AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Strong Room: राज्यभरात मतपेट्यांच्या स्ट्राँग रुमबाहेर जागते रहो! कार्यकर्त्यांचा तीन शिफ्टमध्ये पहारा; शिंदे सेना, दादांच्या राष्ट्रवादीचाही प्रशासनानवर भरवसा नाय

Strong Rooms of Ballot Boxes: राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा 20 डिसेंबर रोजी पूर्ण होईल. हायकोर्टाच्या निकालानंतर एकदाच मतमोजणी होईल. तोपर्यंत मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांसोबतच कार्यकर्त्ये, नेते सुद्धा या स्ट्राँग रुमला खडा पहारा देत आहेत. तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देण्यात येत आहे. काय आहे अपडेट?

Strong Room: राज्यभरात मतपेट्यांच्या स्ट्राँग रुमबाहेर जागते रहो! कार्यकर्त्यांचा तीन शिफ्टमध्ये पहारा; शिंदे सेना, दादांच्या राष्ट्रवादीचाही प्रशासनानवर भरवसा नाय
स्ट्राँग रूमबाहेर जागते रहोImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 09, 2025 | 12:31 PM
Share

Workers Are Guarding in Three Shifts: सध्या राज्यातील कार्यकर्ते, नेते यांना अजून एक मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. नगरपालिका, नगरपरिषदेचा एक टप्पा पार पडला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 डिसेंबर रोजी मतदान होईल. 21 डिसेंबर रोजी मत मोजणी होऊन निकाल लागले. पण सध्या मतचोरी आणि इतर अनेक तांत्रिक बाबीबद्दल शंका उपस्थित होत असल्याने विरोधकच नाही तर सत्ताधारी कार्यकर्ते, नेते सुद्धा ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमबाहेर खडा पहारा देत आहेत. विशेष म्हणजे तीन शिफ्टमध्ये हे कार्यकर्ते पहारा देत आहेत. विरोधकांसह सत्ताधारी शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा प्रशासनावर भरवसा नसल्याचे दिसून येत आहे.

धाराशिवमध्ये पोलिसांसोबत राजकीय पक्षांचा खडा पहारा

धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये भूम नगरपालिकेचा समावेश आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे तर भाजप काँग्रेस सह ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सत्वशीला थोरात यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. भूम नगरपालिकेसाठी आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भूम येथे स्ट्राँग रुमबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. परंडा नगरपालिकेत शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर तर स्थानिक आघाडी आणि माजी आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजीत पाटील यांच्यामध्ये लढत पार पडली. शिंदे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची लढाई असल्याने स्ट्रॉंग रूम भोवती शिंदे सेनेचा पहारा पाहायला मिळाला.

परभणीतील स्ट्राँग रुमबाहेर सीसीटीव्ही

परभणीच्या गंगाखेड येथे आमदार रत्नाकर गुट्टे विरुद्ध माजी आमदार मधुसूदन केंद्रे वाद थांबलेला नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मधुसूदन केंद्र यांच्याकडून आमदार गुट्टे यांचा चोर असा उल्लेख झाला. रत्नाकर गुट्टे यांनी परळीला जाऊन दाखवावे नंतर परत येतात की नाही ते पाहावे, असा इशारा त्यांनी दिला. गंगाखेड येथे नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच आजी माजी आमदारांचा संघर्ष टोकाला गेला आहे. गंगाखेड प्रशासन आमदार गुट्टे यांच्या घरघड्यासारखा वागत असल्याने स्ट्रॉंग रूमवर मला सीसीटीव्ही बसवावा लागला असा आरोप माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी केला.

तर जिंतूर येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूमवर 24 तास पहारा देत आहेत. तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आम्हाला कोणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत असल्याचा कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागाच्या दोन नगरसेवक 24 तास स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत. त्यांनी शिफ्ट ठरवून घेतल्या आहेत. जिंतूर नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी थेट लढत होत आहे.

गोंदियाच्या स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा

गोंदिया येथील स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आला आहे. 37 SRPF तर 35 पोलिस जवान येथे तैनात आहेत. पॉलिटेक्निक कॉलेज येथील स्ट्रॉंग रूम भोवती त्रिस्तरीय बंदोबस्त दिसून येत आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी 24 तास CCTV निगराणी होत आहे. अनधिकृत प्रवेशावर कडक बंदी आहे. दोन नगरपरिषद व दोन नगरपंचायती निवडणूक मतदानानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूमबाहेर पोलिस सतर्क आहेत.

ठाकरे सेनेचे जागते रहो

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठाकरेंच्या सेनेकडून जागते रहो सुरू आहे. ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी थंडीच्या दिवसात शेकोट्या पेटवून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसले आहेत. नांदगाव खंडेश्वर येथे नगर परिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. अशातच ईव्हीएममध्ये कोणताही घोळ होऊ नये म्हणून पदाधिकारी थेट स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसल्याचे पाहायला मिळतंय.

बीडमधील स्ट्राँग रुमबाहेर तीन शिफ्टमध्ये पहारा

बीड नगर परिषद निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीन/मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी दोन टप्प्यात एसआरपीएफ आणि पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र अनपेक्षित निकाल लागतात असा आरोप करत महाविकास आघाडीने स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पॅन्डॉल टाकून 24 तास पहारा द्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये उमेदवार आणि कार्यकर्ते आठ-आठ तास पहारा देत आहेत. तीन शिफ्ट मध्ये पदाधिकारी कार्यकर्ते बदलून 24 तास पहारा देत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

धरणगावमध्ये महिला उमेदवार मैदानात

जळगावच्या धरणगाव येथे स्ट्रॉंग रूम येथे ईव्हीएम सुरक्षेसाठी कडा पहारा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार देखील मैदानात उतरल्या आहेत. स्ट्रॉंग रूमच्या पलीकडच्या इमारतीमध्ये महाविकास आघाडीच्या महिला उमेदवारांनी एकत्रित खिचडी शिजवली आणि सर्वांनी पंगतीत बसून सोबत खिचडी खाल्ली. महिला उमेदवारांनी आज कडा पहारा करणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी खिचडीचा बेत करत खिचडी बनविल्याचे पाहायला मिळालं. नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार देखील स्ट्रॉंग रूम ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व महिला महिलांनी आज एकत्र येऊन कडा पहारा देणाऱ्या पुरुष उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी खिचडी तयार केली, खाऊ घातली. महाविकास आघाडीच्या पुरुष उमेदवारांच्या वतीने स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दिवसरात्र कडा पहारा दिला जात असून यासाठी महिला उमेदवार देखील रिंगणात उतरल्या आहेत. आम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने एकत्रित प्रचार केला, निवडणूक लढवली, त्याच पद्धतीने आम्ही स्ट्रॉंग रूम येथे पहारा देण्यासाठी सुद्धा एकत्र आल्याचे महिला उमेदवारांनी बोलताना सांगितले.

मुक्ताईनगर येथील स्ट्रॉंग रूम संपूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीत

मुक्ताईनगर येथील स्ट्राँगरुमबाहेर एसआरपीएफ, पोलीस महसूल अधिकारी यांच्या निग्रणीत 28 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. आत मधील ईव्हीएम मशीन पाहण्यासाठी सीसीटीव्हीचा डिस्प्ले स्ट्रॉंग रूम बाहेर लावण्यात आला आहे. जळगावच्या एरंडोल येथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले अडीच तासापर्यंत बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात संदर्भात नगरपरिषदेतील निवडणुकीतील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना आक्षेप घेतल्यानंतर सीसीटीव्हीचा डिस्प्ले अडीच तासानंतर तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा सुरू झाला. या प्रकाराबाबत एरंडोल नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप तसेच शंका उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे.

ठाकरेसेनेचा मोहोळ येथील स्ट्राँगरुमबाहेर पहारा

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ स्ट्रॉंगरूम बाहेर शिवसेना ठाकरे गटाने 24 तास खडा पहारा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाकरे गटाला स्ट्रॉंगरूम बाहेर 24 तास बसण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. केवळ उमेदवार प्रतिनिधीला ठराविक वेळेने स्ट्रॉंगरूमला भेट देण्याची परवानगी देण्यात आलीय. मोहोळ नगरपरिषदेचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन मोहोळच्या शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. भाजप हा वोट चोर पक्ष असल्याने आम्हाला संशय येतोय म्हणून आम्ही स्ट्रॉंग रूम बाहेर बसण्याची परवानगी मागितली. आम्ही केलेले कष्ट कोणी चोरून नेऊ नये म्हणून आम्ही खडा पहारा देत आहोत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने केला आहे.

दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा...
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा.
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट.
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?.
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?.
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट.
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान.
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा....
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा.....
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.