Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट ठाकरे कुटुंबालाच घेरलं, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तो मुद्दा काढून कोंडी; काय आहे प्रकरण? कोण काय बोललं?

Nagpur Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाचं अधिवेशन आधी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी थेट ठाकरे कुटुंबालाच घेरलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'त्या' मुद्द्यावर भाष्य केलं. यातून ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? वाचा...

थेट ठाकरे कुटुंबालाच घेरलं, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तो मुद्दा काढून कोंडी; काय आहे प्रकरण? कोण काय बोललं?
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 1:22 PM

स्वप्रील उमप, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 डिसेंबर 2023 : विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशन काळात विविध मुद्दे चर्चेत आले आहेत. अशात एक साडे तीन वर्ष जुना मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. या प्रकरणाची आता SIT चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचीही SIT चौकशी होणार असल्याची माहिती आहे. अशात भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

चौकशीला सामोरं जा- आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियान प्रकरणात एसआयटी चौकशी होईल की नाही होईल, याचा निर्णय सरकार घेईल. पण दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणामुळे संशय निर्माण झाला आहे, तो स्पष्ट होण्याची गरज आहे. वातावरण साफ स्पष्ट झालं पाहिजे. लोकांच्या मनातील उत्तर मिळाली पाहिजेत. ज्या पद्धतीचे पुरावे आहे. त्याबद्दलचा स्पष्टीकरण पोलीस खात्याकडून मिळाली पाहिजेत. मी तर म्हणेल, आदित्यजींनी स्वतःच या ठिकाणी एसआयटी चौकशीची मागणी केली पाहिजे. स्वतःच्या कमिटीच्या समोर गेले पाहिजे, अशी सूचना वजा विनंती करेन, असं आशिष शेलार म्हणालेत.

प्रवीण दरेकरांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

दिशा सालियान प्रकरणात लागलेल्या एसआयटी चौकशीचे मी स्वागत करतो. लोकांच्या मनात संशय होता. या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे का? हा संशय लोकांच्या मनात होता. तो संशय आता दूर होईल. आदित्य ठाकरे जागतिक स्तरावर लोकप्रिय नेते झाले आहेत. ते अधिवेशन चालू असताना परदेशात आहेत. त्यांना सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

“आता यांना त्रास होईल”

दिशा सालियानची आत्महत्या झाली की खून झाला हा प्रश्न सातत्याने समोर येत होता. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सचिन वाजे यांचीही संशयाची भूमिका होती. एसआयटी चौकशी लागल्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल आदित्य ठाकरे यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. आदित्य ठाकरे यांचं त्यामधील इन्व्हरमेंट असेल तर नक्कीच त्यांना त्रास होईल, असं म्हणत प्रसाद लाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाठ म्हणाले…

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियन प्रकरणात मला वाटते आदित्य ठाकरे यांचा हात आहे. राज्याच्या गृहखात्याकडे तसे काही पुरावे आले आहेत, असं शिरसाट म्हणाले. तर सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तुमच्यावर सुड उगवण्यासाठी हे सरकार चालत नाही. संजय राऊत यांची सावली विनायक राऊत यांच्यावर पडली आहे, असं म्हणत शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.

'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.