AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्ह्यात 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासजी शाळा बंद राहणार आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास बहुसंख्य पालकांचा विरोध आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यात 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार
sagar joshi
sagar joshi | Updated on: Nov 22, 2020 | 8:08 AM
Share

नागपूर: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील शाळा सोमवारपासून सुरु होणार नाहीत. नागपूर जिल्ह्यातही 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी दिला आहे. (Nagpur Municipal Corporations school will remain closed till 13 December)

नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासजी शाळा बंद राहणार आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास बहुसंख्य पालकांचा विरोध आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. त्यानुसार राज्यभरात शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरु आहेत. त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 363 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 6 हजार 851 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 3 हजार 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 93.21 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा

जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 5 हजार 242 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. नववी ते बारावी शाळा सुरु होत आहेत. त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

धोका वाढला! राज्यात 5760 कोरोनाबाधित सापडले

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याचं चित्र समोर आलं होतं. पण आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. राज्यात काल 5760 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) वाढ झाली आहे. तर 4088 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,64,7004 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

धोका वाढला! राज्यात 5760 कोरोनाबाधित सापडले, मुंबईत 1092 रुग्णांची नोंद

नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा, विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, नागपुरात 41, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

Schools in Nagpur Municipal Corporation will remain closed till December 13

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...