या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी

    तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या नागरिकांचा मोर्चात सहभाग

    मुस्लिम समुदायाच्या नागरिकांचा देखील मोर्चात मोठा सहभाग

    उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचा नागरिकांचा दावा

Published On - Jul 01,2023 4:35 PM

Follow us
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.