ठाकरे गटाच्या उमेदवारावर काँग्रेस नेत्याचा आक्षेप, नेमकं कारण काय?

ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विरोध केला आहे. आपण अमोल कीर्तिकर यांचं काम करणार नाही, असं थेट निरुपम म्हणाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. निरुपम स्वत: या जागेवर लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी माध्यमांसमोर आपला अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला नेमका विरोध का आहे? याबाबत मुद्देसूद प्रतिक्रिया दिलीय.

ठाकरे गटाच्या उमेदवारावर काँग्रेस नेत्याचा आक्षेप, नेमकं कारण काय?
संजय निरुपम यांचा अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला विरोध
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 4:32 PM

ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 16 उमेदवारांची नावे आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाकडून 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेच महाविकास आघाडीत मतभेद समोर येताना दिसत आहेत. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. उत्तर पश्चिम मुंबई या जागेसाठी ठाकरे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवारावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.

सांगलीची जागा ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना जाहीर करण्यात आली आहे. पण या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. तसा हा मतदारसंघ काँग्रेसला बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा काँग्रेसचा दावा आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेत आपलं म्हणणं मांडलं देखील आहे. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उघडपणे भूमिका मांडली आहे.

संजय निरुपम यांचा अमोल कीर्तिकर यांना विरोध का?

ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला संजय निरोपम यांनी उघडपणे विरोध केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी जरी पराभव केला असला तरी पराभवानंतर आपण या लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षे काम केलं आहे. आपण या मतदारसंघात लोकसभेची तयारी जोमाने केली असल्याचं संजय निरूपम यांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

संजय निरुपम यांचा आक्षेप नेमका काय?

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. तरीही अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा मोठा मतदार असून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हा मतदार पाठिंबा देऊ शकत नाही, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. अमोल कीर्तिकर यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे निवडणुकीचा अनुभव नसताना त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणे हे योग्य नसल्याचं निरुपम यांचं मत आहे.

Non Stop LIVE Update
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....