AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैफ यांच्या लहान मुलाकडे जात होता हल्लेखोर तेव्हाच…’, रात्री 2 वाजता घरात काय घडले, पोलिसांना केअरटेकरने सांगितली संपूर्ण घटना

Saif Ali Khan Case Maid Statement: संधी साधून ओरडत आम्ही खोलीच्या बाहेर आलो. त्यावेळी सैफ आणि करीना मॅडम धावत आले. त्यावेळी सैफ यांनी विचारले तो कोण आहे, त्याला काय हवे? त्यावेळी त्या व्यक्तीने लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेडने सैफ यांच्यावर हल्ला केला.

'सैफ यांच्या लहान मुलाकडे जात होता हल्लेखोर तेव्हाच...', रात्री 2 वाजता घरात काय घडले, पोलिसांना केअरटेकरने सांगितली संपूर्ण घटना
Bollywood star Saif Ali Khan
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 17, 2025 | 1:47 PM
Share

Saif Ali Khan Case Maid Statement: मुंबईत अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून गुरुवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणात सैफ अली खान यांच्या केअरटेकरचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्या मागील चार वर्षांपासून सैफ यांच्या घरात काम करत आहे. त्यांनी नेमके काय घडले ते सर्वकाही पोलिसांना सांगितले.

केअरटकरने काय सांगितले?

पोलिसांना दिलेल्या जबाबात केअरटेकरने सांगितले की, मी सैफ अली खान यांचा लहान मुलगा जेह यांची देखभाल करते. सैफ अली खान बाराव्या मजल्यावर राहतात. 15 जानेवारी रात्री रात्री 11 वाजता जेहला झोपवले. त्यानंतर मी झोपण्यासाठी गेली. रात्री दोन वाजता काही आवाज आला. त्यामुळे मी झोपेतून जागे झाले. त्यावेळी बाथरुमचा दरवाजा उघडा होता आणि लाइट सुरु होती. त्यावेळी मला वाटले करीना मॅडम मुलाला भेटण्यासाठी आली असेल. त्यामुळे मी झोपून गेले. त्यानंतर काहीतरी गोंधळ होत असल्याचे मला वाटले. मी बाथरुममध्ये पहिल्यावर एक व्यक्ती दिसला. तो बाहेर आला आणि जेहकडे जाऊ लागला. मी पळून जेहकडे गेले. त्यावेळी त्याने हिंदीत सांगितले, आवाज करु नको. त्यावेळी काही लोक झोपेतून जागे झाले. त्यांनाही त्याने सांगितले आवाज करु नका.

हेक्सा ब्लेड घेऊन धावून आला…

आपल्या जबाबात केअरटेकर पुढे म्हणते, मी त्यावेळी जहांगीर याला उठवण्यासाठी गेली. त्यावेळी तो व्यक्ती एक हेक्सा ब्लेड घेऊन माझ्याकडे धावू लागला. त्याने त्या ब्लेडने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोटावर तो ब्लेड लागला. त्यावेळी मी त्याला विचारले तर काय हवे? त्याने पैसे सांगितले. मी विचारले किती हवे तर त्याने एक कोटी रुपये रक्कम सांगितली.

सैफ अन् करीना आले…

मग संधी साधून ओरडत आम्ही खोलीच्या बाहेर आलो. त्यावेळी सैफ आणि करीना मॅडम धावत आले. त्यावेळी सैफ यांनी विचारले तो कोण आहे, त्याला काय हवे? त्यावेळी त्या व्यक्तीने लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेडने सैफ यांच्यावर हल्ला केला. आम्ही सर्व खोलीतून पळालो आणि दार बंद केले. आमचा आवाज ऐकून रमेश, हरी, रामू व पासवान सर्व आले. आम्ही पुन्हा खोलीत गेल्यावर दार उघडे होते.

हल्ल्यात सैफ अली खान जखमी

या घटनेत सैफ यांच्या मानेच्या मागच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ, पाठीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हाताच्या मनगट आणि कोपरजवळ दुखापत झाली होती. त्याच्या हातातून रक्त येत होते. उजव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर आणि चेहऱ्यावरही जखमा होत्या. हल्ला करणारा व्यक्ती अनोळखी होता. त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे, असे केअरटेकरने सांगितले. जखमी सैफ अली खान यांना रिक्षेतून रुग्णालयात नेण्यात आले.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी