AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, यांना…

Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवार आज नागपूरमध्ये आहेत. इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांनी निशाणा साधला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन' वर शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर बातमी...

'वन नेशन, वन इलेक्शन'वरून शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, यांना...
Sharad Pawar Narendra Modi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 17, 2024 | 1:51 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारला चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेता येत नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. तसंच देशात सध्या शांततेची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना सबंध देशाच्या निवडणुका एकावेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली. हे असं पंतप्रधान बोलून 12 तास झाले नाहीत. तोवर आपल्याला ऐकायला मिळतंय की जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. पण झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालेली नाही. सबंध देशात एकावेळी निवडूक घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राची निवडणूक जाहीर न होणं हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, असं शरद पवार म्हणाले.

देशात शांततेची गरज- शरद पवार

बांग्लादेशमधील हिंसाचार आणि त्याचे भारत आणि विशेषत: महाराष्ट्रावर होत असलेल्या परिणामांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.  पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशला लागून आहेत. पण तिथं काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळतील, असं कधी घडलं नाही. या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण देशात सामजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज आहे. त्यासाठी समाजातील सगळ्याच घटकांनी खबरदारी घ्यावी एवढंच मी बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई यावर भाष्य करता येईल पण आज शांतता आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणातील अन्य बाबींवर मी भाष्य करू इच्छित नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग