कबुतरांसाठी आंदोलन होतं तर… मराठा मोर्चाबाबत राऊतांचा तो थेट सवाल, फडणवीसांना म्हणाले काय?
Sanjay Raut big statement : मुंबईत आज मराठा आंदोलक रात्री धडकतील. कोट्यवधी समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. जरांगेंच्या मुंबई मोर्चाला अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी उसळली असतानाच आता विरोधकही सक्रिय झाले आहेत. त्यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. आझाद मैदानावर बेमुदत उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी सकाळीच स्पष्ट केले. तर सरकार कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे कारण पुढे करत कारवाईची भूमिका घेताना दिसत आहे. त्यातच विरोधकांनी सरकारला सुनावले आहे. मराठा समाजाच्या मुंबईतील मोर्चाविषयी उद्धव सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठी भूमिका घेतली आहे. काय म्हणाले राऊत?
कबुतरांसाठी आंदोलनाला तर परवानगी
मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे राऊत म्हणाले. जर मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते. त्याला सरकार परवानगी देते तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ही मराठी माणसांची राजधानी आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल. आणि त्यांना मुंबईत येऊन आंदोलनाचा अधिकार असल्याचे राऊतांनी ठणकावले.
फडणवीसांनी संवाद साधावा
फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात, त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधावा अशी मागणी राऊतांनी केली. विरोधक या विषयावर राजकारण करत नसल्याचे ते म्हणाले. राजकारण आम्ही करत नाही राजकारण जे आहे. जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या दहा वर्षात जास्त झालं तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईत महाराष्ट्रात उभारले मराठा ब्राह्मण घाटी कोकणे 92 कुळी 96 कुळी जो एक मंत्र दिला त्या मंत्राच्या टेकड्या उडव्याचं काम गेल्या दहा वर्षात प्रामुख्याने झालं मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हे राजकारण सत्ता मिळवण्यासाठी केलं.
राज्यात जाती-जातीत भांडणं
आज जाती जाती मध्ये आगी लागले आहेत असं चित्रं कधी नव्हतं. हे या राज्याचे दुर्दैव आहे रोज कोठे ना कुठेतरी जात विरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी येते. ही गोष्ट आमच्यासारख्या हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे. मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या मागे समाज ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या समाजाच्या काही मागण्या आहेत. रोजगारा संदर्भात, आर्थिक अडचणी संदर्भात ते सरकारकडे मागणी करणार आहेत.
ते प्रेसिडेंट ट्रम्प मागू शकत नाही किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाहीत. हे नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल किंवा दुसरा मुख्यमंत्री कडे त्याच्याकडे मागण्या मागतील. उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील दुसरे कोणतेही असतील तर त्यांच्याकडे मागणी मागतील. व्यक्तीकडे मागत नाही तुम्ही त्यांचे पालक आहात तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईकडे आले आहेत तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
ठाकरे आणि पवार यांनी भूमिका मांडल्या
मराठा आरक्षणाविषयी विरोधक गप्प नाहीत. कोणीही गप्प नाही. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांनी त्या संदर्भात वारंवार भूमिका स्पष्ट केल्या आहेत. आज सत्तेवरती गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून त्याच्या आधी आपण आहात. आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे. केंद्रामध्ये दहा वर्ष नरेंद्र मोदी आहेत. हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. नरेंद्र मोदी काय करत आहेत आश्वासन तेच करत आहेत. लोकांना टोप्या घालत फिरत आहेत देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी पाच वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत.
आता नेहरूंवर खापर फोडता येणार नाही
मराठा आरक्षणाबाबतचे हे खापर तुम्ही पंडित नेहरू वरती देखील फोडू शकत नाही, असा चिमटा ही राऊतांनी सरकारला काढला. राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांना अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे. ते काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा सत्तेमध्ये होते. त्याच्या आधी सरकार होतं शिवसेनेचा त्यात होते. आपण सत्तेमध्ये होता. एकनाथ शिंदे अनेक काळ सत्तेमध्ये आहेत. तेव्हा तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करत आणि यांनी काय केलं हे प्रश्न निरर्थक आहेत. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे कारण हे आंदोलन साधन सोपं नाही. लाखोच्या संख्येने मराठी माणूस मुंबईत आला असेल तर त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय शांतता राहणार नाही, असे राऊत म्हणाले.
आंदोलन हे आंदोलन असतं. नक्कीच मुंबईमध्ये गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांनी आंदोलनाची एक तारीख घेतली आहे. पण राज्याचे प्रमुख म्हणून बहुमतातलं सरकार तुम्ही चालवत आहात आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे दोन उपमुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्या संदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नांना गती मिळेल किंवा वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल असं माझे मत आहे, असे राऊतांनी मत व्यक्त केले.
