AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना तटकरे एकटे भेटले नाही, बडा नेता होता सोबत, रोहित पवार यांचा नवा बॉम्ब… राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडणार?

Rohit Pawar on Sharad Pawar -Sunil Tatkare Meet: रोहित पवार यांनी शरद पवार-सुनील तटकरे यांच्या भेटीविषयी अजून एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे बड्या नेत्यातील कोण कोण नाराज आहे, याचा अंदाज लावल्या जात आहे.

शरद पवारांना तटकरे एकटे भेटले नाही, बडा नेता होता सोबत, रोहित पवार यांचा नवा बॉम्ब... राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडणार?
रोहित पवार, सुनील तटकरे, शरद पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 16, 2026 | 1:54 PM
Share

Rohit Pawar on Sharad Pawar -Sunil Tatkare Meet: अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे पक्षात नाराज असल्याचे समजते. ते पक्षात नेमके कोणत्या पदावर आहेत यावरून खल सुरू आहे. सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत पक्षाविषयीच्या तक्रारीचा पाढा वाचल्याचे म्हटले जाते. पार्थ पवार यांच्यावर त्यांची नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तटकरे हे एकटेच शरद पवार यांच्या भेटीला गेले नव्हते. तर त्यांच्यासोबत अजून एक बडा नेता असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

प्रफुल पटेल हे सुद्धा उपस्थित

दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा दादा हयात असताना जोर धरला होता. शरद पवारांबरोबर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे गेले अनेक वर्षांपासून काम केले आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या वेळी प्रफुल पटेल देखील उपस्थित असल्याची माहिती देखील मला समजत आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवारांकडे सुनील तटकरे यांची अराजकीय भेट झाली होती,त्या मुळे पार्थ पवार बद्दल तक्रार केली आहे की नाही या बद्दल मला कल्पना नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जे घडत आहे ते बहुतेक योग्यच आहे, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

विलिनीकरणाच्या चर्चा बासणात

विलिनीकरणासंदर्भातील मुद्दा आत्ता शांत आहे, आम्ही आत्ता त्याची चर्चा करत नाही. त्या पक्षामध्ये काय होत आहे हे त्यांना माहीत आहे त्यामुळे ते सत्तेत बसणार आहेत की विरोधात बसणार आहेत हे त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे. अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात तपास सीबीआयकडे सोपवा असा पत्र देता. अजित पवार यांच्या संदर्भात सिंपथी आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या बाबतीत आत्ता हे करणार नाही पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अनेक शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांसोबत संपर्कात आहेत. मी संघर्षाच्या भूमिकेत आहे त्यामुळे मी विरोधात राहणार आहे आणि शरद पवार देखील हे प्रतिगामी विचारांचे आहेत त्यामुळे ते त्याच विचारांचे नेहमी असणार आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

रुपाली चाकणकर यांना खोचक टोला

अजित पवार जिवंत असताना एक नेता दुसर्‍या कोणाला तरी अतिशय खालच्या पातळीवर बोलत होता.त्याची ऑडिओ क्लिप असल्याची माहिती आहे.ती क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना ऐकवली असेल अशी माहिती आहे. ४० आमदार अजित दादा मुळे निवडून आले स्वाभिमान असेल तर लढून दाखवा. त्यांच्या मृत्यू बद्दल पत्र देत आहे पण पुढे काहीच करत नाही. जर जिशान सिद्दिकी यांनी आमदकरीची शपथ घेताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नाव नाही घेतला असेल तर जिशान सिद्दिकी यांनी मोठी चूक केली आहे एका महिलेचा अपमान केला आहे. आता तिजोरीच्या चावी बद्दल मी काय बोलणार नाही पण आता ब्युटी पार्लरचा बिलचा खर्च आता निघणार नाही आहे रोहित पवार यांचा नाव न घेता रुपाली चाकणकर यांना खोचक टोला लगावला. या २८ मे च्या अगोदर CBIला अजित पवार अपघात प्रकरण सोपवण्यात आले तर मी स्वत: जाऊ पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देणार त्याच बरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणार असे मोठे वक्तव्य सुद्धा रोहित पवार यांनी केले.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ