AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari: “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”, पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा अवकाळी टोला, कुणाला झोंबणार वऱ्हाडी झटका?

Nitin Gadkari Big Statements: केंद्रीय नितीन गडकरी यांच्या भाषणाची रंगत न्यारी आहे. हसत हसत चिमटे काढणे हा त्यांचा स्वभाव आहे. प्रसंगी ते सुनावयलाही मागे पाहत नाही. वैदर्भियन मातीचं देणं त्यांच्या भाषणातून सहज डोकावते. त्यांच्या भाषणाकडे माध्यमांचंच नाही तर कार्यकर्त्यांचंही बारीक लक्ष्य असतं. ते बेधडक वक्तव्य करतात. आताही त्यांनी असंच भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.

Nitin Gadkari: कुणाला पंतप्रधान करण्यासाठी..., पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा अवकाळी टोला, कुणाला झोंबणार वऱ्हाडी झटका?
नितीन गडकरी यांचा कुणावर निशाणाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 07, 2026 | 12:29 PM
Share

Nitin Gadkari Big Statements: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी कार्यकर्त्यांचे कान पिळताना भाजपचा अजेंडही समोर आणला. भारतीय जनता पक्षाला 46 वर्षे पूर्ण झाले आहेत. आता पक्ष लवकरच अर्धशतकात डोकावणार आहे. त्यावेळी पक्षीय भूमिका आणि विचार मंथनाचे काम गडकरी यांनी संघ भूमीतून केले. RSS च्या कर्मभूमीत गडकरी यांनी भाजपच्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिकेवर अवकाळी टोलेबाजी केली. त्यांच्या या खास वऱ्हाडी शैलीतून कोणते पक्ष टिपले गेले हे वेगळं सांगायची गरज नाही.

पक्षाची स्थापना कुणाला पंतप्रधान करण्यासाठी झाली नाही

पक्षाची स्थापना कुणाला पंतप्रधान करण्यासाठी झाली नव्हती असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. गडकरी यांना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल विरोधकांनी केला आहे. तर विरोधकांनी आमच्या पक्षाविरोधात गरळ ओकण्याचेच काम केले. विशिष्ट समुदायाविरोधात भाजप असल्याचा अपप्रचार करण्यात आला. भाजपकडून सर्वच पूजा पद्धतींचा सन्मान करण्यात येतो, असे गडकरींनी सांगितले.

पक्षाचे उद्दिष्ट काय?

आजपासून 40 वर्षापूर्वी भाजपची स्थापना झाली तेव्हा देशभरात जवळपास 20 कार्यक्रम झाले होते.. चाळीस वर्षांपूर्वी न्यू इंग्लिश महाल येथे राम जेठमलानी आणि शांतीभूषण यांच्या उपस्थितीत भाजपची स्थापना झाली. त्यादरम्यान मुंबईत अधिवेशन झालं, त्यावेळी छागला यांनी सांगितलं की भावी पंतप्रधान येणार आणि ते अटलबिहारी यांच्या रूपाने सिद्ध झाले. अंधार मिटणार ही अटल बिहारी वाजपेयी यांची भविष्यवाणी आज खरी ठरली आहे.. भाजपची स्थापना पंतप्रधान बनण्यासाठी झाली नव्हती. अटल बिहारी सांगत होते देशाचे पंतप्रधान कोण होणार हे महत्त्वाचं नाही तर देश मजबूत कसं होईल हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आम्ही अनेक उद्दिष्ट आणि स्वप्न पूर्ण केलेत. आमचा पक्ष सांप्रदायिक ,जातीवादी किंवा कोणत्या धर्म विरोधात नाही. कोणी मंदिर, मस्जिद किंवा गुरुद्वारात जात असेल. हा सर्व नागरिकांचा आपापला अधिकार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पर्शियन भाषेची संस्कृत भाषेतून उत्पत्ती

सध्या इराण आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे. मी शिपिंग मंत्री असताना चाहबार नावाचा मोठा पोर्ट बनविण्याचा सौभाग्य मिळालं.मी सात ते आठ वेळा इराण ला गेलो. किरण जात असताना मी स्पेशल फ्लाईटने जात होतो. एकदा पाकिस्तानने माझ्या फ्लाईटला मध्येच थांबवलं. आणि पुढे जाऊ शकत नाही सांगितलं. नंतर मी परत गुजरात येऊन गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अफगाणिस्थान, इराण आणि आजचा पाकिस्तान , सिंधू नदीच्या समोरील आर्य नदीपर्यंत आमचे संबंध होते. मी जेव्हा आयातुला खोमोनी यांच्या घरी भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला. आमची परिशियन भाषा कुठून आली? मी माहीत नाही म्हटल्यावर. त्यांनी मला ही भाषा संस्कृतपासून आल्याचं सांगितलं. आणि मी लखनऊ येथील असल्याचं खोमोनी सांगितलं. आमची विरासत इतिहास आणि संस्कृती एकच आहे. अब्दुला आमचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मला मी कोकणस्थ ब्राह्मण असल्याचं सांगितलं. माझ नाव करंदीकर असल्याचं सांगितलं. त्या काळात आपल्या हिंदू धर्मात कोंबडी खाऊन उरलेलं भाग कोणाच्या घरात फेकलं तर त्याला हिंदू धर्मातून बाहेर काढून दिले जात होते. त्या काळातील काही पंडित आणि ब्राह्मणांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मांचे नुकसान झालं, असे गडकरी म्हणाले.

भारतीयत्व ,राष्ट्रीयत्व हेच खरं हिंदुत्व

जातिवाद अस्पृश्यता अनेकांनी केली. मात्र प्रत्येक व्यक्ती हा जातपात धर्मपंथ नाही तर त्याच्या गुणाने बनला आहे. महात्मा गांधीचे हत्यारे, मुस्लिम विरोधी, जातिवादी पक्ष असा आमच्या पक्षाला बदनाम करण्यात आलं. शोले चित्रपटाची कथा सलीम जावेद यांची होती. जावेद अख्तर यांनी अटल बिहारी यांची मुलाखत घेतली त्यामध्ये अटल बिहारी यांनी हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील असे वक्तव्य केले होते. भारतीयत्व ,राष्ट्रीयत्व हेच खरं हिंदुत्व आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही तर सर्वधर्मसमभाव आहे, असे मोठे वक्तव्य सुद्धा गडकरी यांनी केले.

व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. जर राहीलं असत तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या निधनानंतर ब्राह्मणांना बोलवून मंत्र अग्नी केलं गेलं नसतं. जर ते सेक्युलर असते तर ब्राह्मणांना कशाला बोलावलं. कारण त्यांच्यासोबत धर्म जोडला गेला होता आणि त्याचे ते स्वीकार करत होते. आमचा मुस्लिम बांधव मक्का मदीना जातो तेव्हा त्याला हिंदू मुसलमान म्हणतात. ग्रजांच्या काळात आपल्या डोक्यात चुकीच्या गोष्टी बसविण्यात आल्या. म्हणून येणार्‍या काळात आपल्याबद्दल जो काही अपप्रचार झाला आणि आपली प्रतिमा आपण जातीवादी किंवा मुस्लिम विरोधी आहोत जे आरोप होत आहे. ते चुकीचे आहेत, असे गडकरी म्हणाले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?