AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा भाऊ-छोटा भाऊ वाद वाढला, महाविकास आघाडी फुटणार?; विजय वडेट्टीवार यांनी बेधडक सांगितलं

लोकशाहीच्या सर्वोच मंदिरावरून पेटलेला वाद म्हणजे लोकशाही मोडीत निघत असल्याचं द्योतक आहे. राष्ट्रपतींचा हक्क असताना 24 मोठ्या पक्षांनी विरोध केला असताना पंतप्रधानांनीच का उद्घाटन करावं?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

मोठा भाऊ-छोटा भाऊ वाद वाढला, महाविकास आघाडी फुटणार?; विजय वडेट्टीवार यांनी बेधडक सांगितलं
vijay wadettiwarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 28, 2023 | 11:14 AM
Share

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी आमदारांची आकडेवारीही दाखवली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अजितदादांच्या म्हणण्याचं समर्थन केलं होतं. हा वाद सुरु असतानाच आता त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोठा भाऊ, छोटा भाऊवरून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही फूट पडणार नाही. तो विषयच संपलेला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो आहे. महाविकास आघाडी आपली ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला निवडणुकीत वापरायची आहे. आपली संयुक्त ताकद आपण म्हणतो, तेव्हा काँग्रेस कमजोर आहे? राष्ट्रवादी कमजोर आहे? आणि शिवसेना कमजोर आहे असं म्हणून चालणार नाही. आपल्याला पुढचा विचार करून मार्गक्रमण करावं लागणार आहे. आपण संयुक्तपणे लढण्याचा निर्णय जेव्हा घेतो, तेव्हा आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणणे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

अजितदादांना आवाहन

अजित पवार यांनी पुण्यातील जागेवर दावा केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा पुण्याच्या जागेवर दावा करत असेल तर त्यांनी सांगावं कसब्याची जागा आम्ही किती दिवसात जिंकली? त्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अजितदादांनी फारकत पडेल असं काही करू नये, ही त्यांना विनंती आहे, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.

मोदी लाटेत अनेक पराभूत

काँग्रेसकडे आहे त्या जागा राहू द्या. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला सोबत जायचं आहे. जिंकत आलो किंवा नाही हा प्रश्न नंतरचा आहे. सुरेश कलमाडींपासून आम्ही ती जागा जिंकत आलो आहोत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर ती जागा हरलो. मोदी लाटेमध्ये अनेक दिग्गज हरले होते. त्यामुळे याचा निकष लावू नका, असंही ते म्हणाले.

आघाडी धर्म पाळा

बापट लढत असलेल्या मतदार संघातील जागा काँग्रेस जिंकू शकली नाही असे अजितदादा म्हणतअसेल तर कसब्याची जागा ही काँग्रेसने 38 वर्षानंतर जिंकली आहे. आता महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे. यामध्ये सगळ्यांना समजदारीची भूमिका घेतली पाहिजे. आघाडी टिकावी यासाठी एकत्रपणे लढले पाहिजे. अनेक ठिकाणी 2014 मध्ये अनेकांचा पराभव झाला.

मोठे मोठे दिग्गजही पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्याची तुलना करण्यापेक्षा उदाहरण म्हणून कसबा किती वर्षांनी जिंकलेली, त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली असा म्हणायचं नाही का? पण महाविकास आघाडी म्हणून लढायचा असेल तर आघाडी धर्म म्हणून पाळला पाहिजे. त्या जागेवर वाद घालण्यापेक्षा ती काँग्रेसकडे होती, ती काँग्रेसकडे राहावी, असं ते म्हणाले.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.