शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी आमदाराच्या घरावर हल्ला,दगडफेक आणि गाडी पेटवण्याचा प्रयत्न

| Updated on: Jan 11, 2026 | 2:35 PM

नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर भीषण हल्ला झाला. त्यांच्या मुलाच्या उपनगराध्यक्षपदी निवडीनंतर झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक दगडफेकीत झाले. हल्लेखोरांनी गाडी जाळण्याचाही प्रयत्न केला. पोलीस फौजफाटा तैनात असून ३० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे.

आगामी महापालिका निवडणकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मात्र असं असतानाचं सत्ताधारी महायुतीमधील शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदारच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी जोरदार हल्ला केला. त्यांच्या घराव दगडफेक करण्यात आली. एवढंच नव्हे तर हल्लेखोरांनी त्यांची गाडी जाळण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. दगडफेक नंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतरकाल रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी चौधरी यांचा मुलगा प्रथमेश याची निवड झाली. मात्र या निवडीनंतर दुपारी किरकोळ वाद झाला होता. तो वाद काही वेळाने थांबला, पण प्रकरण अजून इथेच संपले नव्हते. दुपारी झालेला किरकोळ वाद रात्री आणखी भडकला आणि त्याचे हिंसक हल्ल्यात रुपांतर झालं. रात्रीच्या सुमारास अज्ञात जमावाने माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर भीषण हल्ला चढवला. या दगडफेकीत चौधरी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. घराचे मोठ नुकसान झाले. तसेच या हल्लेखोरांनी घराच्या आवारात उभ्या असलेल्या काही गाड्याही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली. मात्र सुदैवाने यामध्ये कोीही फार जखमी झालं नाही.

दरम्यान दगडफेकीच्या आणि गाडी पेटवण्याच्या या हल्ल्यानंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशीरा पर्यंत ३० पेक्षा अधिक जणांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Published on: Jan 11, 2026 02:32 PM