AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन गेमसंदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यात यावेत; नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मागणी

ऑनलाईन गेम (Online Game) संदर्भातील कायद्यांमध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी नाशिकचे (nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. कायद्यात बदल केल्यास अशा आत्महत्येला आळा बसू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

ऑनलाईन गेमसंदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यात यावेत; नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मागणी
दीपक पांडेय
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 12:48 PM
Share

नाशिक: ऑनलाईन गेम (Online Game) संदर्भातील कायद्यांमध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी नाशिकचे (nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. आज अनेक तरुण हे ऑनलाईन गेमच्या नादी लागलेले दिसतात. यातील अनेक गेम हे पैशांवर असतात. गेममध्ये पैसे हरल्याने संबंधित तरुणांवर दडपण येते, हे पैसे फेडायचे कुठून असा प्रश्न निर्माण होतो. याच दडपणातून तरुण आत्महत्या करत असल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटले आहे. जर ऑनलाई गेम संदर्भातील कायद्यात दुरुस्ती केल्यास अशाप्रकारच्या आत्महत्या होणार नाहीत, तसेच यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक गुन्हेगारीला देखील आळा घातला जाऊ शकतो असे पोलीस आयुक्त दीपर पांडेय यांनी म्हटले आहे.

नेमंक काय म्हणाले पांडेय?

ऑनलाई गेमची इंडस्ट्री 15 हजार कोटी रुपयांची आहे. सध्या अनेक तरुण ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकत आहेत. ऑनलाईन गेमवर बंदी न आणता त्यांच्या नियमनाची आवश्यकता आहे. ऑनलाईन गेमवर देखरेखीसाठी लॉटरी कमिशनरची नियुक्ती करण्यात यावी. असे केल्याने राज्य शासनाचा महसूल तर वाढेलच सोबतच ऑनलाईन गेममध्ये पैसे हारले म्हणून जे तरुण आत्महत्या करतात त्यांना आळा घालणे शक्य होईल. सोबतच आर्थिक गुन्हेगारी देखील अटोक्यात येईल असे पांडेय यांनी म्हटले आहे.

ऑनलाईन गेमिंगमुळे गुन्हेगारी वाढली

पुढे बोलताना दिपक पांडेय यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन गेमिंगमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून अशा प्रकरणात कारवाई करण्यात येते. मात्र कायदे कडक नसल्यामुळे आरोपींना लगेच सोडावे लागते. याबाबत कडक कायदा केल्यास आरोपींवर थेट मोक्का अंतर्गंत कारवाई करता येणे देखील शक्यत आहे. असे झाल्यास आपोआपच गुन्हागारी नियंत्रणात येईल.

संबंधित बातम्या

कुत्रा नाही, बिबट्या पडला होता विहिरीत! वेळीच लक्षात आल्यानं टळला अनर्थ, पाहा Video

CCTV | तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, Nashik मध्ये तीन वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला

महावितरणच्या विलासराव देशमुख अभय योजनेचा 32 लाख ग्राहकांना होणार लाभ; कसा घ्यावा फायदा?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.